प्रेम

विवेकवि's picture
विवेकवि in जे न देखे रवी...
31 Jan 2008 - 12:28 pm

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही

का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण

मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही

रात्री छान च असतात .......... तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी ..... मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला

प्रेम कधी सफल होते तर कधी नाही ........ ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असत

प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही ....
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही .....

हे ठिकाण

प्रतिक्रिया

शुचि's picture

5 May 2010 - 4:37 am | शुचि

छान आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||