दोन दिग्गज

बहुगुणी's picture
बहुगुणी in कलादालन
20 May 2009 - 8:20 am

चेहेर्‍यांत साम्य आहे, की कल्पनाविलास?

संगीतक्रीडा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

20 May 2009 - 8:39 am | विनायक प्रभू

हाय.

प्राजु's picture

20 May 2009 - 8:42 am | प्राजु

साम्य आहे खरं!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

20 May 2009 - 8:44 am | मुक्तसुनीत

पंडीतजींचा फोटो म्हणजे "म्हंमदशा रंगिले.." गातानाचा क्यापचर आहे काय ? त्यातल्या ताना म्हणजे एका ओव्हर मधे सहा सिक्सर आहेत राव !

बहुगुणी's picture

20 May 2009 - 8:58 am | बहुगुणी

.... त्याच व्हिडिओ क्लिप मधली एक फ्रेम ग्रॅब केली. आणि त्या ताना म्हणजे खरंच ३६/ओव्हर आहेत, हातवार्‍यांसकट! आणि तो आवेश पाहूनच मला सचिन डोक्यात आला, तेंव्हा त्या दुव्याबद्दल तात्यांचे आभारच.

चतुरंग's picture

20 May 2009 - 6:09 pm | चतुरंग

एकेक ताना म्हणजे मला शिवथरघळीवरचा धबधबा आठवतो! सतत गर्जणारा, घनगंभीर नादाने सगळे आसमंत भारून टाकणारा!
स्वर असे हात जोडून पुढे उभे आहेत आणि भीमण्णा एकेका तानेसरशी पाहिजे त्याला पुढे बोलावून, हवे तसे फिरवून पुन्हा सोडून देताहेत असे वाटत रहाते. :)
अगदी रंगात आलेल्या सचिनची लीलया चाललेली फटकेबाजी असतेना तसेच. तो हाफवॉलीला पण मारतो आणि अचूक यॉर्करला सुद्धा तडकावतो!

चतुरंग

विकास's picture

20 May 2009 - 8:46 am | विकास

साम्य वाटते...फोटोशॉपचा चम्त्कार तर नाही ना? :?

बहुगुणी's picture

20 May 2009 - 9:08 am | बहुगुणी

भीमसेनांची भावमुद्रा त्या (वर उल्लेखलेल्या) व्हिडिओ क्लिप मधील १:३४ या वेळची आहे, आणि सचिन चा फोटो या फोटो गॅलरीतला. दोन्ही फोटो फक्त crop केलेले आहेत साम्य दाखवण्यासाठी.

विसोबा खेचर's picture

20 May 2009 - 9:06 am | विसोबा खेचर

मल विशेष साम्य वाटत नाही...

दोघांनाही प्रणाम...

तात्या.

दिपक's picture

20 May 2009 - 10:27 am | दिपक

दोघेही बापमाणुस!

जो आनंद स्वरभास्करांच्या "माझे माहेर पंढरी..." ऎकताना होतो तेवढाच आनंद सचिन जेव्हा असले स्ट्रेट ड्राईव्ह सारखे मारतो तेव्हा होतो.

असं आशा दाखवून अवसानभंग करू नका, प्लीज पुन्हा अपलोड करणार का तो फोटो?

शक्तिमान's picture

20 May 2009 - 11:47 am | शक्तिमान

खरंच साम्य आहे बरं का!

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2009 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार

ह्म्म्म्म
साम्य वाटतय खर !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मराठी_माणूस's picture

20 May 2009 - 12:08 pm | मराठी_माणूस

चेहेर्‍यांत साम्य आहे, की कल्पनाविलास?

कल्पनाविलास

मिसळभोक्ता's picture

21 May 2009 - 10:54 pm | मिसळभोक्ता

आण्णांचा कलकत्त्याला सत्कार होता. तेथे हॉटेल वर भेटायला सचिन आला होता. त्याला अण्णांनी विचारले, सचिन, आमचा भाऊ कसा खेळतो. तुमचा भाऊ ? सचिन गोंधळला. हो, सुनील जोशी हा माझा चुलतभाऊ आहे -- अण्णा. त्यावर सचिन काय बोलणार बिचारा ?

-- मिसळभोक्ता