आमची प्रेरणा अजय जोशी यांची रचना प्रेम
वाचकाला वाचताना कष्ट झाले पाहिजे
त्याचसाठी फक्त.. करता काव्य आले पाहिजे
मी लिहावे की नको हा प्रश्न मग उरतो कुठे?
अर्थ ओळींचे कशाला ते... कळाले पाहिजे!
'कान' हा पकडू 'नका' अपुलाच पहिल्या वाचनी
जाणण्या हे.. काव्य थोडेसे कळाले पाहिजे
तेल डोळा घालुनी ते वाचकांना सांगती..
रत्न जाली यायच्या आधी पळाले पाहिजे!
मी विडंबन पाडण्याला नेहमी आतूर पण..
चांगले मज.. काव्य एखादे मिळाले पाहिजे!
जोडले मी हात "केश्या" काव्य लिहिण्याला तुझ्या...
कोपर्या पासून मेल्या का जुळाले पाहिजे?
प्रतिक्रिया
7 Jun 2009 - 11:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी लिहावे की नको हा प्रश्न मग उरतो कुठे?
अर्थ ओळींचे कशाला ते... कळाले पाहिजे!
हा हा ... हे बाकी खरं आहे !
मी विडंबन पाडण्याला नेहमी आतूर पण..
चांगले मज.. काव्य एखादे मिळाले पाहिजे!
जेव्हा कच्चा माल नसेल तेव्हा, तुमचीच एखादी वरीजनल सुंदर कविता येऊ दे !!! :)
और भी आने दो !
-दिलीप बिरुटे
(केसूच्या विडंबनाचा पंखा)
7 Jun 2009 - 1:37 pm | टारझन
लै भारी केसुजी !! बिरूटे सरांशी सहमत !!
- मॅक् टारझन
मॅनेजर, बिरूटे पंखा कंपनी (प)लिमिटेड.
8 Jun 2009 - 5:13 pm | केशवसुमार
प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दोलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार.