! पांडुरंग !

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
29 Jun 2009 - 7:28 am

आली आली बघा
पंढरीची वारी
भेट उराउरी
पांडुरंग !

आनंद सोहळा
क्षण हा विरळा
सौभाग्याचा मेळा
पांडुरंग !

सगुण निर्गुण
दोहोंचे मिलन
मन वा "नमन"
पांडुरंग

काय माझे नाव
काय माझे गाव
मला फक्त ठाव
पांडुरंग !

जाहलो निशब्द
थांबले भजन
नाद सनातन
पांडुरंग !

चाललो चाललो
आता नाही येणे
श्वासांचे थांबणे
पांडुरंग !

कविता

प्रतिक्रिया

सहज's picture

29 Jun 2009 - 7:34 am | सहज

पांडुरंग, पांडुरंग

क्रान्ति's picture

29 Jun 2009 - 7:36 am | क्रान्ति

अप्रतिम प्रासादिक रचना!
सगुण निर्गुण
दोहोंचे मिलन
मन वा "नमन"
पांडुरंग
काय माझे नाव
काय माझे गाव
मला फक्त ठाव
पांडुरंग !
वारक-यांच्या मनःस्थितीचे अत्यंत समर्पक वर्णन!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

विसोबा खेचर's picture

29 Jun 2009 - 7:46 am | विसोबा खेचर

सुंदर, प्रासादिक रचना..!

तात्या.

प्रमोद देव's picture

29 Jun 2009 - 8:56 am | प्रमोद देव

सहजसुंदर रचना!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

पक्या's picture

29 Jun 2009 - 11:28 am | पक्या

>>सुंदर, प्रासादिक रचना..!

हेच म्हणतो.

रामदास's picture

29 Jun 2009 - 11:34 am | रामदास

घरबसल्या वारीचा आनंद.

दिपक's picture

29 Jun 2009 - 12:00 pm | दिपक

आनंद सोहळा
क्षण हा विरळा
सौभाग्याचा मेळा
पांडुरंग !

अप्रतिम..
"बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठ्ल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की, जय"... :)

विशाल कुलकर्णी's picture

29 Jun 2009 - 12:46 pm | विशाल कुलकर्णी

सुरेख ! विठुरंगी रंगलो, अवघे विठुची जाहलो ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223

अवलिया's picture

29 Jun 2009 - 7:49 pm | अवलिया

सु रे ख !!!

--अवलिया

मदनबाण's picture

29 Jun 2009 - 8:09 pm | मदनबाण

काय माझे नाव
काय माझे गाव
मला फक्त ठाव
पांडुरंग !

व्वा. सुरेख. :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

राघव's picture

30 Jun 2009 - 12:04 pm | राघव

असेच म्हणतो.
खूप छान रचना :)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2009 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली रचना !

लिखाळ's picture

29 Jun 2009 - 9:53 pm | लिखाळ

वा! सुंदर रचना...

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

चन्द्रशेखर गोखले's picture

30 Jun 2009 - 12:57 am | चन्द्रशेखर गोखले

मनापासून दिलेल्या प्रतिसादा बद्दल आभार !

प्राजु's picture

30 Jun 2009 - 9:38 pm | प्राजु

अतिशय सुंदर!!!
खूप खूप आवडला अभंग. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धोंडोपंत's picture

1 Jul 2009 - 1:15 pm | धोंडोपंत

अतिशय सुंदर. अप्रतिम अभंग.

सोनम's picture

1 Jul 2009 - 9:21 pm | सोनम

रचना अप्रतिम आहे. :)