तू परत येणार नाहीस हे
मला केव्हाच कळलं आहे
माझं वेड मन मात्र अजून
तसं तुझ्यातच गुंतलं आहे
माझाच मूर्खपणा होता तो
सारं काही गृहीत धरलं मी
डोळे मिटून अंधा~या रात्री
झणी शिडात वारं भरलं मी
कसा दोष तसा देऊ तुला मी
तुझं तसं काहीच चुकलं नाही
पण मी तरी सांग काय करू
पापण्यांवरचं पाणी सुकलं नाही
कशीही होवो तशी माझी अवस्था
तुझंच भलं असेल मनात माझ्या
हसेन इथे मी लपवून आसवाना
जखमा असतील जरी मनात ताज्या
जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू
फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा
पडतील जिथे जिथे पाउले तुझी,
असू दे हळूवार मखमलि गालीचा
प्रतिक्रिया
14 Feb 2008 - 10:06 am | धनंजय
म्हणजे कवीच्या मनातली लय समजेल, आणि आस्वादाचा आनंद वाढेल.
15 Feb 2008 - 2:30 am | प्राजु
जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू
फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा
पडतील जिथे जिथे पाउले तुझी,
असू दे हळूवार मखमलि गालीचा
या ओळी छान आहेत.
- प्राजु
15 Feb 2008 - 3:44 am | ऋषिकेश
कविता ठिक वाटली.
याच शीर्षक मात्र खूप आवडलं (अर्थात त्याच्या नजरेतून ती...)
हा अर्थात फार महत्वाचा वाटतो :) या "अर्थात" मुळे बर्याच दिवसांपासून पडलेले प्रश्न पुन्हा आठवले.
15 Feb 2008 - 9:06 am | विसोबा खेचर
कशीही होवो तशी माझी अवस्था
तुझंच भलं असेल मनात माझ्या
हसेन इथे मी लपवून आसवाना
जखमा असतील जरी मनात ताज्या
क्या बात है...!
जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू
फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा
पडतील जिथे जिथे पाउले तुझी,
असू दे हळूवार मखमलि गालीचा
वा सतिश! अगदी हृदयाला हात घातलास रे!
जियो..!
तात्या.