रान झाले उदास
पाऊस गेला बरसून
डोळीयात अनिवार
पाणी आले भरुन.....
टपकताना आसवांचे
एकेक थेंब थेंब
करपून गेले माझ्या..
न उरली काही आशा
उसवले सगळे धागे
विहारती भोवती पक्षी
पण दुरावले सारे....
सर्व काही लाभते परि
आहे काही उणे
मोहरा विनाच वृक्ष
लगडेल कसा फळाने....
या घनतिमिरी काळोखात
तुच जाहालास दिवा
आसाच तेजोमयी तुझा
सहवास मजला हवा....
प्रतिक्रिया
8 Apr 2009 - 9:06 pm | क्रान्ति
या घनतिमिरी काळोखात तूच जाहलास दिवा! छान कल्पना!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
8 Apr 2009 - 9:38 pm | प्राजु
पण तिमिर याचाच अर्थ अंधार, काळोख असा आहे.
त्यामुळे घनतिमिरी काळोख हा शब्दप्रयोग चुकीचा वाटतो आहे.
जाणकारांनी प्रकाश (इथेही!!!)टाकावा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/