मराठी तू मर्द गडी
नसांतून मराठी वाहे
नको उपहास साहू
प्रश्न अस्तित्वाचा आहे!
कोणी म्हणे "घाटी साले"
हाण त्यांना खेटराने
महाराष्ट्री मराठीच
कापते का भितीने?
उगीचच इंग्रजाळे
गरज काय सवतीची
लाज वाटते का तुला
थोर माय मराठीची?
सेरेमनी थ्रेड,बर्थडे
सणदेखील इंग्लीश झाले!
दूध असता आईला
भुकटीला भरते आले!
अतिथी हे देव! पण
मान राखा संस्कृतीचा
एकजीव व्हा ना येथे
प्याला दूधसाखरेचा!
शिवछत्रपती कृपा
मराठी "मानाचे" झाले
मर्दा टिकव अस्मिता तू
देव "१०५" बोले!
महाराष्ट्र देश माझा
राज्य हे मराठी आहे
म्हण ताठ गर्जून तू..
होय "मी मराठी आहे...!!"
प्रतिक्रिया
14 Apr 2009 - 11:50 am | पाषाणभेद
गर्जून सांगतो -मी मराठी आहे
जय महाराष्ट्र
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
14 Apr 2009 - 12:17 pm | मराठी_माणूस
मस्त, कटु सत्य