मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जादा पैसे मिळवण्याच्या संधी

सदानंद ठाकूर · · काथ्याकूट
सचोटिने व नीतीमत्तेने जादा पैसे मिळवण्याचे मार्ग. पैसा हा शेवटि पैसा असतो व त्याला पर्याय नसतो. माणसाला आपल्या नेहमिचे कमाईपेंक्षा थोडे बहूत जादा पैसे सन्मार्गाने मिळावेत अशी इच्छा असते फक्त अशांसाठिच हा लेखन प्रपंच: यासाठि तुमच्याकडे भांडवल नसले तरि चालू शकते मात्र इच्छा शक्ति व कष्ट करण्याची तयारि हवीच त्याला पर्याय नाही. नेहमी ध्यानात ठेवा पैसा हे सर्वस्व नव्हे पण असे नॉनसेन्स प्रतिपादन करण्यापूर्वी तो तुम्ही भरपूर प्रमाणात मिळवला आहात याची खात्री करा (“Always remember money isn’t everything but make sure that you’ve made lot of it before talking such nonsense” – Warren Buffet) – World’s richest person – Business – Share Trading – Total valuation more that Rs.5 Lac Corores. १) विमा प्रतिनिधी म्हणून काम करणे: • हा व्यवसाय किचकट व कनिष्ट वाटला तरि यात पैसे थोडे ते भरपूर मिळवण्याची ताकद आहे. • ब-याच कंपन्या आहेत कोणत्याही एका कंपनीसाठी काम करता येते. • विक्रीचे फार मोठे कौशल्य नसले तरि चालेल मात्र चिकाटी, प्रामाणिकपणा, संयम व समोरच्याने नाहि म्हटले तर, तू नहि तो और सहि अशी प्रवॄत्ती एवढे गुण असायलाच हवेत. आणि हे सारे गुण प्रयत्नसाध्य आहेत. • विम्याचा सरासरि वार्षीक हप्ता रु. २०००० ते १ लाख एवढा असतो व सरासरि कमिशन २० टक्के असते. • एजन्सी चालू रहाण्यासाठी किमान १२ पॉलिसी वर्षात कराव्या लागतात म्हणजे काहि फार नाहित. • म्हणजे फक्त एजन्सी चालू ठेवली तरि वर्षाला ४८००० ते २४०००० कमिशन पहिल्या वर्षाचे होते रिन्युअल कमिशन ४ टक्के प्रमाणे दर वर्षी वाढतच जाते. • आज देशात वार्षीक एक कोटी पेक्षा जास्त कमिशन मिळवणारे शेकडो विमा प्रतिनिधि आहेत. • विमा विकला जात नाहि विकावा लागतो. २) म्युचल फंड वितरक • विम्यापेक्षा विकावयास सोपा. • बाजारात जवळपास ३२ म्युचल फंड कंपन्या आहेत एकाचवेळी सर्वांसाठी काम करता येते. • कमिशन २ ते २॥५ टक्केच मिळते. १ आगस्ट २००९ पासून हे मिळणार नाहि तुम्हाला गुंतवणूकदारांकडूनच फि घ्यावी लागेल. • परंतु यावर दर साल गुंतवणूकिचे एकूण बाजार मुल्यावर सरासरि ०.५ टक्के दराने ट्रेल कमिशन मिळते म्हणजेच एकदा का तुमचे मार्फत झालेल्या गुंतवणूकिचे एकूण बाजारमुल्य मुल्य १०० कोटी झाले कि तुम्हाला वार्षीक रु ५० लाख उत्पन्न जोपर्यंत गुंतवणूक आहे तो पर्यंत मिळत रहाते व बाजारमुल्य तर नेहमिच कमी जास्त होत असते. ३) अन्य गुंतवणूकिची साधने विकणे • रिझर्व्ह बॅकेचे बॉंड, सरकारि रोखे, पीएमएस, खाजगी कंपन्यांचे कर्ज रोखे इ ४) जनरल इंशुरन्स विकणे • ब-याच कंपन्या आहेत कोणत्याही एका कंपनीसाठी काम करता येते. वरिल चारहि एजन्सीज घेउन उत्तम सेवा व प्रमाणिकपणे काम केल्यास एक उत्तम व्यवसाय संधी आहे. ५) इंटरनेट द्वारे गुगलचे साह्याने पैसे मिळवणेः • यासाठी मात्र आर्थिक तसेच श्रमाची गुंतवणूक करावी लागते. • प्रथमता तुमची एका चांगल्या विषयावरची वेब साइट बनविणे आवश्यक आहे. • नंतर गुगल अॅडसेन्स मार्फत त्यावर जाहिराती कराव्या लागतात. या जाहिराती गुगलच तुम्हाला देते व त्या जाहिरातींवर लोकानी टिचकी ( क्लिक) मारली कि तुम्हाला गुगल मार्फत पैसे खात्यात जमा होतात. सध्या यातून फार मोठे उत्पन्न मिळत नाहि. पण वरखर्चाला थोडे पैसे मिळतात. • नंतर ते संकेतस्थळावर लोक येण्यासाठी व नैसर्गीक ट्रॅफिकसाठी तिचे प्रमोशन करणे गरजेचे असते. त्यासाठी बरेच मार्ग आहेत जसे कि निरनिराळ्या संकेतस्थळांवर लेख लिहिणे, जास्तीत जास्त सर्च इंजिनचे साइटसवर व डिरेक्टरिमधे आपल्या साइटची नोंद करणे इ. बरेच प्रकार आहेत व हे सारे मोफत होते वेळ मात्र द्यावा लागतो. • तुमचे साइटवर सुरुवातिला फारच कमी लोकं येतिल पण नंतर मात्र जेव्हा रोज सरासरि १०००० पेक्षा जास्त लोकं येवू लागतिल तेव्हा मात्र तुम्हाला एक चांगले उत्पन्न मिळू शकते. ६) इंटरनेटचे माध्यमातून प्रोडक्ट अथवा सेवा विकणेः • यासाठी मात्र आर्थिक तसेच श्रमाची गुंतवणूक करावी लागते. • प्रथमता तुमची एका चांगली व आकर्षक वेब साइट बनविणे आवश्यक आहे. • त्या संकेत स्थळावर खरेदि करता येवू शकेल असे काहि लोकांचे गरजेची वस्तू विकावयास ठेवणे व त्या वस्तूची संपूर्ण माहिति त्या संकेतस्थळावर ठेवणे आवश्यक आहे. • पैसे आपल्या बॅंक खात्यात वर्ग करण्याची सुविधा, क्रेडिट कार्ड द्वारा खरेदि करण्याची सुविधा असे विविध पर्याय देणे गरजेचे असते. वरिल कोणत्याहि एका अथवा सर्वच प्रकारांचा वापर करुन जादा उत्पन्न मिळवता येवू शकते यासाठी तुमचा सध्याचे नोकरि धंद्यातून थोडा वेळ काढून व सुटिचे दिवशी काम करुन सुरवात करता येवू शकते व एकदा का जम बसला व आत्मविश्वास आला कि हा पूर्णवेळेचा व्यवसाय करता येवू शकेल. ज्यांचेकडे पैसा आहे किंवा नियमित गुंतवणूक थोडि का होईना करण्याची क्षमता व तयारि आहे त्यानी म्युचल फंडात गुंतवणूक करावी दिर्घ मुदतित का होईना निश्चित श्रीमंत व्हाल आणि याची सुरुवात तर दर महा रु॥५०० ते कितीहि रकमेने करता येते. गुजराथी समाजाने शेअरबाजाराचा अतिशय चांगला उपयोग करुन घेतला आहे. शेअर बाजारातून पैसे मिळविणे बाजाराचे अचूक भाकित कोणालाच करणे शक्य नसते मात्र त्यातिल अनिश्चिततेचा स्वीकार केला तर फार त्रास होत नाहि॥ बाजारात एकदम गुंतवणूक न करता २० टक्के सुरुवातिला गुंतवले व नंतर नियमित पणे जेव्हा जेव्हा बाजार ३ टक्के खाली येतो त्यावेळी १० टक्के रक्कम गुंतवत गेलो तर सरासरिचा फायदा मिळतो याबाबत तुमचे प्रश्न विचारा म्हणजे सांगत जातो॥ येथे एवढिच माहिति पुरी करतो बाकी साद प्रतिसादातून.

वाचन 18576 प्रतिक्रिया 0