पाऊलखुणा

स्वप्नयोगी's picture
स्वप्नयोगी in जे न देखे रवी...
13 May 2009 - 6:33 pm

तू वाटेवरुन गेलीस
की माझं पाउल तिकडं वळतं,
जाता जाता मन माझं
तुझ्या पाऊलखुणा शोधत जातं.

चारोळ्या

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

13 May 2009 - 6:46 pm | परिकथेतील राजकुमार

तूमची कविता पाहिली
की माझ्या डोक्यात किडे वळवळतात,
सारख्या सारख्या चारच ओळी
आमच्या डोक्यात जातात.

अहो काय मालक ? नाही आम्हाला कवितेतले ओ का ठो कळत नाही मान्य आहे पण

जाता जाता मन माझं
तुझ्या पाऊलखुणा शोधत जातात.

हे कुठल्या प्रकारचे व्याकरण आहे हो ?

पराशेखर गोखले
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मराठमोळा's picture

13 May 2009 - 7:29 pm | मराठमोळा

तु या वाटेवरुन गेलीस
तुझ्या पाऊलखुणांवरुन कळणं
मन तिकडे धावत सुटतं
पण मधेच पावलांचं घुटमळणं

असं काही म्हणायचं होतं का?

बाकी पराशेखर म्हणतात तसे व्याकरणाकडे थोडे लक्ष दिले तर चांगल्या चारोळ्या तयार होतील.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!