वसंत ऋतू हा कुणालाही वेड लावणारा असतो.
कोरिया आणि जपानात साकूरा अर्थात चेरी ब्लॉसम जेव्हा फुलतो तेव्हा लोक वसंताच्या आगमनाला सज्ज होतात. ही रंगाची मुक्त उधळण साधारण दर ८-१० दिवसांच्या अंतराने बदलत जाते. ती टिपण्याचा हा छोटासा प्रयत्न.
- हिवाळ्यातली कडाक्याची थंडी संपत आल्याची चाहुल आणि येणार्या वसंताचे स्वागत येथील लहानगी देवळांत जाऊन करतात.
पारंपारिक कपडे घालून देवळाच्या भव्य लाकडी दरवाज्यावर "येणारा वसंत उदंड पीक/पाणी घेऊन येउदे" ह्या अर्थाच्या पताका डकवतात.(येथील शेती वसंत/ग्रीष्म अशा दोन हंगामात होते.) हा समारंभ ४ फेब्रुवारीला (तिथीप्रमाणे) होतो - नंतर हळुहळू वातावरण उबदार होते आणि बहर येतो तो "प्लम" च्या झाडांना. (मिपाकर )हिमानीने एक जलरंगात चित्र बनविले होते (गेल्या वर्षी)
- प्लमचा बहर ओसरतोय न ओसरतोय तोच चेरीच्या झाडांना बहर येतो आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी बागांमधे लोटतात. चेरीच्या फुलांनी लगडलेल्या झाडाखाली निवांत बसावे, मंद वारा वाहात असतो, मधेच ती नाजूक फुले टपटप करून आपल्या अंगावर गळतात ... त्याचा आनंद घेत न्याहारी/बियर/इ. चा आस्वाद घेत दिवस मोठा छान जातो.
-
पानाचा लवलेशही नसलेले आणि फुलांनी गच्च भरलेले चेरीचे झाड पाहून वेडी होणार नाही अशी व्यक्ती विरळाच. त्यात भर म्हणून की काय, इथल्या म्युशीपालट्या
रस्ते/कॅनॉल/नदीकाठ अशा ठिकाणी दुतर्फा चेरीची झाडे लावतात. - चेरीचा बहर जेमतेम आठवडाभर असतो. तो संपतोय न संपतोय तोच इतर फुले फुलु लागतात.
चेरीचे शुभ्र पांढर्या बरोबर पिवळा/गुलाबी आणि अशा अनेक छटा असतात त्यांचे जवळून दर्शन.
ह्या नंतर असते ती रान गुलाबांची मादक उधळण पण त्याला अजून महिना-दोन महिने अवकाश आहे. तो पर्यंत आपली रजा घेतो :)
प्रतिक्रिया
14 Apr 2009 - 6:11 pm | परिकथेतील राजकुमार
खरच रंगबिरंगी वसंताची 'मादक उधळण'' बर का साहेब :)
मस्त वाटले एकदम छायाचीत्रे बघुन.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 Apr 2009 - 7:43 pm | भाग्यश्री
अगदी! मादक उधळण आहे..
अप्रतिम फोटोज..
चेरीचे फुल किती नाजुक असतं! :)
15 Apr 2009 - 6:54 am | शितल
सहमत. :)
14 Apr 2009 - 6:46 pm | मदनबाण
मस्त माहिती आणि फोटो.:)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
14 Apr 2009 - 7:38 pm | बेसनलाडू
फारच मोहक!
(जपानी)लाडू-सान्
14 Apr 2009 - 9:25 pm | मीनल
सुंदर छायाचित्र.
आमची जपान ट्रिप आठवली.
मीनल.
14 Apr 2009 - 11:07 pm | प्राजु
मन प्रफुल्लीत झालं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Apr 2009 - 12:28 am | संदीप चित्रे
चेरी ब्लॉसम पहायला लोक दूर दूरपर्यंत जातात ते योग्यच दिसतय
15 Apr 2009 - 7:03 am | विनायक प्रभू
आलेत फोटो
15 Apr 2009 - 7:03 am | विनायक प्रभू
आलेत फोटो
15 Apr 2009 - 7:06 am | अनिल हटेला
छान आलेत फोटो !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
15 Apr 2009 - 1:38 pm | केदार_जपान
साकुरा चे फोटो जबर्या आलेत... :) कुठे टोक्यो मधेच काढलेत का?
मी पण गेलो होतो शिंजुकु ग्योएन मधे... हे फोटो कुठले आहेत ?
-----------------------
केदार जोशी
15 Apr 2009 - 1:43 pm | जागु
अप्रतिम फोटो. खुप खुप आवडले.
15 Apr 2009 - 1:47 pm | स्वाती दिनेश
मस्त फोटो.. वसंत अगदी फुललाय..
स्वाती
17 Apr 2009 - 2:57 pm | श्रावण मोडक
+१
15 Apr 2009 - 1:48 pm | मराठी_माणूस
मस्त
15 Apr 2009 - 2:40 pm | अमोल केळकर
दुसरा फोटो मस्तच
अमोल
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे पहा
15 Apr 2009 - 7:26 pm | क्रान्ति
अप्रतिम फोटो!
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
17 Apr 2009 - 2:13 pm | विंजिनेर
प्रतिक्रिया नोंदवणार्यांचे अनेक आभार.
जे वाचनमात्र होते त्यांना ही धन्यवाद.
@केदार्_जपानः काही फोटो टोक्यो मधे काढले आहेत (नेरीमा-कु मधे) तर काही सोलच्या योईदो-पार्क मधले आहेत. दोन्हीकडचा वसंतऋतू टिपण्याचा सुदैवाने योग आला :)
@अमोलः दुसरा फोटो हे हिमानी ने काढलेले जलरंगातील चित्र आहे. मुळ छायाचित्र वर्तमानपत्रातील होते.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही