हतबल

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
8 Jun 2009 - 10:50 am

परवा एका क्लायंटला भेटायला म्हणुन "द लीला" च्या लॉबीत वाट बघत बसलो होतो. समोरच्या कोचावर एक बापलेक बसले होते. बडी असामी असणार ! पोरगी बापाला म्हणाली "डॅडी, ये बॉयफ्रेंडभी छोडके गया मुझे! " मला धक्काच बसला. ती चक्क पित्याला सांगत होती ही गोष्ट. अजुन मोठा धक्का पुढे होता, बापाची प्रतिक्रिया होती, "सो व्हॉट?". पण आवाज जरी निर्विकार असला तरी डोळे काही वेगळंच सांगत होते. त्याचे डोळे पाहून जे सुचलं ते हे....

डॅड, आय लॉस्ट माय सिक्स्थ बॉयफ़्रेंड!
ती थुलथुलीत षोडशा,
वैतागलेल्या चेहेर्‍याने,
आणि वाढलेल्या पोटाने .....
आपल्या बापाला सांगत होती !
सो व्हॉट डिअर?
लिस्ट संपली का तुझी?
माझ्या एच.आर. ऑफिसरला भेटतेस?
तो नक्कीच तुला नवीन शोधून देइल,
वाटलेच तर तात्पुरती कंपनीही देइल.
त्याच्याकडे असते लिस्ट,
डॉक्टर्सचीही...
ऑफिशिअल, अनऑफिशिअल,
दोन्ही प्रकार हाताळणार्‍या...
यशस्वीरित्या गर्भपात करणार्‍या!
त्याच्याकडे बायोडेटा देवून ठेव,
आवडी-निवडी सांगून ठेव,
भर तारुण्यातला हवा ....
की अनुभवी चालेल तुला?
रेटकार्डवर खुणा करुन ठेव.
तुझ्या आईपासुन मात्र,
जमल्यास थोडी दुरच राहा...
जमले तर काही दिवस युरोप टूरला जा,
तिला वेडीला काही पटणार नाही ...
तिला हे मानवणार नाही,
जुन्या जमान्यात वाढलेलं तिचं मन...
सुधारणांचं वारं ओळखणार नाही,
प्रवाहाबरोबर वाहणं ....
तिला काही जमणार नाही !
बाय द वे .....
तुझा एल.एस. डी. चा स्टॉक...
आहे कि संपला ?
पुढची कन्साईनमेंट मागवशील
तेव्हा माझीही आठवण ठेव....
चांगला बाप म्हणुन नाही जगू शकलो...
थोडा सुखाने मरेन म्हणतो...
माझ्यासाठी थोडंसं....
सायनाईड मागवून ठेव !

विशाल.

कविता

प्रतिक्रिया

राघव's picture

8 Jun 2009 - 11:43 am | राघव

भिडणारं लिहिलंत.

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )