माझा प्रत्येक निवांत क्षण तसा
तुझ्याच आठवणींनी सजलेला
मनाचा प्रत्येक कोपरा तसा, तुझ्या
आठवणींच्या दव बिंदुत भिजलेला
अस कधीच झालं नाही तसं आधी
मी मलाच हरवून बसलो आहे आता
कळेना मला अशी काय जादू केली तू
प्रत्येक चेहरा तसा तुझाच वाटतो आता
चाहूल कुणाची जेव्हा कधी लागते मला
तू आल्याचा भास होतो मला तसा आता
पाना फुलांत, नदी ओढ्यात, सागराच्या
फेसाल लाटेतही दिसतेस् मला तू आता
कधी होवो न होवो भेट यापुढे आपली
तुझा चिवचिवाट कानात गुंजेल माझ्या
अवचित मंद झुळुक येता वार्याची
तुझं निखळ हासू कानात घुमेल माझ्या
प्रतिक्रिया
13 Feb 2008 - 7:27 pm | स्वाती राजेश
कविता छान आहे. ओळी सुद्धा सहज गाणे गुणगुणल्या सारख्या आहेत.
अवचित मंद झुळुक येता वार्याची
तुझं निखळ हासू कानात घुमेल माझ्या
मस्त तिला न पाहता ही इतकी छान ओळी सुचल्या, तिला पाहील्या वर काय ओळी सुचतील ......?
पुढील कवितेच्या प्रतिक्षेत...
13 Feb 2008 - 10:06 pm | विसोबा खेचर
सतिशराव,
अतिशय सुरेख कविता केली आहेस रे..! क्या बात है!
पाना फुलांत, नदी ओढ्यात, सागराच्या
फेसाल लाटेतही दिसतेस् मला तू आता
ओहोहो, खल्लास...! आपण पण साला या अनुभवातून गेलो आहोत बरं का सतिशशेठ..! अब क्या बताऊ आपको हमारी दर्दभरी कहानी!.. जाने दो...!
अतिशय सुंदर कविता सतिशराव, और भी ज़रूर लिखना..
तात्या.
14 Feb 2008 - 10:17 am | सतिश गावडे
तात्या,
सतीषराव वगैरे म्हणत जाउ नका... कदाचित मी तुमच्यापेक्षा खूपच लहान असेल.
असो...
बाकी, तुमच्या प्रतिक्रियेमुळे लिखाणास हुरूप आला...
आमच्या वेड्या वाकड्या लेखनावर आपलं लक्ष असुद्या...
- सतीश
13 Feb 2008 - 10:51 pm | प्राजु
अवचित मंद झुळुक येता वार्याची
तुझं निखळ हासू कानात घुमेल माझ्या
या ओळी खूप आवडल्या..
- प्राजु