और एक

अप्पासाहेब's picture
अप्पासाहेब in जे न देखे रवी...
20 Sep 2007 - 3:10 pm

घाल झिम्मा , खेळ फुगडी, धु लुगडी सुंदरीची
खा पिझ्झा, चाव चिज, झोक वाईन ईटलीची

घाल टोपी , फेड धोतरं, सोड लाज जन्तेची
काट पत्ते, हाण गुद्दे, कर बर्बादी सगळ्यांची

ह्याला पोचव , त्याला नागव , धर डुक विषारी
घाल खिशात, भर ब्यांकत, चेप माल सर्कारी

ह्याची पेटव , त्याची खाजव, खेच टांग नानाची
ह्याला दाब , त्याला चोप, कर एन्काउंटर मुड्द्यांची

काप बकरं, मुर्गाळ मुंडी , लाव भांडणे जातीची
आज साळा, उद्या क्वालिज , मार शिट्टी ईद्येची

काल साकर , आज वाईन, येसीझेड हाये उद्याच्याला
ह्याची आयात, त्याची निर्यात, किरकेट चा पैका दावणिला

माप अल्याड, मोज पल्याड, कर लौबी बिल्डरची
घे फावडे , हाण कुद्ळ, जिमीन आपल्या बापाची

[ गझल नव्ह ही कविता हाय, 'पाडीव - जोडीव' फरक हाय ]

कविता

प्रतिक्रिया

टीकाकार-१'s picture

20 Sep 2007 - 3:18 pm | टीकाकार-१

चांगली कविता आहे.

विसोबा खेचर's picture

20 Sep 2007 - 3:22 pm | विसोबा खेचर

वा वा! रचनेमधला सामजिक आशय आवडला..

छान लिहिलं आहेस रे आप्पा..

तात्या.

विसुनाना's picture

20 Sep 2007 - 4:17 pm | विसुनाना

म्हणतो. कविता चांगली आहे.

तर्री's picture

20 Sep 2007 - 3:23 pm | तर्री

अस्सल आणि फक्कड कविता......विद्येची शिट्टी मार.एकदम माम्लेदार मिसळ.....

तर्री's picture

20 Sep 2007 - 3:24 pm | तर्री

तर्री

टीकाकार-१'s picture

20 Sep 2007 - 3:29 pm | टीकाकार-१

वीररस पूर्ण आहे..

उग्रसेन's picture

20 Sep 2007 - 4:19 pm | उग्रसेन

काय अर्थ हाये कवीतेत
येगयेगळ्या पेपरमधल्या हेडलाईन एकत्र करुन कुठं कवीता व्हत राह्ती व्हय.
पर लिव्हीत राव्हा चांगल्या कवितेबरुबरु फालतू कविता बी वाचाला येत जैन.

घाल टोपी , फेड धोतरं, सोड लाज जन्तेची

(तश्याच बाबूराव च्या दोन वळी पाहा.अशा लै कविता करीन बाबूराव)

घाल बन्यान,घाल अन्डरपँड,सोड लाज जन्तेची
छाप कवीता,टाक चर्चा,कर बर्बादी मिसळपावाची

ह्यो एकमेव अर्थ कवीतेमधून निघतो तुमच्या कसं ?

अप्पासाहेब's picture

20 Sep 2007 - 5:09 pm | अप्पासाहेब

आवो जरा वाईच गंमतशान करवी म्हन्लो तर लैच शीरीयस झालासा जनु. 'घाल टोपी , फेड धोतरं, सोड लाज जन्तेची' म्हन्लो तां दुस-याची हो, तुमी लगीच सोताचं च धोतरं सोडायला निघालासा, आरारा.. ये बारक्या.. फड्का मार रे तिकडं , आन बाबुरावासनी काय पायजे बघ ..

उग्रसेन's picture

20 Sep 2007 - 5:31 pm | उग्रसेन

सोडलं आसतं की,पर शरम बिरम सोडेल नाय ना भो तुम्हावानी आमी.

''घाल बन्यान,घाल अन्डरपँड,सोड लाज जन्तेची
छाप कवीता,टाक चर्चा,कर बर्बादी मिसळपावाची''

'घाल' या शबदापरीस 'काढ'वापरला असता की तुम्हासाठी, पर इज्जतवाले लोक हाये आमी
तोह्यासारखे फूकटे मिसळीवर लै येते भौ.
दे रे भौ आजच्या दिवस ती माही राहेल मिसळ येला.

जुना अभिजित's picture

20 Sep 2007 - 4:20 pm | जुना अभिजित

वाईच आमाला बी सुचलं तुमच्यामुळं.

टाका प्रतिसाद खरडा वहीत काढा चिमटे उडवा टर
खावा मूग ओता फरसाण मिसळीत तर्री पावात बटर

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित