स्वर्ग

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
22 Jun 2009 - 9:25 am

आज मंद वार्‍यातुनी वाजते बासरी
सख्या हाय गात्रांतुनी धुंद ही शिरशिरी

निरवताही डोलते वारियाच्या सवे
तुझ्या स्वरांसवे धरा छेडिते सतारी

रंग सृष्टीचे बघ जाहले कृष्ण निळे
अन व्योमात सामावूनी उरला श्रीहरी

हरिच्या सुरांतुनी मनी प्रित झिरपते
तयांसवे डोलते मुग्ध राधिका लाजरी

खुळावल्या गोपिका रास वृंदावनी
जिभ वेडावूनी बघ चिडवितो मुरारी

अंतर गगनधरेतले गेले विरघूनी
चांदण्यात अवतरे स्वर्ग यमुनातीरी

विशाल

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

22 Jun 2009 - 8:11 pm | पाषाणभेद

"खुळावल्या गोपिका रास वृंदावनी
जिभ वेडावूनी बघ चिडवितो मुरारी"

कलर्स वाहिनीवरील छोटा "क्रिष्णा" आठवला.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)