निशब्द - अंतिम भाग.

सँडी's picture
सँडी in जनातलं, मनातलं
28 May 2009 - 11:56 am

भाग १

पुढे...

ती: मी बाबांशी बोलु का?

तो: नको. मी बोलेल योग्यवेळी.

ती: ठीक.

तो: आपल्या मित्रमैत्रीणींसाठी आपलं नातं वेगळचं आहे नाही?

ती: हो! पण आजकाल सगळे संशयित नजरेने पहातात.

तो: हं! चल तुला सोडतो बसस्टॉपला.

ती: ....

-----------------------------------------------------------------

(संध्याकाळी फोनवर)

ती: हॅलो! काय करतोयसं?

तो: काही नाही. बसलोय.

ती: बाहेर नाही गेलास आज?

तो: नाही.

ती: माझ्या फोनची वाट पहात होतास ना?

तो: ....

ती: तु कधी तुझं मन मोकळं करणार आहेस का?

तो: काय बोलंणार?

ती: जे मनात असेल ते!

तो: ....

ती: तु कितीही लपवलस तरी तुझे डोळे सगळं बोलत असतात.

तो: ....

ती: आता बोल ना काहितरी.

तो: मी स्वप्नांच्या जगात नाही जगत.

ती: मलाही नाही जगायचं त्या विश्वात.

तो: काल तुला सोडल्यानंतर संयोग भेटला होता.

ती: ....मग?

तो: काही नाही. तुझ्याबद्दल विचारत होता.

ती: काय?

तो: असेच.

ती: काय विचारत होता तो?

तो: आपल्या दोघांमधे काही आहे का विचारलं.

ती: मग?

तो: मी सांगितले असे काहीही नाही.

ती: ह्म्म!

तो: तु काय ठरविले आहेस त्याच्याबद्दल?

ती: काsssय!

तो: तु काय ठरविले आहेस त्याच्याबद्दल?

ती: म्हणजे?

तो: तुला प्रपोज केलयं ना त्याने?

ती: ....

तो: हॅलो!

ती: .......................हो.

तो: मग?

ती: ....

तो: तुला आवडत असेल तो तर...

ती: ....

तो: तु मला हे सांगायला हवं होतं.

ती: मी सांगणारच होते.

तो: कधी?

ती: मला वाटले तु रागावशील.

तो: तु सांगितले असते तर ठीक होतं.

ती: सॉरी!

तो: .......मग काय ठरविले आहेस?

ती: काही नाही.

तो: त्याला उत्तर दिले?

ती: नाही अजुन.

तो: तु त्याला उत्तर द्यायला हवे होते.

ती: काय उत्तर देऊ?

तो: हं! मी कसे सांगणार?

ती: ....

तो: चल. फोन ठेवतो. जेवुन घे. उद्या भेटु ऑफिसमध्ये! जमले तर लवकर ये जरा.

ती: ओके.

-----------------------------------------------------------------
(सकाळी ऑफिसमध्ये)

ती: बाहेर येतोस का जरा?

तो: येतो. तु जा पुढे.

-----------------------------------------------------------------

ती: काय झाले?

तो: कुठे काय?

ती: मघाशी ऑफिसमध्ये येताना मला पाहुन रस्ता का बदललास?

तो: तुला पाहुन?

ती: बरंsss! आम्हा दोघांना. मला बसस्टॉपवर भेटला संयोग.

तो: ....

ती: तुला राग आला का?

तो: कशामुळे?

ती: मी त्याच्याबरोबर आले म्हणुन?

तो: नाही! असे काही नाही.

ती: हम्म!

तो: बोलणे झाले का त्याच्याशी?

ती: नाही.

तो: ....

ती: तु का त्याचा विचार करतोस?

तो: हं! तु करतेयसं ना? मग मी का करु?

ती: ....

तो: ....

ती: मी आज लवकर जाणार आहे संध्याकाळी. बाबा पण येताहेत.

तो: अरे वा! काय विशेष?

ती: काही नाही. नेहमीप्रमाणे पाहुणे पहायला येणार आहेत.

तो: ......मी येईल तुला घरी सोडवायला.

ती: ...............आज रुपेश येणार आहे इकडे. मला घरी सोडवेल तो.

तो: ....

ती: आता रागावु नको रे!

तो: लग्न केले का रुपेशसाहेबांनी?

ती: नाही अजुन वाट पहातोय माझ्या होकाराची.

समाप्त.

कथा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

29 May 2009 - 6:30 am | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया