पेंगुळल्या आता गर्द सावल्या,
फांदीसवे रे झुकली सांज!
धुंदावल्या डोळ्यांत माझ्या,
चढली आहे कसली झांज?
अन कंटाळले रे इंद्रधनूही,
प्रिया तू येशील का रे आज?
बघ धुंद करी तो मृदगंधही,
ल्याली धरणी अवघा साज!
मिलनास तुझीया सिद्ध धरा,
तूज कसला रे चढला माज!
चल वरूणा झडकरी ये रे,
मी वाट पाहते सोडूनी लाज!
विशाल
प्रतिक्रिया
10 Jun 2009 - 11:08 pm | Dhananjay Borgaonkar
एवढ्या प्रेमाने बोलावल्यावर का नाही येणार???
11 Jun 2009 - 10:04 am | विशाल कुलकर्णी
धनुभौ तुमच्याबरोबर त्या पावसाला पण आणा :-) धन्स.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120