थांबलेला आसवांचा पाऊस पापण्यांशी,
मी तुझ्या बरसण्याची, वाट पाहतो आहे !
झगडलो वेदनांशी कोंडुन जाणीवांना,
आठवांचा आज प्रिये, थाट पाहतो आहे !
ओसंडु पाहे कसा गुदमर मनातला,
थोपवली भावनांची, लाट पाहतो आहे !
ओथंबले काठ अता डोळ्यांचे सखे,
मोडुनी चौकट वाहे, पाट पाहतो आहे !
संपले ते उजळणे पुन्हा मनोरथांचे,
गातात दु:ख सुखाने, भाट पाहतो आहे !
विशाल
प्रतिक्रिया
7 Jul 2009 - 12:52 am | कच्चा कान्दा
एकदम ह्रदयस्पर्शी... कसे काय सुचते असे ?
प्रेमभन्ग झालेला दिसतोय नुकताच..
कच्चा कांदा..