सचोटिने व नीतीमत्तेने जादा पैसे मिळवण्याचे मार्ग.
पैसा हा शेवटि पैसा असतो व त्याला पर्याय नसतो. माणसाला आपल्या नेहमिचे कमाईपेंक्षा थोडे बहूत जादा पैसे सन्मार्गाने मिळावेत अशी इच्छा असते फक्त अशांसाठिच हा लेखन प्रपंच:
यासाठि तुमच्याकडे भांडवल नसले तरि चालू शकते मात्र इच्छा शक्ति व कष्ट करण्याची तयारि हवीच त्याला पर्याय नाही.
नेहमी ध्यानात ठेवा पैसा हे सर्वस्व नव्हे पण असे नॉनसेन्स प्रतिपादन करण्यापूर्वी तो तुम्ही भरपूर प्रमाणात मिळवला आहात याची खात्री करा (“Always remember money isn’t everything but make sure that you’ve made lot of it before talking such nonsense” – Warren Buffet) – World’s richest person – Business – Share Trading – Total valuation more that Rs.5 Lac Corores.
१) विमा प्रतिनिधी म्हणून काम करणे:
• हा व्यवसाय किचकट व कनिष्ट वाटला तरि यात पैसे थोडे ते भरपूर मिळवण्याची ताकद आहे.
• ब-याच कंपन्या आहेत कोणत्याही एका कंपनीसाठी काम करता येते.
• विक्रीचे फार मोठे कौशल्य नसले तरि चालेल मात्र चिकाटी, प्रामाणिकपणा, संयम व समोरच्याने नाहि म्हटले तर, तू नहि तो और सहि अशी प्रवॄत्ती एवढे गुण असायलाच हवेत. आणि हे सारे गुण प्रयत्नसाध्य आहेत.
• विम्याचा सरासरि वार्षीक हप्ता रु. २०००० ते १ लाख एवढा असतो व सरासरि कमिशन २० टक्के असते.
• एजन्सी चालू रहाण्यासाठी किमान १२ पॉलिसी वर्षात कराव्या लागतात म्हणजे काहि फार नाहित.
• म्हणजे फक्त एजन्सी चालू ठेवली तरि वर्षाला ४८००० ते २४०००० कमिशन पहिल्या वर्षाचे होते रिन्युअल कमिशन ४ टक्के प्रमाणे दर वर्षी वाढतच जाते.
• आज देशात वार्षीक एक कोटी पेक्षा जास्त कमिशन मिळवणारे शेकडो विमा प्रतिनिधि आहेत.
• विमा विकला जात नाहि विकावा लागतो.
२) म्युचल फंड वितरक
• विम्यापेक्षा विकावयास सोपा.
• बाजारात जवळपास ३२ म्युचल फंड कंपन्या आहेत एकाचवेळी सर्वांसाठी काम करता येते.
• कमिशन २ ते २॥५ टक्केच मिळते. १ आगस्ट २००९ पासून हे मिळणार नाहि तुम्हाला गुंतवणूकदारांकडूनच फि घ्यावी लागेल.
• परंतु यावर दर साल गुंतवणूकिचे एकूण बाजार मुल्यावर सरासरि ०.५ टक्के दराने ट्रेल कमिशन मिळते म्हणजेच एकदा का तुमचे मार्फत झालेल्या गुंतवणूकिचे एकूण बाजारमुल्य मुल्य १०० कोटी झाले कि तुम्हाला वार्षीक रु ५० लाख उत्पन्न जोपर्यंत गुंतवणूक आहे तो पर्यंत मिळत रहाते व बाजारमुल्य तर नेहमिच कमी जास्त होत असते.
३) अन्य गुंतवणूकिची साधने विकणे
• रिझर्व्ह बॅकेचे बॉंड, सरकारि रोखे, पीएमएस, खाजगी कंपन्यांचे कर्ज रोखे इ
४) जनरल इंशुरन्स विकणे
• ब-याच कंपन्या आहेत कोणत्याही एका कंपनीसाठी काम करता येते.
वरिल चारहि एजन्सीज घेउन उत्तम सेवा व प्रमाणिकपणे काम केल्यास एक उत्तम व्यवसाय संधी आहे.
५) इंटरनेट द्वारे गुगलचे साह्याने पैसे मिळवणेः
• यासाठी मात्र आर्थिक तसेच श्रमाची गुंतवणूक करावी लागते.
• प्रथमता तुमची एका चांगल्या विषयावरची वेब साइट बनविणे आवश्यक आहे.
• नंतर गुगल अॅडसेन्स मार्फत त्यावर जाहिराती कराव्या लागतात. या जाहिराती गुगलच तुम्हाला देते व त्या जाहिरातींवर लोकानी टिचकी ( क्लिक) मारली कि तुम्हाला गुगल मार्फत पैसे खात्यात जमा होतात. सध्या यातून फार मोठे उत्पन्न मिळत नाहि. पण वरखर्चाला थोडे पैसे मिळतात.
• नंतर ते संकेतस्थळावर लोक येण्यासाठी व नैसर्गीक ट्रॅफिकसाठी तिचे प्रमोशन करणे गरजेचे असते. त्यासाठी बरेच मार्ग आहेत जसे कि निरनिराळ्या संकेतस्थळांवर लेख लिहिणे, जास्तीत जास्त सर्च इंजिनचे साइटसवर व डिरेक्टरिमधे आपल्या साइटची नोंद करणे इ. बरेच प्रकार आहेत व हे सारे मोफत होते वेळ मात्र द्यावा लागतो.
• तुमचे साइटवर सुरुवातिला फारच कमी लोकं येतिल पण नंतर मात्र जेव्हा रोज सरासरि १०००० पेक्षा जास्त लोकं येवू लागतिल तेव्हा मात्र तुम्हाला एक चांगले उत्पन्न मिळू शकते.
६) इंटरनेटचे माध्यमातून प्रोडक्ट अथवा सेवा विकणेः
• यासाठी मात्र आर्थिक तसेच श्रमाची गुंतवणूक करावी लागते.
• प्रथमता तुमची एका चांगली व आकर्षक वेब साइट बनविणे आवश्यक आहे.
• त्या संकेत स्थळावर खरेदि करता येवू शकेल असे काहि लोकांचे गरजेची वस्तू विकावयास ठेवणे व त्या वस्तूची संपूर्ण माहिति त्या संकेतस्थळावर ठेवणे आवश्यक आहे.
• पैसे आपल्या बॅंक खात्यात वर्ग करण्याची सुविधा, क्रेडिट कार्ड द्वारा खरेदि करण्याची सुविधा असे विविध पर्याय देणे गरजेचे असते.
वरिल कोणत्याहि एका अथवा सर्वच प्रकारांचा वापर करुन जादा उत्पन्न मिळवता येवू शकते यासाठी तुमचा सध्याचे नोकरि धंद्यातून थोडा वेळ काढून व सुटिचे दिवशी काम करुन सुरवात करता येवू शकते व एकदा का जम बसला व आत्मविश्वास आला कि हा पूर्णवेळेचा व्यवसाय करता येवू शकेल.
ज्यांचेकडे पैसा आहे किंवा नियमित गुंतवणूक थोडि का होईना करण्याची क्षमता व तयारि आहे त्यानी म्युचल फंडात गुंतवणूक करावी दिर्घ मुदतित का होईना निश्चित श्रीमंत व्हाल आणि याची सुरुवात तर दर महा रु॥५०० ते कितीहि रकमेने करता येते. गुजराथी समाजाने शेअरबाजाराचा अतिशय चांगला उपयोग करुन घेतला आहे.
शेअर बाजारातून पैसे मिळविणे
बाजाराचे अचूक भाकित कोणालाच करणे शक्य नसते मात्र त्यातिल अनिश्चिततेचा स्वीकार केला तर फार त्रास होत नाहि॥ बाजारात एकदम गुंतवणूक न करता २० टक्के सुरुवातिला गुंतवले व नंतर नियमित पणे जेव्हा जेव्हा बाजार ३ टक्के खाली येतो त्यावेळी १० टक्के रक्कम गुंतवत गेलो तर सरासरिचा फायदा मिळतो याबाबत तुमचे प्रश्न विचारा म्हणजे सांगत जातो॥
येथे एवढिच माहिति पुरी करतो बाकी साद प्रतिसादातून.
प्रतिक्रिया
4 Jul 2009 - 7:27 pm | अनंता
विशेषत: ज्यांच्याकडे फारसे भागभांडवल नाही अशांना फारच उपयुक्त. अजून अशाच प्रकारची काही माहिती असेल तर येऊ द्यात समोर.
एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
4 Jul 2009 - 7:36 pm | सदानंद ठाकूर
जरुर देवू
सदानंद
4 Jul 2009 - 8:28 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
5 Jul 2009 - 8:35 am | सनविवि
+१.
5 Jul 2009 - 1:39 am | तर्री
ठाकुर साहेब , एक अतिशय वेगळा , छान दुवा. जगात खूप "सम्रुध्दी" आहे . पण लक्षात कोण घेतो?
5 Jul 2009 - 2:12 am | पक्या
छान उपयुक्त माहिती. धन्यवाद.
विना भांडवल असे अजून काही मार्ग असतील तर जरूर सांगा.
5 Jul 2009 - 3:49 am | विकास
लेख माहीतीपूर्ण आहे आणि आवडला.
एक छोटीशी सुधारणा मथळ्यात सुचचाविशी वाटते:"सचोटिने व नीतीमत्तेने जादा पैसे मिळवण्याचे मार्ग." असे म्हणायच्या ऐवजी "कमी अथवा भांडवल न घालता करता येणारे उद्योगधंदे" अशा अर्थाचे काहीतरी लिहीले पाहीजे असे वाटते. त्यामुळे लेखाचा उद्देश मथळ्यावरून अधिक समजू शकेल.
5 Jul 2009 - 7:35 am | सुनील
सहमत.
बहुधा जादा पैसे = लांडीलबाडी हे समीकरण मराठी मनांत फिट्ट बसलेले असावे!
अजूनही सुचना याव्यात. सध्याच्या मंदीच्या काळात (किंवा एरवीही) उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असणे योग्यच.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Jul 2009 - 9:02 am | विसोबा खेचर
धन्यवाद ठाकूरसाहेब, छान माहिती...
१) विमा प्रतिनिधी म्हणून काम करणे:
मी हे काम करतो...
आपला,
विमा प्रतिनिधी,
भारतीय आयुर्विमा महामंडळ.
5 Jul 2009 - 12:25 pm | रामदास
विमा प्रतिनिधी म्हणून काम करणे: माझ्या संघात एकूण पाच विमा प्रतिनिधी पूर्णवेळ आणि अकरा जण अंशकालीन काम करतात.
पूर्णवेळ काम करणार्यांचे मासीक उत्पन्न सरासरी ४५००० आहे आणि इतरांचे पंधरा ते विस हजार आहे. ही माझी दुसरी फळी आहे.दहा वर्षापूर्वी ज्यांनी काम बंद केके त्यांचे पण उत्पन्न अजूनही सरासरी आठ हजार आहे.या प्रतीनिधींची काही वैशिष्ट्ये: १ या सगळ्यांची सतत काम करायची तयारी होती.
२ यांच्या सर्व कुटुंबीयांनी त्यात सहभाग घेतला होता.उदा :कॉलेजला जाणारी त्यांची मुलं दुपारी ऑफीस सांभाळतात. बारीक सारीक आणि वेळखाऊ काम संपवतात.
३ कायम नविन कौशल्य मिळवली.यापैकी एक माझ्या मित्राच्या वेअरहाउस वर साडेसहाशे रुपयावर काम करायचा.इंग्रजीचा गंध नव्हता.आता इंग्रजी सहीत मराठी वर हुकमत आहे.कुटुंब आता मुंबईत आहे.मुलगी पण आता हेच काम करते.यांचे मासीक उत्पन्न ८०००० आहे.
खेदाची गोष्ट अशी की माझ्या संघातील एकही यशस्वी अभिकर्ता मराठी नाही.दोन -तीन वर्ष काम करून सोडून गेले.त्यापैकी काहीजण म्युच्युअल फंडाचे काम करतात.पण ते सुध्दा जेमतेमच.
5 Jul 2009 - 7:50 pm | तर्री
तेच म्हणायाचे होते , "पण लक्षात कोण " घेतो ?"
5 Jul 2009 - 9:37 am | सदानंद ठाकूर
प्रश्न उत्तर स्वरुपात चर्चा घडल्यास अधिक माहिती समोर येवू शकेल. तसेच ज्याना अन्य पर्याय माहित आहेत त्यानी तेहि सुचवावेत.
सदानंद
आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करा.
मला अन्यत्र भेटण्याची जागा
5 Jul 2009 - 3:23 pm | पात्र
शेअर बाजार आणि त्यातिल अन्य पर्याय जर तुम्हाला थोडे ज्ञान असेल आणि थोडी गुन्तव्नणुक करु शकत असाल तर अगदि उत्तम आहेत. पण हे सचोटिने व नीतीमत्तेने जादा पैसे मिळवण्याचे मार्ग
आहेत का?
5 Jul 2009 - 5:04 pm | सहज
आता सचोटी व नितीमत्ता हे शब्द वापरल्यामुळे हा प्रश्न
किती विमा एजंट, पॉलीसी विकताना पॉलीसी विकत घेणार्याला स्पष्ट सांगतात की विमाधारक जितके पैसे गुंतवत आहे त्याती नेमकी किती रक्कम एजंट, किती रक्कम विमा कंपनीला मिळते व राहीलेली किती रक्कम नेमकी गुंतवली जाते.
विमा विकला जात नाहि विकावा लागतो, हे वाक्य बरेच सांगून जाते.
छोटेखानी लेख आवडला.
5 Jul 2009 - 6:42 pm | एकलव्य
सर्वप्रथम सदानंद ठाकूर यांचे उपयुक्त लेखाबद्दल आभार.
सहजरावांचा प्रश्नही चांगला वाटला. सदानंद लिहितात त्याप्रमाणे एजंटला २०% इतके कमिशन मिळते हे ऐकून विमा पॉलिसीचे (होपफुली नॉनपॉन्झी!) गणित चालते कसे याची उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणी प्रकाश टाकू शकेल काय?
5 Jul 2009 - 7:14 pm | सदानंद ठाकूर
सर्व माहिति जसे कि प्रारंभि आकार कमिशन किती मिळतयो विमा योजनेच वैशिष्टे तसेच आपण ग्राहकाला विम्याची किति गरज आहे इ गोष्टी पहाणे व समजावून सांगणे हे विमा प्रतिनिधिने करावे अशी नियमावलि आहे व जर एखाद्या विमा प्रतिनिधिने अशी माहिति दिली नाही हे पॉलिसी हातात आल्यावर आढळून आले तर ग्राहक ती पॉलिसी २० दिवसात विमा कंपनीला परत करु शकतो व त्याला संपूर्ण रक्कम परत करणे विमा कंपनीवर बंधनकारक असते.
अर्थात ग्राहकानेहि जो दिर्घ मुदतिची विमा योजना घेतो सतर्क रहाणे अपेक्षीत आहे आपली विमा गरज पाहुन व तौलनिक अभ्यास करुन विमा योजना स्वीकारली पाहिजे. तसे पाहिल्यास किमान तरुण व्यक्तिने तरि विमा घेताना टर्म इंशुरन्स घ्यावा व गुंतवणूक आपले धोका स्विकारणेचे क्षमतेनुसार करावी. खर पाहिले असता आपलेवर अवलंबुन असणारे व्यक्तिना जर आपला अकाली मॄत्यु झाला तर जेवढे त्याना ते आर्थिकदॄष्टा स्वावलंबी होईपर्यंत व्याजाचे रुपाने उत्पन्न मिळत रहावे तसेच आपली जर काहि कर्जे वगैरे असतिल तर त्यांचीहि परतफेड विम्याचे येणारे क्लेम मधून भागावेत अशी योजाना ग्राहक व विमा प्रतिनिधीने एकत्र बसून ठरवली पाहिजे व ग्राहकाला ज्ञान नसेल तर ते समजावून सांगणे विमा प्र चे कामच आहे. जीवन विमा हा प्रत्यकानेच तरुण पणीच घेणे फायदेशिर असते. बहुतांशी ५०शी नंतर सर्वसामान्यपणे कर्जे व आर्थिक जबाबदा-या संपलेल्या असतात (किमान त्या संपलेल्या असाव्यात असेच आर्थिक नियोजन प्रत्येकाने तरुणपणापासूनच करावे) आणि म्हणुन ५०शि नंतर विमा घेण्याची आवश्यकता नसते तेव्हा कमितकमी धोका असणारे साधनात गुंतवणूक करावी.
गुंतवणूकिची अनेक तत्वे आहेत त्यातिल एक सोप सांगण्याचा प्रयत्न करतोः
विमा व गुंतवणूक गल्लत करु नये.
तरुण पणी धोका स्विकारण्याची सर्वाधीक क्षमता असते काऱण उर्वरित काळ जास्त असतो.
जेवढे आजचे वय आहे तेवढ्या प्रमाणात कमि जोखिम साधनात गुंतवणुक करावी जसे कि बॅंक पोष्ट सरकारि रोखे इ व उर्वरित रक्कम शेअर बाजारात. मात्र बाजाराचे ज्ञान नसल्यास म्युचल फंडात गुंतवावी उदा वय २७ तर २७ टक्के सुरक्षीत साधनात व ७३ टक्के ज्यात भरपूर परतावा मिळण्याची शक्यता आहे पण बाजाराचा धोकासुध्दा आहे अशा प्रकारे गुंतवणुक करावी जसे जसे वय वाढत जाईल तस तसे शेअर बाजारात गुंतवणूक कमि करत न्यावी व सुरक्षीत गुंतवणूक वाढवत जावी.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना मागिल कामगिरि पाहूनच गुंतवणूक करावी.
आणी दुसरे एक तत्व महत्वाचे म्हणजे मी कायम फायदाच मिळवेन त्याची तंत्रे समजावून घ्या.
विषयांतर झाले पण सचोटि व नीती उल्लेख आला म्हणूनच अन्यथा हा पुर्णतः वेगळा विषय आहे॥
सदानंद
आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करा.
मला अन्यत्र भेटण्याची जागा
5 Jul 2009 - 7:53 pm | नितिन थत्ते
सहज यांनी एजंटच्या कमिशनबद्दल लिहिले आहे त्या निमित्ताने.
एजंटला किती कमिशन मिळते हे कोणीच कुठल्याच धंद्यात सांगत नाही. उदा. वस्तूंचा डीलर, पोस्टाचे एजंट वगैरे. तसे सांगण्याची आवश्यकता काय हे कळले नाही. (टाटा आपल्याला नॅनोच्या १ लाखाचा ब्रेकअप थोडेच देतात? मटेरिअल इतके, कामगारांचे पगार इतके, डीलरचे कमिशन इतके, नफा इतका वगैरे)
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
5 Jul 2009 - 8:12 pm | प्राजु
अतिशय माहितीपूर्ण लेख.
आणखीही येऊद्यात. :)
बर्याच गुंतागुंतीच्या गुंतवणूकांबद्दल शंका निरसन होईल आपल्या लेखांतून. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Jul 2009 - 9:46 pm | सदानंद ठाकूर
आपला ब्लॉग पाहिला चांगला आहे
ब्लॉग द्वारे सुध्दा इंटरनेटचे माध्यामातून पेसे मिळविता येवू शकतात तो लोकप्रिय करणे गरजेचे असते तो कसा करावा वगैरे तुम्हि मार्गदर्शन करावे असे वाटते॥
सदानंद
आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करा.
मला अन्यत्र भेटण्याची जागा
5 Jul 2009 - 10:01 pm | वर्षा
नमस्कार, अतिशय माहितीपूर्ण धागा आहे.
वरील लिस्टमध्ये अजून एका उद्योगाची भर टाकते. घरबसल्या भाषांतरे करुन देणे ज्याला फ्रीलान्स ट्रान्सलेटींग म्हणतात. मी स्वतः याच क्षेत्रात आहे. थोडक्यात सांगते,
१) यासाठी परदेशीच भाषा आली पाहिजे असं काही नसतं. तुम्ही भारतीय भाषांमध्येही ही सेवा देऊ शकता. त्यालाही खूप मागणी असते. यामध्ये टेक्निकल डॉक्युमेंटस पासून 'जनरल' प्रकारात मोडणार्या इतर गोष्टी (उदा. इमेल्स, पत्रे, जन्मदाखला, डिग्री सर्टीफिकेट्स) अश्या असंख्य गोष्टी मोडतात.
२) घरी काँप्युटर असणे आवश्यक आहे.
३) यामध्ये बहुतेक वेळेस प्रत्येक शब्दाला (सोअर्स किंवा टार्गेट) अमुक अमुक पैसे/रुपये यानुसार दर ठरवले जातात. आता जपानी-इंग्रजी भाषांतरासाठी भारतामध्ये साधारण प्रति इंग्रजी शब्द १ किंवा २ रुपये असा दर प्रचलित आहे.
४) सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा घरबसल्या करता येण्यासारखा उद्योग असल्याने नोकरी न करणार्या गृहिणीं, विद्यार्थी यांना हा उत्तम पर्याय आहे. नोकरी करणार्यांना विकेंडला काम करता येऊ शकतं.
सध्या इतकंच. कोणाला अजून माहिती हवी असल्यास सांगू शकते.
6 Jul 2009 - 11:08 am | रामदास
माझा एक मित्र उमांग धोलाभाई पूर्ण वेळ हे काम करतो. गुजराथी-इंग्रजी -गुजराथीचे काम करतो. काम इतके मुबलक प्रमाणात मिळते की काही दिवसात सतत अठरा तास काम करावे लागते.
त्यांच्यासोबत माझे बोलणे झाले तेव्हा कळले की मृदुला नावाची एक मुलगी मराठी भाषांतराचे काम करते आणि त्या क्षेत्रात नाव मिळवून आहे.
गरजूंनी व्यनी केला तर काही दुवे देऊ शकेन.
5 Jul 2009 - 10:06 pm | चतुरंग
पैसे मिळवण्याच्या एकापेक्षा जास्त संधींचा फायदा प्रत्येकाने घ्यायला हवा. फक्त पगारात किंवा ठराविक मासिक रकमेत अल्पसंतुष्टता मानण्याचे दिवस आता संपले आहेत. भरपूर पैसा हवाच त्यात गैर काही नाही आणि तो योग्य प्रकारे मिळवण्याचे मार्गही चोखाळायला हवेत.
तुम्ही ह्या संधींची ओळख चांगल्याप्रकारे करुन दिली आहे.
मराठी माणसामधे अजूनही अर्थविषयक उदासीनता मोठ्या प्रमाणावर आढळून येते ही प्रयत्नपूर्वक काढून टाकायला हवी.
सदानंद, तुमच्या लेखामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष वेधण्याचा स्तुत्य प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद!!
(डिमॅट)चतुरंग
5 Jul 2009 - 10:11 pm | वेताळ
आपण ह्या बद्दल माहिती द्या. ह्यात प्रवेश कसा करावा. कोणत्या भाषांतराला पैशी ज्यादा मिळतात. त्या करता कोण कोणत्या भाषा येणे गरजेचे आहे. ह्या बद्दल सविस्तर माहिती द्या.वेताळ
6 Jul 2009 - 10:44 am | विजुभाऊ
मला वाटले की तुम्ही अॅम वे / व्हर्साटाईल / जपान लाईफ या सारख्या
भन्नाट (?) भन्नाट आयडीया मांडताय.
6 Jul 2009 - 11:20 am | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ
ते काय सचोटीने पैसे मिळवण्याअचे मार्ग आहेत. स्वतःला अव्वाच्या सव्वा फायदा व्हावा म्हणून आपल्या ओळखीच्यांना महागड्या वस्तू घ्यायची गळ घालायची हे सचोटीचे असते काय?
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
6 Jul 2009 - 11:05 am | सखाराम_गटणे™
मला पण विमा घ्यायचा आहे. कोणी अभिकर्ता उत्सुक असल्यास लगेच घेउन टाकु.
6 Jul 2009 - 12:58 pm | कुंदन
कृपया टारझनशी संपर्क साधा.
तो अस्थि तसेच दंत विमा उतरवुन देईल.
6 Jul 2009 - 11:21 am | रामदास
हा एक वेगळाच व्यवसाय आहे जो कमी भांडवलात आणि कमी जागेत करता येतो.पडतर हा शब्द येथे सरप्लस या अर्थानी वापरला आहे.
निर्यातदारानी तयार केलेला जादा माल सत्तर ते पंचाहत्तर टक्के कमी भावात मिळतो.एका वेळी एक लॉट घ्यावा लागतो.
मी स्वत: श्याम अहुजाच्या कार्पेटचा लॉट घेऊन सुरुवात केली होती.
शोरूम प्राईस ५५०० आणि माझी विक्री किंमत ९५०.तरी सुद्धा मला ३५० नफा मिळत होता.हे एक उदाहरण झाले.बरेच लोक याची तुलना स्क्रॅप डीलरच्या कामाशी करतात. ते अर्थातच चुकीचे आहे.
हा व्यवसाय मी संडेबझार या स्वरुपात केला होता.दुकान फक्त विकांताला उघडायचो.या व्यवसायता स्पर्धा फार कमी आहे.रोख खरेदी -रोख विक्री .किंमतीचा फरकामुळे गिर्हाईकांचा तुटवडा नाही.
अमेरीकेत हा व्यवसाय जोरात चालतो.शेल्फ पुल आउट-क्लोजर वगैरे पण भारतात आताशा कपडा व्यवसायात ही सुरुवात झाली आहे.अधीक माहीती व्यनी करून मागवावी.
8 Jul 2009 - 9:44 am | मि.इंडिया
श्री. रामदास साहेब
पडतर मालाचा व्यापार याबाबतची अधिक माहिती हवी आहे. पण व्यनीची सुविधा नसल्याने त्याऐवजी इमेलवर द्याल का? कॄपया pradeepbodas@hotmail.com वर संर्पक करा. अथवा आपला email द्या, मी मेल करीन.
8 Jul 2009 - 12:37 pm | हर्षद बर्वे
अजून एक चांगला मार्ग आहे, रिअल इस्टेट एजंट,
मी हा व्यवसाय पूर्ण वेळ करतो, पण सुरू केल्यावर स्थिरस्थावर होण्यास;इतर एजंट सर्कल मधे व्यावसायिक संबंध दृढ होण्यास २-३ वर्षे तरी लागतात.
परंतू नोकरी करणारे लोक गुडविल मिळवू शकतात. म्हणजे त्यांच्या ओळखीच्या गरजू(घर विकू/खरेदी करू ईच्छित) व्यक्तींशी आमचा संपर्क करून द्यायचा आमच्या तर्फे त्यांचे काम झाल्यास एजंटच्या वाट्याला आलेल्या कमिशन च्या ४ ते ५% रक्कम goodwill म्हणून मिळू शकते
(हर्षद बर्वे)
एच.बी.
8 Jul 2009 - 1:19 pm | अभिज्ञ
रिअल इस्टेट एजंट हा व्यवसाय "सचोटीने" करणा-या व्यवसायात मोडतो का असा प्रश्न मला नेहमीच पडत आलेला आहे.'
विमा एजंट वा अन्य कुठल्याही एजंट बद्दल मला काही वाटत नाही परंतु ह्या जमातीबद्दल माझे मत फारसे चांगले नाही.
ग्राहकांची फसवणुक करणे, अव्वाच्या सव्वा कमिशन आकारणे हे प्रकार सर्रास घडत असतात. अन हे सर्व कमिशन घेउनहि ही मंडळी कशालाही जबाबदार नसतात.
मागे मी घर बघत होतो, अर्थात भाड्याचेच.
इथे नवी मुंबईत एजंट लोक २ महिन्याचे भाडे त्यांची फी म्हणून घेतात. त्यांचे काम काय तर फक्त आपल्याला घर दाखवणे. अन ती माहितीहि ह्यांना बसल्या बसल्या आपसुकच मिळत असते. त्यात ह्यांना कसलाही घाम गाळावा लागत नाही. एकदा का मालकाचे व एग्रीमेंट झाले की ह्यांचा संबंध संपला. उद्या काही समस्या आल्यास तुम्ही अन घरमालक काय ते बघून घ्या अशी उर्मट उत्तरे दिली जातात.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.