४-५ वर्षाचाच असेल,कोप~यात शांत बसलो होतो,
"बाबा तुला नविन आई आणणार आहेत" कोणीतरी बोलत होत.
बाबा अन आई घरात आले, गळ्यात हार होते.नविन कपडे.
सारे गेल्यावर तिने माझ्याकडे बघुन विचारले..हा कोण?
"हा आमचा मक्या",बाबा.. "नाहि आजपासुन हा माझा मक्या"
मला जवळ घेत ति म्हणाली...तिच्या नव्या पातळाचा वास अजुन विसरलो नाहि..
मग आम्हा तिघंच जिवन सुरु झाल....
खुप प्रेमळ पण कडक होति ति...सकाळीच उठवायची,
व्यायाम अभ्यास झाल्याशिवाय दुध नसे देत...
खुप राग यायचा..लोक म्हणायचे सावत्र आहे ना ति अशीच वागणार..
शाळेत जाताना कडीच्या डब्यात पोळीचा लाडु द्यायची...
गोष्टी सांगायची, आवाज छान होता तिचा....
मोठा झालो, नोकरीला लगलो, तिच्या शिस्तिचे महत्व पटल..
तिला मुल झाल नाहि..विचारल कि म्हणायची
"हा काय मक्या आहेना माझा.."खुप बर वाटायच ऎकुन
बर वाटत नाहि म्हणुन तिला दवाखान्यात नेले
अन ऍडमीट केले.."ब्लड कॅन्सर" डॉक्टर म्हणाले.
डोळ्याचे पाणी खळेना...
खुप कृश झालि होति, तिच्या जवळ बसलो होतो..
किति करतोस रे..पोट्चा पोर सुध्धा करणार नाहि"..
मला रडु आवरत नव्हत..ह्यांना,तुझ्या बाबांना संभाळ,
तुझ्यावर फार प्रेम आहे..आमच्या दोघांचे,ति बोलत होति
"अरे मला मुल झाल तर तुझ्याकडे दुर्लक्ष होईल म्हणुन मी मुल नाहि होऊ दिले"
मी ऐकले अन हदरलोच..
आई तु महान आहेस....
प्रतिक्रिया
30 Mar 2009 - 2:54 pm | अमोल खरे
सही कविता. करुण शेवटाऐवजी चांगला शेवट असायला हवा होता असं वाटलं.
30 Mar 2009 - 3:04 pm | विशाल कुलकर्णी
एवढे सुंदर वर्णन केल्यावर तिला "सावत्र' आई म्हणणे खुप खटकले.
बाकी छान !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
30 Mar 2009 - 3:10 pm | मि माझी
"अरे मला मुल झाल तर तुझ्याकडे दुर्लक्ष होईल म्हणुन मी मुल नाहि होऊ दिले"
अशी आई मिळाली हे तूमच भाग्यच आहे... आता तिला सावत्र म्हणण म्हणजे तिच्या प्रेमाचा अपमान होईल..
30 Mar 2009 - 3:22 pm | मराठी_माणूस
इथे 'सावत्र' ह्या प्रचलीत शब्दाचा वापर, वास्तव नाते संबंध दाखवण्या साठी केला असावा , त्या शब्दाच्या प्रचलीत गुण वैशीष्ठा साठी नसावा.
बाकी कविता अप्रतीम
30 Mar 2009 - 4:27 pm | दशानन
सुंदर !
30 Mar 2009 - 5:39 pm | मीनल
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत .
मीनल.
30 Mar 2009 - 8:10 pm | प्राजु
तुमची आई ही कौसल्या होती.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Mar 2009 - 8:16 pm | प्रमोद देव
कविता हृद्य आहे.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
30 Mar 2009 - 9:21 pm | सूहास (not verified)
सुहास..
भले-बुरे जे घडुन गेले || विसरून जाऊ सारे क्षणभर ||
जरा विसावु या वळणावर || या वळणावर ||
30 Mar 2009 - 10:03 pm | शितल
निशब्द केले तुमच्या कवितेने. :)
31 Mar 2009 - 2:52 am | संदीप चित्रे
या लेखाने सुरेख सुरूवात झालीय पण खूप त्रोटक वाटला; तुमच्या आईंबद्दल अजून खूप चांगल्या गोष्टी वाचायला मिळतील असा विश्वास आहे.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com