माझे स्नेही श्री. रवि पांडे ह्यांनी नुकतीच एक नवी मराठी अक्षरमुद्रा विकसित केली आहे. ह्या अक्षरमुद्रेला त्यांनी सुंदरसे नाव दिले आहे- अक्षरयोगिनी. त्यांचा विरोप पत्ता- 'panravi@yahoo.com'
ही अक्षरमुद्रा तुम्हाला खालील दुव्यावरुन उतरवून घेता येईल.
http://aksharyogini.sudhanwa.com/aksharyogini.html
प्रतिक्रिया
29 Apr 2009 - 8:07 pm | प्राजु
अक्षरयोगिनी नक्की उतरवून घेऊ. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Apr 2009 - 8:27 pm | अजय भागवत
रविला तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया कळवेन. ही मंडळी प्रसिद्ध्तीच्या पडद्यामागे इतके काम करत आहेत हे पाहून मीच ठरवले की ह्या कामाला मिपावर सांगायचे. त्याला जे करायचे ते त्याने केले.
29 Apr 2009 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रवीसेठच्या कामाचे कौतुकच आहे. सर्वांच्या वतीने अभिनंदन कळवा !
अक्षरयोगिनी उतरवले, मस्त आहे दिसायला.
29 Apr 2009 - 8:46 pm | घाटावरचे भट
उतरवून घेतला. वापरून पाहिला. उत्तम आहे. पांडे साहेबांचे आभार आणि तुमचेही.
29 Apr 2009 - 8:54 pm | क्रान्ति
अक्षरयोगिनी उतरवून घेत आहे आणि मित्रांना शिफारसही केली आहे. धन्यवाद.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
30 Apr 2009 - 6:38 pm | अजय भागवत
सगळ्यांचे आभार. रविला कळवले आहे.