(गज़ल)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
13 Feb 2008 - 6:08 am

आमची प्रेरणा माणूस१ यांची सुरेख गज़ल

मंदसा अन, निर्विकारी , बाज होता
पण तरी ही जाहला आवाज होता

पादला तो शांतपणे बघ दोन वेळा
काय हा खाऊन आला आज होता?

पाडले मीही प्रयत्ने काव्य थोडे
पण विडंबन हाच माझा बाज़ होता

आग शब्दांतील कसली डोंबलाची
खानदानी आमचा तो माज होता

तोंडदेखी वाहवा केली न माझी
येव्हढा का तो कवी नाराज होता?

लाथ थप्पड ह्या अशा आभूषणांनी
सजवला नेहमीच अमुचा साज होता

मी कशाला रोज त्या जातोय वाटे ?
हेच उत्तर, "माल गर्रेबाज होता" !

विडंबन

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

13 Feb 2008 - 6:19 am | ऋषिकेश

वाटच बघत होतो या विडंबनाची. मुळ कविता वाचल्यावर मनात आलं होतं की केशवसुमारांना छान कच्चा माल मिळाला आहे. ;)
विडंबन (फक्त) चांगले वाटले.
मात्र तुम्ही अजून मस्त काहितरी द्याल अशी अपेक्षा होती :(
असो. कदाचित मुळ गझल फारच आवडल्याने असे असेल :)

-ऋषिकेश

धनंजय's picture

13 Feb 2008 - 6:30 am | धनंजय

पण असे आधीच व्यंग्यपूर्ण कवितेचे विडंबन वाचताना तितकी मजा नाही येत, जितकी फाजिल भावुक काव्याचे विडंबन वाचताना येते.

अवांतर :
"शांतप्णे बघ्" असे वाचावे का?

धोंडोपंत's picture

13 Feb 2008 - 8:16 am | धोंडोपंत

वा केशवा वा,

विडंबन सुंदर आहे. नेहमीसारखेच. अभिनंदन

पण केशवा,

पादला तो शांतपणे बघ दोन वेळा

यात थोडं वृत्त बिघडताय रे ! कारण त्या शांतपणे या शब्दात वजन जाताय. त्यापेक्षा हे कसं वाटताय बघं.

पादला तो शांत राहुन दोन वेळा

असो. विडंबन झकास.

आपला,
(पादरा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्किट's picture

13 Feb 2008 - 8:40 am | सर्किट (not verified)

आमचे पण मत धोंडोपंतांसारखेच आहे.

सुमरपंत, तुम्हाला येत्या रविवारी आम्ही लंडन मध्ये भेटू, तेव्हा" विडंबनात वृत्ताचे महत्व" ह्यविषयी बकिंगहँम पॅलेसा समोर एक छोटेसे भाष्य करू इच्चितो.

वृत्त बिघडले की सगळी मजाच जाते त्या विडंबनाची.

आणि मुख्य म्ह्णजे, क्रास (अश्लील, नव्हे..) विडंबने टाळता आली तर अधिक उतम..

उदाहरणार्थ, आपल्या वरच्या ओळी टाळून..

देउ पवनाची बिदागी दोन वेळा..

अथवा

वायुची जाणीव देउन दोन वेळा

किंवा

मारुतीचा बाप अठवुन दोन वेळा

किंवा

दोन वेळा सोडुनी मी एस-टू-ओ
(हे उपक्रमाच्या सायंटिफिक लोकांसाठी)

असे काहीही चालले असते.

- सर्किट

बेसनलाडू's picture

13 Feb 2008 - 11:56 am | बेसनलाडू

कबूल केल्याप्रमाणेच 'पाडलेले' आहे; त्यामुळे रद्दड वाटले. त्यामुळेच वृत्त वगैरे बोलण्यातही अर्थ उरत नाही. असो.
गतलौकिकास साजेशा विडंबनाची अपेक्षा आहे.
(परखड)बेसनलाडू

धमाल मुलगा's picture

13 Feb 2008 - 12:32 pm | धमाल मुलगा

देवा !!! अरे जरा तरी काव्य समजण्यापुरती अक्कल द्यायची होतीस रे. और॑गजेबान॑तर डायरेक्ट आमचाच न॑बर? अस॑ काय पाप केल॑ होत॑ गेल्या जन्मी?
चार ओळी धड खरडायची जिथ॑ आमची बो॑ब, अश्या माणसासमोर इतक्या प्रकारची काव्य॑? बर॑ नुसती काव्य॑ नाहीत त्यावर ता॑त्रिक विश्लेषण॑ करणारे एक एक बापलोक !

च्यायला, ओ तात्या, हल्ली हल्ली मिपावर आल॑ की मला भर समार॑भात चट्ट्यापट्ट्या॑ची चड्डी अन् बिनबाह्या॑चा, पोटावर फाटलेला बनियन घालुन आल्यासारख॑ वाटायला लागल॑य. कुठ॑ क्लासबिस है का कविता शिकण्याचा (निदान समजण्याचा तरी?)


दोन वेळा सोडुनी मी एस-टू-ओ
(हे उपक्रमाच्या सायंटिफिक लोकांसाठी)

सर्किटराव, ह्याला कायम्हणतात म्हायतीये का?....हाssण तिच्याआयला !!! जियो!

आपला,
(जाळीदार टोप्या शिऊन उपजिविका करणारा)
और॑ग्या ध मा ल.

केशवसुमार's picture

13 Feb 2008 - 3:33 pm | केशवसुमार

पुन्हा असे रात्री अपरात्री एखादा शेर सुचला म्हणून अर्धवट झोपे मधे विडंबने पाडणे नाही..(जित्याची खोड....., कुत्राचे शेपुट ....,केश्या चे वृत...*******)
रसिक आणि तजज्ञ मडंळीचे प्रतिसादा बद्दल धन्यवाद..
कमी दर्जाचा माला ने आपल्या झालेल्या विरसा बद्दल क्षमस्व..
(खजिल)केशवसुमार.

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2008 - 7:45 pm | सुधीर कांदळकर

सुगरणीच्या देखील हातून कधी कधी एखदा पदार्थ बिघडतो. म्हणून नाउमेद होण्याचे कारण नाही.

पण तुमच्या गझलेत अलिकडे बरेच दिवस तुमचा हुकमी एक्क्यासारखा असणारा मक्ता दिसला नाही. असो. पुढील कवितेसाठी शुभेच्छा.