श्रीलंका सरकारचे अभिनंदन !!

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in काथ्याकूट
20 May 2009 - 10:41 am
गाभा: 

लिट्टेचा सर्वेसर्वा प्रभाकरनला ठार करून श्रीलंकेच्या सैन्याने जो दैदिप्यमान विजय मिळविला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक
अभिनंदन! प्रभाकरनसारख्या क्रूरकर्म्याचा अंत करून महिन्द्र राजपक्षे व सनथ फोन्सेका यांनी संपूर्ण मानववंशावर थोर
उपकार केले आहेत असेच मला वाटते.
गेली तीस वर्षे हा देश लिट्टे आणि इतर फुटीर तमिळ अतिरेक्यांशी लढा देत आहे. इतका छोटा देश स्वतःच्या अस्तित्वासाठी, सिंहली
अस्मितेसाठी झगडतो हे निश्चितच कौतूकास्पद आहे. ह्या युद्धात आत्तापर्यंत हजारो निरपराध नागरिक, सैनिक, पोलिस, राजकिय नेते
आणि एक अध्यक्ष समर्पित झाले आहेत. भारतानेही अनेक सैनिक आणि राजीव गांधी गमाविले आहेत. भारतासारखा बलाढ्य देश अजून
गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद संपवू शकत नाही अन भारतातल्या एका जिल्ह्याएव्हढा श्रीलंका देश लिट्टेसारख्या अतिबलाढ्य शत्र्रूवर
निर्णायक मात करतो ही गोष्ट खरेच विचार करण्यासारखी आहे.
ज्या लिट्टेने राजीव गांधींची निर्घृण हत्त्या केली त्या प्रभाकरनचा कळवळा असणार्‍या करूणानिधींचे समर्थन घेतांना सोनिया गांधींना
शरम कशी वाटली नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे. ह्या तमिळ नेत्यांची राजधानी दिल्लीतही एव्हढी दहशत जाणविते की श्रीलंका सरकारचे
कुणी मनमोकळेपणाने अभिनंदनही करत नाही !
मी तर पुढे जाऊन म्हणेन की भारत सरकारने राजपक्षेंनाच निमंत्रण द्यावे आणि दहशतवादाचा कठोर नि:पात कसा करायचा हे त्यांच्या
कडून शिकावे! इतका आंतरराष्ट्र्रीय दबाव असतांनाही त्यांनी ज्याप्रकारे श्रीलंकन सेनेत आणि नागरिकांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम चेतविले त्याला तोड नाही !!

प्रतिक्रिया

राघव's picture

20 May 2009 - 12:16 pm | राघव

कौतुक करायलाच हवे इतके भारी काम श्रीलंकेने केलेले आहे.
बाकीच्यांना जसा, युद्धात गेलेत त्यांच्याबद्दल पुळका येतो तसाच आजतोवर लिट्टेने मारलेल्या लोकांबद्दल का येत नाही?
मला वाटतं दहशतवाद हा सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. तर्क लढवला तर खालील काही पायर्‍या दिसतात -
१. एखादा प्रदेश सतत धुमसत ठेवायचा.. ज्यामुळे त्या प्रदेशाची प्रगती खुंटेल.
२. अशा प्रदेशाला आपणच मदत करायची.. जेणेकरून तो प्रदेश आपला अंकित होईल.
३. मग तिथेच आपला पाया मजबूत करायचा.. ज्याचा फायदा कच्च्या मालाची बाजारपेठ बनवण्यापासून ते लष्करी तळ उभारण्यापर्यंत कसाही होऊ शकेल.
..
..
या पार्श्वभूमीवर श्रीलंकेने केलेला लिट्टेचा समूळ उच्छेद हा खरोखरच अतुलनीय भाग आहे. याचे प्रतिसाद आंतरराष्ट्रीय राजकारणावर उमटतील यात शंकाच नाही.

बाकी आपल्या देशातल्या वाढत्या दहशतवादाबद्दल आणि अत्यंत खालच्या स्तरावरच्या राजकारणाबद्दल काही बोलायलाही लाज वाटते. मागे ही एक चर्चा टाकली होती - http://www.misalpav.com/node/3003. त्याचा उगमही याच मुद्याशी होता. असो.

श्रीलंकेचे त्रिवार अभिनंदन!!

राघव

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2009 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार

मी तर पुढे जाऊन म्हणेन की भारत सरकारने राजपक्षेंनाच निमंत्रण द्यावे आणि दहशतवादाचा कठोर नि:पात कसा करायचा हे त्यांच्याकडून शिकावे!

+१ सहमत सहमत.
धावता आढावा छानच.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

भारताला जशी लष्कर-ए- तोयबा तशी श्रीलंकेला लिट्टे होती. जितका आनंद लष्कर्-ए-तोयबा मिटल्यावर आपल्याला होईल तसा आनंद सध्या लंकेला झाला आहे.

अर्थात तामीळ जनतेला योग्य तो न्याय मिळावा व हिंसाचक्रातुन सर्वांची सुटका होवो.

यन्ना _रास्कला's picture

20 May 2009 - 1:23 pm | यन्ना _रास्कला

सर्वकश लेख. आजुन येउ द्या.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
पोस्तात पोलीस काय करतोय...... नक्कि मास्तर, दुसर कोन?

माया's picture

20 May 2009 - 1:55 pm | माया

:)
भारतानेच आधी एलटीटीईला वाढविले.(इतिहास संदर्भः इंदिरा गांधी.)
राजीव गांधींच्या हत्येनंतर भारताचे डोळे उघडले गेले. तरीही भारतीय तामीळ राजकारण्यांसमोर भारत सरकार्चे काहीच चालले नाही. राजीव गांधींची हत्या झाली नस्ती तर एलटीटीई डोईजड होवुन आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते. एलटीटीई हे भारतानेच खतपाणी घातलेले रोपटे आज एकअजस्त्र झाड झाले होते...
श्रीलंका सरकारचे अभिनंदनकरण्याआधी माफी मागवीशी वाटते.

मराठी_माणूस's picture

20 May 2009 - 2:02 pm | मराठी_माणूस

सहमत

चिरोटा's picture

20 May 2009 - 2:11 pm | चिरोटा

८०च्या मध्यापर्यंत तामिळनाडुत भारतिय सेनेने बर्‍याचवेळा लिट्टेला प्रशि़क्षण दिले आहे.भारतिय गुप्तचर खातेही लिट्टेला माहिती पुरवत असे.अर्थात भारताच्या मदतीमुळे लिट्टे एवढी मोठी झाली असे नाही.१९८७च्या नंतर भारताने मदत थांबवल्यानंतरपण मदतीचे अनेक स्त्रोत लिट्टेकडे होतेच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

क्लिंटन's picture

20 May 2009 - 3:35 pm | क्लिंटन

डॉक्टर साहेबांचा नेहमीप्रमाणे एक चांगला लेख.

श्रीलंकेतील तामिळ प्रश्नाचे उगमस्थान शोधून काढायला हवे.तामिळनाडूतून तामिळ भाषिक लोक शतकापूर्वी श्रीलंकेत जाऊन स्थायिक झाले.त्यात मुख्यत्वे चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार होते.श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात सोलोमन भंडारनायके हे १९५६ ते १९५९ या काळात पंतप्रधान होते.त्यांनी त्यांची ’केवळ सिंहल’ निती अनुसरली.त्या नितीप्रमाणे देशाची सिंहल ही एकच राष्ट्रभाषा ठरवण्यात आली आणि तामिळ भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला नाही.तसेच तामिळ भाषिकांवर अन्यायकारक अशी इतर धोरणे राबविण्यात आली.तामिळ लोकांना दुय्यम नागरिक असल्याप्रमाणे वागणूक द्यायला सुरवात झाली. त्याविरूद्ध श्रीलंकेतील तामिळ राजकारण्यांनी आवाज उठविला.काहींनी घटनात्मक पध्दतीने आणि शांततामय मार्गाने तर काहींनी हिंसक मार्गाने.त्यातील एल.टी.टी.ई ही सर्वात धोकादायक आणि हिंसक संघटना होती.

१९८३ मध्ये तामिळविरोधी दंगली झाल्या आणि कोलंबो आणि इतर ठिकाणी तामिळ लोकांच्या कत्तली झाल्या.जाफनामध्ये श्रीलंकन सैन्याने तीन हजार तामिळांची कत्तल केली असा आरोप केला जातो.हा आकडा खरा की खोटा हे भगवंतालाच ठाऊक.

दंगलींमुळे आणि श्रीलंकेत तामिळांवर अन्याय होत आहे या (काही अंशी तरी सत्य) समजुतीमुळे श्रीलंकेतील तामिळ चळवळीला तामिळनाडूतील राजकरण्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा मिळाला.तामिळ लोकांवर अन्याय केला जात होता हे नक्कीच पण जेव्हा तामिळ वाघांनी हिंसा आणि दहशतवादाचा मार्ग अनुसरला तेव्हा तरीही त्याला पाठिंबा आणि सहानुभूती देणे योग्य नव्हते असे मला वाटते.

भारतानेच आधी एलटीटीईला वाढविले.

हो तामिळनाडूतील राजकारण्यांनी एल.टी.टी.ई ला मदत केली होती.तामिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुक पक्षाचे संस्थापक एम.जी.रामचन्द्रन यांचा प्रभाकरन बरोबरचा फेब्रुवारी १९८५ मध्ये काढलेला खालील फोटो प्रसिध्दच आहे.

एम.जी.रामचन्द्रनबरोबर प्रभाकरन

मद्रमुकचे नेते वायको हे द्रमुकमध्ये असताना स्वत: श्रीलंकेत जाऊन प्रभाकरनला भेटून आले होते.

वायकोबरोबर प्रभाकरन

या राजकारणी मंडळींनी प्रभाकरनबरोबर नुसते फोटो सेशन केले नव्हते.तर तामिळ वाघांना तामिळनाडूत हातपाय पसरायला मदत केली होती.

भारत सरकारही काही कमी नव्हते. इंदिरा गांधींच्या सरकारने तामिळ वाघांना केलेल्या मदतीचा आढावा या लेखात चांगलाच घेतला आहे.जून १९८७ मध्ये श्रीलंकन सैन्याने जाफनामध्ये तामिळ वाघांची कोंडी केली होती.तेव्हा राजीव गांधींच्या सरकारने ऑपरेशन पूलमलाई याद्वारे भारतीय हवाईदलाच्या विमानांद्वारे श्रीलंकेची हवाई हद्द ओलांडून जाफनामध्ये २५ टन अन्न आणि खाद्यसामुग्री टाकण्यात आली.परराष्ट्र राज्यमंत्री नटवर सिंह यांनी श्रीलंकेच्या भारतातील राजदूतांना बोलावून घेऊन श्रीलंकेने विरोध केल्यास प्रसंगी बळाचा वापर करू ही धमकी दिली.

आता काश्मीरात स्थानिक लोकांवर अन्याय होतो असे म्हणत पाकिस्तानची विमाने येऊन श्रीनगरमध्ये अशी मदत टाकून गेले तर ते भारताला चालेल का?ही उघडउघड श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाची पायमल्ली होती.

नंतरच्या काळात श्रीलंकेचे अध्यक्ष जयवर्धने यांना समजून चुकले की आपली भारतापुढे धडगत नाही आणि यातूनच राजीव गांधी-जयवर्धने यांच्यात श्रीलंका करार झाला.

पण ज्या पध्दतीने भारतातील विशेषत: तामिळनाडूतील राज्यकर्त्यांनी हा प्रश्न हाताळला ते सर्वथैव अयोग्य होते.पुढच्या काळात एल.टी.टी.ई बलिष्ठ होऊन प्रचंड प्रमाणावर घातपाती कारवाया त्यांनी केल्या.अध्यक्ष प्रेमदासा, संरक्षण मंत्री रंजन विजयरत्ने, परराष्ट्र मंत्री लक्ष्मण कादिरगामार यांच्यासह हजारो लोक त्या घातपाताचे शिकार झाले.

नॉर्वेच्या मध्यस्थीने तामिळ वाघांबरोबर शांतताकरारासाठी प्रयत्न सुरू झाले.अध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगे या प्रभाकरनला तामिळबहुल प्रदेशाचे मुख्यमंत्री करायला तयार होत्या आणि प्रांताला अधिक अधिकार द्यायलाही तयार होत्या.पण रक्ताला चटावलेला प्रभाकरन अशा घटनात्मक चौकटीत बोलणी करायला तयारच झाला नाही.हजारो लोकांचे बळी घेणारे तामिळ वाघ शेवटी शेवटी श्रीलंकेतील तामिळ लोकांचाही वापर मानवी ढाल म्हणून करत होते हे आता माहिती झालेच आहे.अशा क्रूरकर्म्यांचा अध्यक्ष राजपक्षेंनी निर्धाराने खातमा केला हे चांगलेच केले.असा निर्धार दाखवून भारतातील राज्यकर्ते आपल्याच देशातील दहशतवाद्यांचे 'स्लीपर सेल' मुळापासून उखडून टाकतील तो सोन्याचा दिवस असेल.

तरी आजही भारतातील तामिळ राजकारणी श्रीलंकन समस्येवर तोडगा ’तामिळ इलम’ हाच असे म्हणतात ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

राघव's picture

20 May 2009 - 4:27 pm | राघव

अतिशय संतुलित अन् अभ्यासयुक्त प्रतिसाद! बर्‍याच माहित नसलेल्या गोष्टी समजल्या.
एक गोष्ट मात्र अजिबात समजत नाही. इतक्या दूरवर कोपर्‍यात बसलेला नॉर्वे मध्यस्थ म्हणून का आला असावा?

राघव

यन्ना _रास्कला's picture

20 May 2009 - 4:45 pm | यन्ना _रास्कला

बोल्तात कि प्रभाकरण हा कन्वर्टेड क्रिच्छन आनि त्याला चर्चकडुन भरपुर पैका मिलत होता. विलाय्तेत नार्वेमधी बरीच चर्च हायेत म्हनुन नार्वे मद्यस्त. जरा गुगलामधी प्रभाकरण आनी चर्च लिवा आनि पाहा मज्जा.

http://www.lankaweb.com/news/items/2009/05/17/prabhakarans-real-allies-g...

http://www.christianaggression.org/item_display.php?type=ARTICLES&id=111...
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

श्रीलंकन तमीळ लोकसंख्या, स्वतंत्र इलम ला समर्थन आणि तमीळ श्रीलंकन बांधवांच्या हक्कांना मदत.

मैत्र's picture

20 May 2009 - 5:06 pm | मैत्र

धन्यवाद क्लिंटन नेहमी प्रमाणे तपशीलवार माहिती बद्दल.
जर तमीळ संघर्षाचा इतिहास पाहिला तर प्रभाकरन हा अतिरेकी, दहशतवादी नाही तर स्वतंत्रतेसाठी, त्याच्या बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा हुतात्मा ठरतो. पण अशा गटांचा किंवा कोणत्याही लष्करशहांचा इतिहास असाच तत्त्वहीन आणि रक्त रंजित होत गेलेला आहे.
प्रभाकरन बरोबर एक सशस्त्र संघर्ष संपेल कदाचित पण सामान्य तमीळ वंशीय श्रीलंकन नागरिकांच्या मूलभूत नागरी हक्कांचा संघर्ष संपू नये. तसं झालं तर ती खूप मोठी दुर्दैवी घटना ठरेल आणि एल टी टी ई पेक्षा जास्त भयानक अशी दडपशाही येत्या काही वर्षात पहायला मिळेल.
एकूणात प्रभाकरनचे मार्ग, एल टी टी ई ने केलेल्या नेत्यांच्या, स्थानिकांच्या, सैनिकांच्या हत्या हा भाग अमान्य आणि समर्थन कारक नाही म्हणून ज्या कारणाने हा संघर्ष मुळात उभा राहिला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

श्रीलंकन सरकारच्या ठामपणाचे कौतुक करायला हवे. ते योग्य ठरेल त्यांच्या तमीळ नागरिकांबद्दल जी धोरणे यापुढे ठरतील त्यावरच. आत्ता नाही.

चतुरंग's picture

20 May 2009 - 5:27 pm | चतुरंग

श्रीलंकन तमिळांसाठी "'लिट्टे'तून फुफाट्यात" असे झाले नाही म्हणजे मिळवली. अर्थात आताचे ह्या प्रश्नाला मिळालेले आंतरराष्ट्रीय स्वरुप पहाता असे काही करायला श्रीलंका धजावेल असे वाटत नाही. हा प्रश्न शांततामय मार्गाने सुटायला हरकत नसावी.
एक रक्तरंजित पर्व संपुष्टात यायला सुरुवात झाली म्हणायची. महेंद्र यांचे अभिनंदन!

चतुरंग

क्लिंटन's picture

21 May 2009 - 4:30 pm | क्लिंटन

सामान्य तमीळ वंशीय श्रीलंकन नागरिकांच्या मूलभूत नागरी हक्कांचा संघर्ष संपू नये

अगदी असेच.तामिळांवर काही बाबतीत तरी अन्याय केला गेला हे सत्यच आहे.मात्र तो किती प्रमाणात केला गेला याबद्दल निपक्षपाती माहिती मिळणे कठिण आहे. प्रभाकरनची ’द हिंदू’ च्या एन.राम यांनी घेतलेली मुलाखत त्या दैनिकाच्या संकेतस्थळावर आहे.त्यात प्रभाकरन म्हणतो की तामिळ ईलम हा एकच तामिळांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे.आणि अर्थातच श्रीलंका सरकार हे नाकारेल.तेव्हा जो अन्याय झाला आहे तो नक्की किती आणि कोणत्या स्वरूपात हे समावून घेणे गरजेचे आहे.जर सिंहली लोक तामिळांवर त्यांची भाषा,जीवनपध्दती आणि सर्व गोष्टी लादू पाहत असतील तर ते चुकीचेच आहे.आज एक प्रभाकरन गेला पण उद्या दुसरा कोणी प्रभाकरन निर्माण होऊ नये यासाठी तामिळ लोकांनाही श्रीलंकेत बरोबरीचे स्थान दिले गेले पाहिजे.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

डॉ.प्रसाद दाढे's picture

20 May 2009 - 5:31 pm | डॉ.प्रसाद दाढे

मला क्लिंटनचा प्रतिसाद अपेक्षित होताच. त्याने म्हटल्याप्रमाणे लिट्टे ही इतर इलमवाल्यांपेक्षाही हिंसक आणि कट्टर आहे/ होती. थोडेसे तालिबानसारखेच.
जसे एक मुस्लिम राष्ट्र असूनही पाकिस्तानलाही तालिबान व (त्यांचा) कट्टर इस्लाम पचविणे जड जाते तसे. लिट्टे व प्रभाकरन अतिशय आडमुठे होते व
स्वतंत्र तमिळ ईलमच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड त्यांना कधीच मान्य नव्हती. अश्या तडजोडवादी तमिळांना देशद्रोही ठरवून त्यांचा परस्पर काटा काढला
जाई. उदाहरण म्हणजे राजीव गांधींचा मारेकरी शिवरासनने चेन्नईत केलेली पद्मनाभ ह्यांची हत्त्या.
लिट्टे, प्रभाकरन, पोट्टू अम्मन, अकिला वा शिवरासन इ. अतिरेकी किती निर्दय पण काटेकोरपणे एखादी राजकिय हत्त्या घडवित असत ह्याचं ठळक उदाहरण म्हणजे
राजीव हत्त्या! डिटेल्स 'सत्यमेव जयते' ह्या कार्तिकेयन लिखित पुस्तकात मिळतील. जिज्ञासूंनी जरूर वाचावे असे पुस्तक आहे. लिट्टेची एकूण कार्यपद्धती आणि सीबीआयने लावलेला छडा वाचून मती कुंठितच होते. (कार्तिकेयन हे राजीव हत्त्येचा यशस्वीरित्या तपास करणार्‍या पथकाचे प्रमूख होते.)
असो. श्रीलंकेच्या नागरिकांनी खरोखरंच सुटकेचा श्वास सोडला असणार.. तसा भारतीय कधी घेतील..??

बिपिन कार्यकर्ते's picture

21 May 2009 - 12:47 pm | बिपिन कार्यकर्ते

क्लिंटन, एक महत्वाची सुधारणा. लंकेतील तमिळ लोकांबद्दल.

लंकेतील तमिळींमधे पण भिन्न भिन्न प्रकार आहेत. त्यांच्यात साम्य फक्त भाषिक आहे. (त्यांची भाषा पण थोडी वेगळी आहे, काही वर्षांपूर्वी 'तेनालीराम' नावाचा कमलहासनचा सिनेमा आला होता त्यात ही लंकेची तमिळ भाषा वापरली होती, ती बर्‍याच तमिळ लोकांना पण कळली नव्हती.) लंकाद्वीपात कित्येक शतकांपासून वसलेले तमिळ हा सगळ्यात मोठा समूह. त्यांचे स्वतःचे राज्य होते. त्यानंतर मध्ययुगात अरब व्यापारी आले आणि स्थायिक झाले. त्यांचे वंशज मुख्यतः तमिळ बोलतात. आणि सगळ्यात शेवटी आले ते चहामळ्यातले मजूर.

या सगळ्या समूहांचे आपापसात हेवेदावे आहेत, रोटीबेटी व्यवहार नाही. सगळेच तमिळ भाषेच्या आहारी जाऊन इलमच्या बाजूने गेले नव्हते.

बिपिन कार्यकर्ते

भडकमकर मास्तर's picture

21 May 2009 - 3:11 pm | भडकमकर मास्तर

त्यातला मुथैय्या मुरलीधरन कोणता?_

____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

21 May 2009 - 6:36 pm | बिपिन कार्यकर्ते

मुरलीधरन हा स्थलांतरितांपैकी आहे. मूळ लंकन तमिळींपैकी नाहीये. तो फक्त तिसर्‍या पिढीतलाच आहे.

बिपिन कार्यकर्ते

क्लिंटन's picture

21 May 2009 - 4:19 pm | क्लिंटन

आपल्या सुधारणेबद्दल धन्यवाद. नवीन माहिती मिळाली.

पूर्वीच्या काळी चोळ घराण्याची सत्ता तामिळनाडूत होती त्यावेळी श्रीलंकाही त्यांच्या साम्राज्याचा भाग होता की नाही माहित नाही.पण त्याकाळी त्यांचा दूरच्या देशांशी व्यापार चाले.त्यातूनच श्रीलंकेत तामिळ लोक अनेक शतकांपूर्वी गेले असायची शक्यता आहे का?याविषयी काही माहिती आहे का?

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

विकास's picture

21 May 2009 - 4:34 pm | विकास

तसेच सिंहलीपण कुठले आहेत याची कल्पना आहे का?

मी एक ऐकल्याप्रमाणे, ते बिहार अथवा त्या (पूर्व) भागातील प्रदेशातून अनेक शतकांपुर्वी तेथे स्थायीक झालेला समाज आहे. अर्थात मी यावरचे वाचन केलेले नाही, पण आत्ता वरील माहीती वाचताना एकदम आठवण झाली...

सुनील's picture

21 May 2009 - 4:39 pm | सुनील

सिंहली लिपी ही उडिया लिपीशी थोडी मिळती-जुळती आहे, असे कुठेसे वाचले होते. सम्राट अशोकाने आपल्या मुलांना तिथे बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ पाठवले होते, असेही इतिहास सांगतो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

21 May 2009 - 4:54 pm | ऋषिकेश

श्रीलंका सरकारचे अभिनंदनकरण्याआधी माफी मागवीशी वाटते.

+१
याचबरोबर तामिळींचे प्रश्न दुर्लक्षित रहिले नाहित तर दुसरा प्रभाकरन होण्याचे टळेल

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

विंजिनेर's picture

20 May 2009 - 8:09 pm | विंजिनेर

अभ्यासु वाचकांनी वरती तमिळ वाघांच्या उगमावर सखोल विचार व्यक्त केले आहेतच.
मला थोडे वेगळे मांडायचे आहेत.

  1. जगातील इतर सशस्त्र "स्वातंत्र्य लढे" आणि तमिळ वाघांतील साम्य
  2. जगात प्रस्थापित/अधिकृत सरकारांकडून अल्पसंख्यांक गटाची तथाकथित (किंवा वास्तव) गळचेपीविरुद्ध अनेक चळवळी सुरुवातीपासून(म्हणजे अगदी ग्रीक राज्यकर्त्यांपासून) आहेत.
    सध्याच्या म्हणजे गेल्या ५० वर्षांत प्रकर्षाने जगापुढे राहिलेले काही गट म्हणजे अफगाणीस्तानात अहमद शाह मसूदचे नॉर्दन अलायन्स, चेचेन्यातील शामिक बेसेव्हच्या नेतृत्वाखाली लढणारे आणि प्रभाकरनचे तमिळ वाघ.
    हीच तीन उदाहरणे घ्यायचे कारण म्हणजे ह्या चळवळी ज्या प्रकारे चालविल्या गेल्या त्यांतील साम्यस्थळे विचार करण्याजोगी आहेत.

    1. शस्त्रात्रे: तीनही चळवळी सशस्त्र होत्या/आहेत. तीनही चळवळी त्यांच्या यशस्वीततेच्या शिखरावर असताना हजारो तरूण/तरूणींचे सशस्त्र गट बाळगून होत्या. ह्या चळवळींनी शस्त्रांच्या बळावर मानवी हक्कांची मनसोक्त पायमल्ली केली. सामान्य जनतेत (आणि बहुत करून ज्या जनतेसाठी ते लढा देत होते त्याच जनतेत) जबर दहशत पसरविली होती. उदा. तमिळ वाघ अनेकवेळा शरण आलेले शेकडो सरकारी पोलीस/खबरे ह्यांची निर्दय पणे हत्या करत. चेचेन बंडखोर बलात्कार, लूटमार इ.चा शस्त्र म्हणून वापर करित. त्यामुळे क्रौर्य हा ह्या चळवळींचा अविभाज्य भाग होता असे म्हटले तर गैर ठरणार नाही
    2. सबळ नेतृत्वः तीनही चळवळींना कणखर आणि अतिशय कावेबाज,संधीसाधु नेतृत्व लाभले होते. ह्या नेत्यांनी बराच काळ त्या-त्या देशातील (बलाढ्य असणार्‍या)लष्करांना निष्क्रिय,हतबल करून ठेवले होते. "तह,शांतता प्रस्तावांचे कागदी घोडे नाचवत" वेळकाढूपणा करत मोर्चेबांधणी कशी करावी इ. युद्धकला ह्या नेत्यांना चांगल्याच अवगत होत्या.
      चळवळीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या/सैनिकाच्या मते हे नेते देवाच्या जागी होते. नेतृत्वाप्रती प्रखर निष्ठाच अपेक्षित होती. किंचितही विरोधी सुर काढणार्‍या गटाला समुळ आणि निर्घृणपणे नष्ट केले जायचे.
    3. चळवळीला लागणारा पैसा: अफू/शस्त्रास्त्रे/हवाला ह्यांचे अनेक देशांत पसरलेले बेकायदेशीर व्यापाराचे जाळे होते. उदाहरणार्थ तमिळ वाघांचे ५४ देशांत शस्त्रात्र व्यापाराचे जाळे होते. शिवाय परदेशात राहणारे चळवळींप्रती सहानभुती असणारे श्रीमंत दाते हा ही मोठा स्त्रोत होता.
    4. प्रचार आणि प्रसारःआंतरजाल, दूरचित्रवाहिन्या, वर्तमानपत्रे ह्यांच्या मदतीने चळवळीच्या हेतूचा आणि विरोधी सरकाराविरोधी धोरणांचा प्रसार/प्रचार अगदी सराईत पणे केला गेला.
  3. ह्या "स्वातंत्र्य" लढ्यांचा अस्त
  4. बंडखोरीपुढे हात टेकलेले सरकार स्वबळावर(फक्त) ह्या चळवळींना कधीच नेस्तनाबूत करू शकले नाही. दुसरे म्हणजे राजकीय तोडग्यापेक्षा बंदूकच ह्या चळवळींना अधिक श्रेयस्कर वाटत आली आहे. त्यामुळे सरकारनेसुद्धा चळवळीतील अंतर्गत विरोधकांना (आर्थिक मदत/राजकीय पक्षात स्थान इ.) प्रोत्साहन देऊन फूट पाडली. ह्या फुटीत मग लष्करी बळाची पाचर ठोकून ती वाढविली आणि चळवळींची शकले उडविली. मात्र समूळ उखाडून टाकण्यासाठी नेत्याचा/बंडखोराची "नेत्रदीपक" पद्धतीने - आंतर्राष्ट्रीय मिडीयाच्या साक्षीने हत्या केली..

पण शेवटी ज्या सामान्य माणसाच्या तथाकथित हक्कांसाठी हे लोक लढले ते मात्र मधल्यामधे भरडलेच गेले. त्यामुळे चळवळीचा मूळ हेतू कितपत साध्य झाला हे शंकास्पद आहे.

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

एल टी टी ई कडे धक्कादायक शस्त्रास्त्रे होती. अत्याधुनिक, मोठी, आणि प्रचंड प्रमाणात!
बंदुका, गोळ्या आणता येतील पण यांच्याकडे गाड्या, आणि सगळ्यात कहर म्हणजे छोट्या आणि मध्यम युद्ध नौका होत्या!
खंडाच्या दक्षिण टोकाला असलेल्या या बेटावर युद्धनौका कुठून खरेदी करून आणत होते आणि कुठल्या मार्गाने?
आता जगातले सगळे देश समुद्रावर चांगली नजर ठेवू शकतात मग या आल्या कुठून आणि कोण बनवत होते?

पाकिस्तान, अफगाणिस्तान इथे शस्त्रे कुठून जातात हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांना हजारो चोरवाटा आहेत मध्य पूर्वेत...
इथे कसं आणत होते आणि श्रीलंकन सरकार जे तमीळांना साधे नागरी हक्क देत नव्हते त्यांना यांची शस्त्रास्त्रांची रसद तोडता आली नाही इतकी वर्ष? हे मात्र गौडबंगाल आहे...

क्लिंटन's picture

21 May 2009 - 11:57 am | क्लिंटन

हो युध्दनौकांबरोबरच तामिळ वाघांकडे हवाई दलासाठी वापरली जाणारी विमानेही होती.ती अगदी सुखोई किंवा तत्सम अत्याधुनिक विमाने नव्हती पण त्यांच्याकडे विमाने होती हे खरेच. ती विमाने/युध्दनौका त्यांच्याकडे कशी आली हा प्रश्नच आहे.अशी विमाने/युध्दनौकांचे उत्पादन करत असलेल्या कंपन्या देशाच्या सरकारच्याच ऑर्डरी स्विकारत असतील यात शंका नाही.एक उदाहरण म्हणून सांगतो उद्या मनसेने युध्दनौकांची ऑर्डर दिली तरी त्या कंपन्या ती पूर्ण करतील असे नाही पण भारत सरकारने अशी ऑर्डर दिली तर मात्र पूर्ण करू शकतील.

तसेच लढाऊ विमानांचे उत्पादन स्वत: एल.टी.टी.ई ने केले असेल ही पण शक्यता कमीच आहे.विमानांचे डिझाईन करणे ही खायची गोष्ट नव्हे.भारतासारख्या देशाचेही तेजस हे Light Combat Aircraft अजूनही इतक्या वर्षाच्या प्रयत्नांनंतरही बाल्यावस्थेतच आहे. मग एल.टी.टी.ई ने ही विमाने कोणाकडून पैसे चारून विकत घेतली की चोरली हे कळायला मार्ग नाही.

अवांतर: द हिंदू वर्तमानपत्रातील प्रभाकरनवरील हा लेखही वाचनीय आहे.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

मराठी_माणूस's picture

21 May 2009 - 12:09 pm | मराठी_माणूस

एक उदाहरण म्हणून सांगतो उद्या मनसेने युध्दनौकांची ऑर्डर दिली ........

कित्येक दहशतवादी संघटना अस्तित्वात असताना उदाहरणासाठी मनसे चे नाव घेणे अत्यंत दुर्दैवी वाटले.

क्लिंटन's picture

21 May 2009 - 12:22 pm | क्लिंटन

कित्येक दहशतवादी संघटना अस्तित्वात असताना उदाहरणासाठी मनसे चे नाव घेणे अत्यंत दुर्दैवी वाटले.

मनसेचे नाव लिहिल्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिर आहे.यातून मनसे एक दहशतवादी संघटना आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे असा अर्थ अभिप्रेत होत आहे.माझ्या म्हणण्याचा अर्थ भारतातल्या काही व्यक्तींनी/संघटनांनी युध्दनौकांची ऑर्डर दिली तर असा आहे.आणि तो त्या अर्थाने घ्यावा ही विनंती. आधीच्या प्रतिसादातून चुकीचा अर्थ निघत आहे याबद्दल १००% दिलगिरी.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

विकास's picture

20 May 2009 - 9:14 pm | विकास

चांगला लेख आणि क्लिंटन तसेच इतरांचे प्रतिसाद देखील आवडले.

वर क्लिंटननी सांगितलेल्या गोष्टीतील महत्वाची गोष्ट म्हणजे: ५०च्या दशकापासून, श्रीलंकन तामिळींना मिळालेली दुय्यम नागरीकाची वागणूक. त्यातून वेगवेगळे प्रश्न निर्माण होत गेले. जसे शिखांचे तयार झाले तसे...

प्रभाकरन ची चळवळ ही अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यामुळे कमकुवत झाली. कारण तो पर्यंत जगातील अतिरेकी कारवायांकडे दुर्लक्ष करणार्‍या अमेरीकेस खडबडून जाग आली. त्याचा फायद श्रीलंकेस झाला.

त्या आधी, माझा येथे बर्‍याच श्रीलंकन्सशी संबंध आला आहे. त्यांच्या कडून बर्‍याचदा वेगवेगळी माहीती मिळाली. कुणाकडे कोण कसे दुर्दैवाने स्फोटात मरून गेले, कधी थांगपत्ता लागला नाही वगैरे समजले की अस्वस्थता येयची. मात्र ते तिथून उठले आणि निर्वासीत म्हणून अथवा विद्यार्थी म्हणून विविध देशात गेले. कॅनडात त्यांची लोकसंख्या चांगली आहे. पण बरेचसे जण एलटीटीईबद्दल विशेष बोलायचे नाहीत (एखादा महाभाग - एकदम तरूण रक्त सोडल्यास). श्रीलंकेकडे ते आजही त्यांचा देश म्हणून / घर म्हणून पहातात. अर्थात ते निरीक्षण माझ्या मर्यदीत अनुभवावर आधारीत आहे.

प्रभाकरनची चळवळ ही नंतर एकदम गुंडगिरी झाली होती. १२-१३ वर्षांच्या लहानमुलांच्या हातात पण बंदुका देऊन त्यांना पुढे करायला त्याने कमी केले नाही. भारतात पण उद्याच राजीव गांधींच्या निर्घृण हत्येस १८ वर्षे होतील. त्याची आणि त्याच्या चळवळीची अखेर झाली हे सर्वार्थाने चांगले झाले.

मात्र प्रभाकरन आणि लिट्टेचा शेवट ही जरी चांगली गोष्ट असली तरी श्रीलंकन सरकारचा विजय ही तेथील सामान्य तामिळींचा विचार करता आनंदाची गोष्ट आहे का नाही हे समजत नाही. यात आवडत असो नसो, बुद्ध-हिंदू नक्की आणि काही अंशी ख्रिश्चन धर्माधारीत संघर्ष आहे. एरवी अल्पसंख्यांकांच्या रक्षणावरून ओरडणारे याबाबतीत ओरडणार नाहीत. राजीव गांधींनी शांतीसेना पाठवली आणि ते योग्य ठरत नाही म्हणता क्षणी माघार घ्यायला लावली. लावली ते लावली त्यातून हाल झालेल्या सैनिकांना आणि सैन्याला एकाअर्थी अपमानास्पद दुर्लक्षीत वागणूक दिली. आज त्याच काँग्रेसचे राज्य आहे (इतरांचे असते तरी काही वेगळे असते असे म्हणायचे नाही). त्यांच्या कडून काळजी घेतली जाईल का हा एक मोठा प्रश्न आहे. नाहीतर अशाच हालअपेष्ट्रा खाऊन परत एखादा उद्याचा प्रभाकरन उदयाला आला तर आश्चर्य वाटायला नको.

बहुगुणी's picture

20 May 2009 - 10:59 pm | बहुगुणी

राजपक्षेंनी तामीळ-वंशीयांना समान हक्क देऊ केले आहेत असं हे वृत्त सांगतं. पण त्याचवेळी "आमचा मार्ग आम्हालाच शोधू द्यात, इंपोर्टेड तोडगा नको" असंही सांगायला कमी केलेलं नाही. भारतीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि शिवशंकर मेनन यांचं आजच राजपक्षे याच्याशी सल्ला-मसलत करण्यासाठी कोलंबोला आगमन झालंय, या पार्श्वभूमीवर हा पवित्रा बोलका आहे.

संजय अभ्यंकर's picture

20 May 2009 - 11:07 pm | संजय अभ्यंकर

बंधूंनो, मृत प्रभाकरनचे छायाचित्र प्रसारीत झाल्याशिवाय, ह्या बातमीवर विश्वास ठेऊ नये!

प्रभाकरनच्या मृत्युच्या बातम्या या पूर्वीही येऊन गेल्या.
त्यानंतर तो नराधम पुन्हा प्रगट झाला.

श्रीलंकन सरकारचे हल्ले थांबवून जमवाजमवीस उसंत मिळावी म्हणून त्यानेच (प्रभाकरननेच) ह्या बातम्या पसरवल्या असतील.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 May 2009 - 11:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती


हे घ्या. आजच्या लोकसत्तेत आहे.

(सॉरी, बंधू नसले तरीही चित्रं चिकटवत आहे)

कपाळावर टिच्चून गोळी घातलेली दिसतेय...

अभिज्ञ's picture

22 May 2009 - 3:45 pm | अभिज्ञ

काय कळत नाय बुवा.

prabhakaran

;)

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 May 2009 - 3:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय कळत नाय बुवा.

मला पण नाही कळलं, सापासारखा इंग्रजी दोन, डब्ल्यूला दीर्घ वेलांटी, (ग्रीक) पायला उकार, कॅपिटल एल, किती लिप्या एकत्र जोडल्या आहेत! ;-)

संजय अभ्यंकर's picture

24 May 2009 - 1:22 pm | संजय अभ्यंकर

तामीळ लीपीचे भाष्यांतर!
अर्थ मात्र विचारावा लागेल!

(तामिळ वाचू शकणारा, परंतु फारसा अर्थ न कळणारा)
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सँडी's picture

22 May 2009 - 9:54 pm | सँडी

फोटोशॉप मॅजिक!

त्याने वर्तमानपत्र कसे धरले आहे ते पहा! लगेच समजेल कशी मॅजिक आहे ते... ;)

भडकमकर मास्तर's picture

20 May 2009 - 11:20 pm | भडकमकर मास्तर

बंधूंनो, मृत प्रभाकरनचे छायाचित्र प्रसारीत झाल्याशिवाय, ह्या बातमीवर विश्वास ठेऊ नये!

आपली सूचना महत्त्वाची वाटते ,
फक्त दीड दिवस उशीरा आली आहे...
१९ मे ला दिवसभर डोक्यात गोळी लागलेल्या प्रभाकरनचे छायाचित्र , व्हिडिओ सर्व न्यूज चॅनलसवर दिसत होते....
आता त्यावर विश्वास ठेवू नये असे आपले म्हणणे असावे असे वाटते...
म्हणजे बॉडी डबल मेला असेल वगैरे वगैरे.... आता लंका सरकार म्हणते की डी एन ए टेस्ट झालेली आहे...
तेही खोटे असण्याची शक्यता आहे.....खरे खोटे प्रभाकरनला ठाऊक...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

भदकमकर साहेब,

मी सहसः न्यूज चॅनल्स पहात नसल्याने मला ते कळले नाही.

अदिती ताईने दिलेल्या माहीतीनुसार आताच लोकसत्ता मध्ये चित्र पाहीले.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

21 May 2009 - 12:15 am | बिपिन कार्यकर्ते

लेख आणि त्यावरील काही प्रतिसाद आवडले.

तमिळ वाघांचे पानिपत झाले ही चांगलीच घटना झाली. मूळ स्थापनेचा उद्देश काहीही असो पण आज ही संघटना केवळ दहशतवादी म्हणूनच उरली होती. त्या दॄष्टीनेच हा नि:पात झाला हे चांगले झाले.

तमिळ राष्ट्रवाद हा एक अतिशय पोटंट प्रकार आहे. सर्वसाधारणपणे तमिळ लोक भाषेबद्दल / संस्कृतीबद्दल अतिशय कडवे असतातच. श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर सिंहली साहजिकच वरचढ झाले. भाषिक वाद उफाळून आले. संख्याबळामुळे त्यांनी तमिळींना सहज दाबले. त्यांच्यावर अत्याचार झाले, दमन झाले... हे सगळे सत्यच आहे. त्यानंतर प्रभाकरनच्या बरोबरीने अनेक लढाऊ संघटना जन्माला आल्या. एलटीटीई ही त्यातलीच एक. प्रभाकरन हा सगळ्यात हुशार आणि महत्वाचे म्हणजे निर्घृण होता, त्याने इतरांचा नायनाट केला, तमिळनाडूतल्या (आणि दिल्लीकर) राजकारण्यांचा आशिर्वाद मिळवला. ८०च्या दशकाच्या अंतापर्यंत केवळ त्याचेच अस्तित्व उरले. त्याला सुरूवातीला जे काही यश मिळाले ते पण केवळ श्रीलंकेच्या लष्कराच्या निष्काळजीपणामुळे मिळाले. मात्र अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उठलेली ही संघटना कधी स्वतःच दहशतवादी बनून अन्याय करू लागली हे त्यांचे त्यांनाच कळले नसावे.

त्याच्या अत्याचाराच्या कथा आता कुठे एकेककरून बाहेर यायला लागल्या आहेत. लहान मुलांना पळवून नेऊन जबरदस्तीने सैनिक बनवणे, जबरदस्तीने पैसे वसूल करणे वगैरे तर नित्याचे झाले होते. दहशत एवढी होती की परदेशात राहणारे श्रीलंकन तमिळसुद्धा सहजासहजी या विषयी बोलत नसत. शेवटच्या लढाईतही 'मानवी ढाली' वापरल्या गेल्या. आपल्या सैनिकांना सायनाईडची कॅप्सूल खायची आज्ञा देणारा मात्र स्वतः तसे करताना घाबरला असावा. त्याचा मृत्यू गोळ्या लागून झाला आहे असे जाहिर झाले आहे.

तमिळी वाघांच्या पराभवाचा भारताच्या संदर्भात विचार केल्यास काही गोष्टी जाणवल्या. जर का हे स्वतंत्र तमिळ इलम अस्तित्वात आले असते तर त्याला लागून असलेल्या तमिळनाडूवर त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच झाले असते. उद्या तमिळनाडूतल्या एखाद्या जहाल नेत्याने भारतापासून फुटण्याचे स्वप्न बघितले असते तर नवल नव्हते. आणि त्या परिस्थितीत त्याला याच सार्वभौम इलम मधे आश्रय मिळूही शकला असता. तशीही आपले सगळेच शेजारी आपल्याशी अगदी गुण्यागोविंदाने राहत आहेत असे नाहीच आहे. आपण बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे पण आज इशान्येतल्या सगळ्या फुटिर संघटना तिथेच जम बसवून आहेत. (हे आपलं नशीब की बंगाली जरी तमिळीं इतकेच भाषाभिमानी असले तरी फुटिरतेची लागण नाही होऊ शकत तिथे. बर्‍याच वर्षांपूर्वी अगदी दबलेली का होईना पण भारतापासून फुटायची प्रवृत्ति तमिळनाडूमधे होती हे वास्तव आहे.) भारतासाठी अजून एक कोपरा अशांत झाला असता.

आता खरं तर लंकेच्या सरकारवर अजून मोठी जबाबदारी आहे. ज्या घटनांमुळे हा भस्मासूर उभा राहिला त्या घटना परत होता कामा नयेत हे त्यांना बघावे लागेल. तमिळींना नुसती समानता देऊन चालणार नाही तर त्यांना समान असल्याची जाणिवही करून द्यावी लागेल. अन्यथा आज प्रभाकरन होता उद्या एखादा रत्नाकरन नाही तर करूणाकरन उभा राहील. सुदैवाने राजपक्से चांगलेच हुशार, धूर्त आणि राजकारणी असावे असे वाटते. त्यांना याची जाण आहे, म्हणूनच काही दिवसांपूर्वी तिथल्या संसदेत भाषण करताना त्यांनी तमिळींना उद्देशून भाषण करताना, मी तुमचा पण राष्ट्रपती आहे असे उद्गार त्यांनी काढले होते. कालच्या भाषणाचा काही भाग त्यांनी तमिळमधून केला होता. माझ्या ओळखीचे काही श्रीलंकन होते त्यांच्या कडून मी कधीही तमिळद्वेष नाही ऐकला. (त्यावेळी वाघ अगदी जोरात होते, तरीही.) पूर्वी जो काही अन्याय झाला, तमिळविरोधी दंगे झाले तेव्हा सामान्य सिंहली, विशेष करून बौध्द भिक्षू, त्यात आघाडीवर होते या पार्श्वभूमीवर माझ्या सिंहली मित्रांचे वर्तन खूपच वेगळे वाटले होते. बहुधा सिंहलींना पण आपल्या चुकांची जाणिव झाली असावी. (आजच्या डॉनच्या अंकात इरफान हुसेननी याच धर्तीवर फार छान लिहिले आहे. http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newspa...)

एकंदरीतच घडले ते सगळे दु:स्वप्न असे समजून सर्व श्रीलंकावासियांनी नवीन आयुष्याला सुरूवात करावी. भारताच्या शेजारी राष्ट्रांत शांतता नांदावी, यातच भारताचे भले आहे. नाही तर नको त्या शक्तींना सहज शिरकाव करता येईल आणि आपल्या अंगणात अश्या शक्ती नकोतच, नाही का?

जाता जाता: मिडियाचे सध्याचे एक पटत नाही. तमिळींवर हल्ले झाले, सामान्य नागरिक कसे मृत्युमुखी पडत आहेत आणि लंकेच्या सैन्याचे हल्ले वगैरे बद्दल खूप लिहून आणि छायाचित्रं येत आहेत. पण याच वाघांनी आत्तापर्यंत कसे अत्याचार केले, विश्वासघात केले, लहान मुलांना सैनिक केले वगैरे बाबतीत फारसे येत नाहीये. आधीच भावनिक झालेल्या तमिळनाडूमधे यामुळे अजून भावनोद्रेक न होवो हीच इच्छा.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

21 May 2009 - 1:18 am | चतुरंग

निवृत्त मे.ज. शशिकांत पित्रे ह्यांचा प्रभाकरन बद्दल एक लेख आलाय. तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे. शांतिसेनेच्या लढ्यादरम्यान ते स्वतः प्रभाकरनला भेटलेले होते त्यामुळे ह्या लेखाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते.

चतुरंग

नितिन थत्ते's picture

21 May 2009 - 4:25 pm | नितिन थत्ते

हम्म.
सरकारने मनात आणले आणि बाहेरची मदत थांबली तर सशस्त्र स्वातंत्र्यलढे अयशस्वीच होतात तर.....

खराटा
(रंग माझा वेगळा)

चिरोटा's picture

21 May 2009 - 5:00 pm | चिरोटा

श्रीलंकेचे माहित नाही पण भारतात तरी तसे आहे. सरकारी यंत्रणेचा वापर करुन परिस्थिती स्वतहा:च्या फायद्यासाठी कुठपर्यंत चिघळवत न्यायची हे राजकारण्याना पक्के ठावूक असते.मग एखादा गुन्हेगार असो वा एखाद्या समाजाविरुध्ध घडवून आणलेली दंगल. राजकिय अभय असेपर्यंत काही प्रॉब्लेम होत नाही.
म्हणूनच विरप्पन ३५ वर्षे सापडत नव्हता.पण विरप्पनने कोट्यावधी रुपयांची तस्करी भारतात राहुन सहज केली.अरुण गवळीच्या दगडी चाळीत पोलिसाना शिरायला 'भिती' वाटायची.१२/१३ वर्षे चिघळत असलेला पंजाब प्रश्नही सुदैवाने संपला.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

हेरंब's picture

22 May 2009 - 6:24 pm | हेरंब

आजच लोकलमधे बाजुला एक तामिळ बसला आणि काही ओळखपाळख नसताना मेलेला प्रभाकरन् हा डुप्लिकेट आहे आणि खरा फॅमिलीसकट कधीच पळून गेला असे दृढ आत्मविश्वासाने सांगत होता, तसेच बोलताना त्याला प्रभाकरन् विषयी नितांत आदर आहे हे सहजच कळत होते.

गोरख's picture

23 May 2009 - 8:19 am | गोरख

हि किड मेलि..आता भारतातिल किड कधि जानार?