दाखला

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
9 Jun 2009 - 12:38 pm

ऐकताय ना ....
तिकीटपण लावुन पाहिलं,
तर मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातुन फोन आला ..
बाईसाहेब येताहेत साहेबांच्या सोबत..
दोन 'पास' तयार ठेवा..!
दुसर्‍या दिवशी समाधीशेजारी ,
तात्पुरते बंकर्स बांधण्यात आले ,
साहेब येणार दर्शनाला, सुरक्षा नको?
जन्मभर बापुंची सोबत केलीत ...,
मृत्युनंतर तात्पुरता का होईना ...
मशिनगन्सचा शेजार ...(?)
एवढी निर्घुण थट्टा...,
कोणी केली होती का हो तुमची ...?
त्या अशक्त वृद्धाबरोबर..
किती निर्धास्त, सुरक्षित होतात...!
आता शस्त्रांच्या सोबतीत..
जाणवतेय ती सुरक्षा..तो निर्धास्तपणा ..?
चला....., निदान मी तरी निर्धास्तपणे जावु शकेन
जन्म - मृत्यु कार्यालयात..,
माझ्याच जिवंतपणाचा दाखला आणण्यासाठी
पेन्शनची तारीख जवळ आलीय ना !

विशाल.

कविता

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

10 Jun 2009 - 7:38 am | चन्द्रशेखर गोखले

नेमकं वास्तव ! खूप आवडली कविता !!