...तोच आहे.

अंकुश चव्हाण's picture
अंकुश चव्हाण in जे न देखे रवी...
7 May 2009 - 10:58 am

...तोच आहे.

बासरीत सूर ओतले ज्याने,
नंदनवन गोकुळी फुलवीले ज्याने,
तुजवरी छाया कृपेची धरणारा मुरारी
श्री कृष्ण "सखा" तोच आहे !

कालियाचे मर्दन केले ज्याने,
कन्साचे ताड्न केले ज्याने ,
तुज वादळात सावरणारा गिरिधारी
श्री कृष्ण "सखा" तोच आहे !

तुलसिदलात स्वत:ला तोलले ज्याने,
द्रौपदिचे लज्जारक्षण केले ज्याने ,
तुज दु:खाच्या भवसागरातुन तारणारा हरी
श्री कृष्ण "सखा" तोच आहे !

कौरावांविरुद्ध पांचजन्य फुंकला ज्याने,
अर्जुनास गीता सांगितली ज्याने,
तुज आत्मबळ देणारा सुदर्शनधारी
श्री कृष्ण "सखा" तोच आहे !

ही कविताही जर माझ्याकडून पुनर्प्रकाशित झाली असेल तर क्रुपया मला तसे सांगा. प्रतिक्रियांचे (अर्थातच टिकांचेही ) स्वागत आहे. थोडेफार लिहीण्याचा प्रयत्न करत आहे. अबोध आणि अजाण समजुन मार्गदर्शन कराल अशी अपेक्शा.

कविता

प्रतिक्रिया

जागु's picture

7 May 2009 - 11:18 am | जागु

जय श्री कृष्ण !