पत्त्यांचा डाव

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Apr 2009 - 4:36 pm

पत्त्यांचा डाव
त्या वेळी आम्हि शाळेत होतो.
सुटित पत्त्यांचा डाव पडला कि
तिचि माझि कायम जोडि असायची
लॅडिस खेळायचो...
आमचि जोडि कायम जिंकायचि,
आमच्या गुप्त खुणा असायच्या,
केसावरुन नकळत हात फिरला कि...किलवर
डोळ्यांच्या हळुवार हलचाली....इस्पिक
ओठांच्या हळुवार हलचालि.......चौकट
जिभ हळुच बाहेर काढणे............बदाम
आम्हाला बरोबर पाने कळायची एकमेकांची
कॉलेज ला गेल्यावर हि ति तशाच खुणा करायची..
मला वाटायचे हिला पत्ते खेळायचे आहेत..
म्हणायचो लहान नाहि आपण तसे खेळ खेळायला..
वेडि मुलगी नाराज व्हायची
नंतर कळाले तिचे लग्न ठरले...
अन सा~या खुणांचा अर्थ लागला
पण अरेरे.. अर्थ कळाला तेंव्हा वेळ निघुन गेली होति...
अन हातात हुकमाचि पाने असुन हि डाव गमावुन बसलो होतो
@ Avinash

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 Apr 2009 - 7:23 pm | अवलिया

पत्यांमधे वेळ घालवला... पत्ता कटला.

आता पत्ते खेळणे सोडा... पत्ते शोधा !!

शुभेच्छा !!! :)

--अवलिया

सँडी's picture

11 Apr 2009 - 7:40 pm | सँडी

अन हातात हुकमाचि पाने असुन हि डाव गमावुन बसलो होतो

मस्तच!

अवांतर : आता नविन 'डाव' शोधा! ;)

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

आंबोळी's picture

12 Apr 2009 - 12:05 am | आंबोळी

नाना, सँडीशी सहमत.....
छान लिहीलय...
(असाच डाव हुकलेला)आंबोळी

chikusi's picture

12 Apr 2009 - 12:31 am | chikusi

खुपच मनाला लागणार आहे. मन अगदि ह्ळ्ह्ळुन गेले........

पुष्कर's picture

12 Apr 2009 - 1:06 pm | पुष्कर

अतिशय आवडली. वरवर विनोदी वाटली तरी खूप भावूक कविता वाटते.