संस्कृत सुभाषितांपासून प्रेरणा घेऊन मीदेखील काही सुभाषिते तयार केली आहेत, ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. चूका मनावर घेऊ नका. अजून मी संस्कृत शिकत आहे.
वृक्षस्य छायया संतुष्ठ: भवामि।
वृक्षस्य फलेन उदरम् च संतुष्टम्।।
परोपकाराय फलति एष: वृक्ष:।
क: भिन्नता वृक्षदेवयो:।।
मित्रस्य शक्ति: अस्ति अतिपवित्रा।
मित्रेण धृता: प्रमोदिता: जना:।।
तथापि जना: किमर्थं दर्शयन्ति
मित्रम् संध्याकाले तेषाम् पृष्ठम्।।
पद्मयोने: च महेशस्य सम्मेलनमेव मानवा:।
यच्छति जीवनम् च यच्छति मृत्यू:।
प्रभाते संध्याकाले च मित्रे महदन्तरम्।
प्रबलं दुर्बलं नृप: न च साम्यम्।।
सुरासुरा: उभौ च प्रबला:।
परि सुर: सुर: असुर: असुर:।।
- (नवशिक्या सुभाषितकार) पाणी पुरी
प्रतिक्रिया
12 Feb 2008 - 12:00 pm | बुध्दू बैल
छान!!
चांगला प्रयत्न आहे, महाशय.
12 Feb 2008 - 12:03 pm | विसोबा खेचर
पाणीपुरीराव,
आपण रचलेल्या संस्कृत सुभाषितांचे मिपावर स्वागत!
परंतु या सुभाषितांचा मराठीतूनही अर्थ दिलात तर आमच्यासारख्या संस्कृतातलं शष्पही न समजणार्यांकरताही त्याचा फायदा होईल!
अवांतर - मूळ शब्द काय आहे? शष्प की शश्प? की आणखी काही? आम्ही आपलं ऐकीव माहितीच्या आधारे तो शब्द लिहिला आहे! :)
तात्या.
12 Feb 2008 - 12:07 pm | बुध्दू बैल
कधी असा शब्दच ऐकला नाही.
12 Feb 2008 - 2:31 pm | प्रभाकर पेठकर
अहो तात्या,
मुळात शश्प शब्दाचा अर्थ काय?
12 Feb 2008 - 2:36 pm | विसोबा खेचर
मुळात शश्प शब्दाचा अर्थ काय?
जाऊ द्या पेठकरसाहेब, आपण या विषयावर पुन्हा कधीतरी बोलू! :)
मिपावर आता या विषयावर अधिक चर्चा करणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही...:)
तात्या.
12 Feb 2008 - 12:04 pm | बुध्दू बैल
जोडतो
अहं मानवः अटामि जगे
श्रांतः भवामि च विश्रांतास्मि
तदनन्तरं अटामि पुनः
मार्गे एते जीवने
12 Feb 2008 - 12:24 pm | धमाल मुलगा
अस॑च काहीस॑ म्हणतात ना स॑स्कृतात "छान" ला?
हे आपल॑ प्रतिक्रिया द्यावीशी वाटली म्हणून, नाहीतर बाकी त्यातल॑ ओ की ठो कळल॑ नाही बॉ आपल्याला...
स॑स्कृतच्या तासाला गुर्जी॑च्या लै छड्या खाल्या पण रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्या पण काय झेपत नाहीत आपल्याला.
असो,
आपला
-(गिर्वाणभारती न झेपणारा क्षुद्रातिक्षुद्र) ध मा ल.
12 Feb 2008 - 12:34 pm | विसोबा खेचर
स॑स्कृतच्या तासाला गुर्जी॑च्या लै छड्या खाल्या पण रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्या पण काय झेपत नाहीत आपल्याला.
सही बोल्लासा धमालभौ,
आपल्याला बी संस्कृतातलं काय बी समजत नै! :)
आपला,
(संस्कृतला जाम टरकून असणारा) तात्या.
12 Feb 2008 - 8:03 pm | प्राजु
मला संस्कृत भाषा आवडते. पण तुमच्या इतका अभ्यास नाहिये. मार्क मात्र मी दहावीत संस्कृतला एकदम छान मिळवले होते. मला सुभाषितांचं संग्रह करायला आवडतो. आपण या सुभाषितांचा अर्थ सांगितलात तर बरे होईल. मला आवडेल आणखी काही सुभाषिते आपल्याकडून शिकायला.
- प्राजु
12 Feb 2008 - 8:52 pm | वरदा
मलाही दहावीत ९८ मिळाले पण त्यानंतर काहीच नाही केला अभ्यास..तुम्ही काही महत्वाचे शब्द सांगितलेत तर जास्तं छान समजुन घेता येतील ही सुभाषितं...
1 Mar 2008 - 2:19 am | प्रा सुरेश खेडकर
रागा विषयी संस्कृत सुभाषीतAbout Anger.उत्तमस्य क्षणिकम् कोपम्,मध्यमस्य घटी दो घटीकनिष्टस्य दिवारात्रो,अधमस्य दिने दिने.=============================अर्थात्, उत्तम स्वभावाच्या मनुष्याचा राग क्षणभर,मध्यम् स्वभावाच्या मनुष्याचा राग घटकाभर,कनिष्ट स्वभावाच्या मनुष्याचा राग एक दिवस , अधम स्वभावाच्या मनुष्याचा राग खूप दिवस टिकतो.