[खालील लेख भाषांतरीत आहे.]
सॉक्रेटीस हा एक थोर शिक्षक गणला जातो. त्याची शिक्षणपद्धत ही हटके होती व तो प्रश्न विचारत-विचारत शिकवे व लोकांकडून उत्तरे मिळवे. "ex duco" चा अर्थ "lead out" होतो जो "education" ह्या शब्दाचा गाभा आहे. उत्तरे "मिळवणे" हे "lead out" किंवा त्यातूनच मार्ग दाखवणे अशा अर्थाने पाहिले तर अशा शिक्षणपद्धतीचे महत्व पटते.
आज त्याच्या प्रश्नावलीबाबत आपल्याला जी माहिती आहे ती त्याच्या शिष्योत्तमामुळे. प्लॅटो व ऍरीस्टॉटल हे त्याचे शिष्य होते. व त्यांनी सॉक्रेटीसची ही प्रश्नावली लिहून ठेवल्यामुळेच ती आज जगाला माहित आहे असे समजले जाते.
सॉक्रेटीस सहा प्रकारचे प्रश्न विचारत असे. अशा प्रश्नांमुळे अनेकदा लोकांना सुरुवातीला त्याचा राग येत असे परंतू नंतर त्याचा फायदाही त्यांना होई. ह्या प्रश्नांचा उद्देश लोकांच्या माहितीच्या अचूकतेला व परिपूर्णतेला एक आव्हान असे व त्यातून तो लोकांना त्यांच्या अडचणीच्या अथवा उद्देशाच्या दिशेने मार्गदर्शन करीत असे.
कंसेप्चुयल क्लॅरीफिकेशन साठी प्रश्न:
ज्या लोकांना एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे त्या मुद्द्याची त्यांच्यापाशीच कितपत एकवाक्यता आहे हे तो पहात असे. त्यांना त्या मुद्द्यावर अधिक विचार करायला भाग पाडत असे. हे प्रश्न असे-
१. हे तुम्ही का म्हणताय?
२. ...म्हणजे नक्की काय?
३. हे जे तुम्ही आत्ता म्हणालाय ते आधीच्या मुद्द्याशी कसे लागू पडते?
४. ह्या मुद्द्याचे स्वरुप नेमके उलगडून सांगाल काय?
५. तुम्हाला ह्याबाबत आधीच कायकाय माहित आहे?
६. एखादे उदाहरण देऊ शकाल का?
७. तुम्ही हे .... म्हणताय की....?
८. कृपया हे जरा सोप्या पध्दतीने सांगाल का?
प्रोबिंग प्रश्न:
लोकांनी गृहीत धरलेल्या बाबींवर अधिक खोलवर माहिती घेण्यासाठी हे प्रश्न तो विचारत असे. ह्याचा उपयोग त्यांच्या आधिच गृहीत धरलेल्या शक्यता व आजवर ज्या आंधळ्या विश्वासाबद्दल त्यांना कोणीही काहीही प्रश्न विचारलेले असतील तर ते विचारल्यामुळे वाद घालणाऱ्यांना तो त्यांच्या मुद्द्यावर अधिक विचार करावयास भाग पाडे.
१. आपण अजुन कायकाय शक्यता गृहीत धरु शकू?
२. तुम्ही हे गृहीत धरले आहे का?
३. तुम्ही ह्याच शक्यतांची निवड का केलीत?
४. ह्या ज्या शक्यता गृहीत धरल्या आहेत त्याची पडताळणी कशी करता येईल?
५. काय होऊ शकते जर आपण....?
मुद्द्याचा पाया, कारणं आणि पुरावे ह्यांना प्रोब करणे:
जेव्हा लोक त्यांच्या मुद्द्याला धरुन बसुन त्याच्या शक्यतांना समर्थन देत असत, काही पुरावे मांडत असत त्यावेळी तो प्रश्न विचारुन त्या मुद्द्याच्या पाया, कारणं आणि पुरावे ह्यांना प्रोब करत असे.
१. हे असे का होते आहे?
२. तुला हे कसे माहित आहे?
३. दाखवू शकतोस?
४. उदाहरण देऊ शकतोस?
अंदाजांना पडताळून पाहण्याचे प्रश्न:
बऱ्याचदा चर्चा करतांना मुद्दे हे एकाच पद्धतीने (दृष्टीकोनातून) पाहून मांडले जातात. त्या दृष्टीकोनाला आव्हान देण्यासाठी तो हे प्रश्न विचारत असे.
१. ह्याकडे पाहण्याचा एखादा वेगळा दृष्टीकोन आहे का?
२. ह्याकडे अशा पद्धतीने पाहणे रास्त आहे का?
३. ह्याचा फायदा कोणाला होईल?
४. ह्यात...आणि त्यात... काय फरक आहे?
जर मुद्द्यावर एकमत झालेच तर त्याचे परिणाम काय होऊ शकतील हे पडताळण्याचे प्रश्न:
एखादा निर्णय घेतलाच तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील हे अंदाजाने पडताळून पाहणे श्रेयस्कर ठरते. त्याचा लोकांनी काही विचार केला आहे का ते पाहण्यासाठी तो हे प्रश्न विचारत असे.
१. मग काय होऊ शकते?
२. आपण हे... त्यासाठी कसे वापरु शकतो?
३. हे आपण पुर्वी अनुभवल्याप्रमाणे वेगळे अथवा तसेच कसे होऊ शकते?
४. हे असे होणे का महत्वाचे आहे?
प्रश्नावर प्रश्न:
एखादा प्रश्न सॉक्रेटीसलाच विचारला तर तो त्याचे उत्तर दुसरा प्रश्न विचारुन देत असे!
१. ह्या प्रश्नाचा रोख काय आहे?
२. आधीचा प्रश्न मी का विचारला होता असे तुला वाटते?
प्रतिक्रिया
17 Apr 2009 - 1:59 pm | मराठी_माणूस
विचाराना चालना देणारा लेख. धन्यवाद.
17 Apr 2009 - 2:46 pm | लिखाळ
छान माहिती दिलीत. :)
सॉक्रेटिसशी संवाद साधणे अवघडच होते म्हणायचे :)
मी कॉलेजात असताना एक प्रश्नावली तयार केली होती आणि माझ्या आसपासच्या काही स्नेह्यांकडून ती भरुन घेतली होती. त्या उद्योगामागे हेतू असा होता की आपण ज्या प्रतिमा उरी बाळगतो त्याबद्दल आपण स्वतः काय विचार केलेला असतो ते जाणून घेणे. म्हणजेच लोक एखाद्या मताबद्दल ठाम असतात त्यामागे काय काय घटक असतात ते पाहणे. त्यातून मला काही मनोरंजक तथ्ये पाहायला मिळाली होती. या सगळ्याची आठवण झाली.
--(सूर्य पाहिलेला माणूस) लिखाळ.
17 Apr 2009 - 3:41 pm | अजय भागवत
तुमची प्रश्नावली व त्यातुन काढलेले निष्कर्ष वाचायला आवडतील.
17 Apr 2009 - 7:52 pm | शब्देय
कुठेतरी असे वाटते की डेल्फी तंत्राचे मूळ सॉक्रेटीसच्या या प्रश्नातून माहिती एकत्र करण्याच्या पद्धतीत असावे.
17 Apr 2009 - 8:00 pm | अजय भागवत
डेल्फी तंत्राबाबत मला फारशी माहिती नाही पण शत्रूच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी जी उपाययोजना केली जाते त्यासाठी हे एक तंत्र वापरतात असे वाच्ल्याचे आठवते. तुम्हास अधिक माहिती असल्यास ती द्यावी अशी विनंती.
17 Apr 2009 - 8:35 pm | शब्देय
http://en.wikipedia.org/wiki/Delphi_method
17 Apr 2009 - 9:05 pm | टायबेरीअस
सुंदर टॉपिक आहे . मॅनेजमेंट कन्सल्टींग मधे नेत्याचे गुणही असे सांगितले आहेत.. काही नेते 'प्रश्नातून' नेतृत्व करतात काही नेते 'सल्ल्यातून'...
-टायबेरीअस
मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
17 Apr 2009 - 10:33 pm | अजय भागवत
मॅनेजमेंट कन्सल्टींग मधे नेत्याचे गुणही असे सांगितले आहेत.. काही नेते 'प्रश्नातून' नेतृत्व करतात काही नेते 'सल्ल्यातून'..
ह्याविषयावरील पुस्तक पुण्या-मुंबईत मिळते- "Leading with questions"
17 Apr 2009 - 10:34 pm | अजय भागवत
डॉक्टरमंडळींचीही एक प्रश्नावली असते. मिपाकर डॉ. दाढे त्यावर मार्गदर्शन करु शकतील.