चुप्पी !

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
27 Apr 2009 - 10:38 am

सूर्य दमला, जरा टेकला,
अवनीच्या मग, कवेत शिरला,
रंग बिरंगी नभाळ चादर,
अंगावरती लेवून पहुडला.

सृष्टीचे ते रूप आगळे ,
पाहुनी माझे "मी" पण गळले,
"मी" च नाही तर, "तू" ही कैसा..?
अद्वैताचे रहस्य कळले..!

नकोच आता काही -बाही
शब्दांच्या या कळा पुरे,
नि:शब्दातून अव्यक्ताचे,
रूप होतसे साजिरे...

ॐ चुप्पी !चुप्पी !! चुप्पी !!!

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

27 Apr 2009 - 11:20 am | विसोबा खेचर

नि:शब्दातुन अव्यक्ताचे,
रूप होतसे साजिरे...

क्लास..!

तात्या.

उदय सप्रे's picture

27 Apr 2009 - 11:48 am | उदय सप्रे

झकास !
अपराध (बहुतेक!) नावाच्या मराठी सिनेमातील एका गाण्याची आठवण झाली.....
सुरावटीवर तुझ्या उमटती
अचुक कशी ही माझी गझले
कशास पुससी प्रश्न प्रेयसी
तुला समजले मला समजले !

अप्रतिम शब्द गोखले साहेब !