सावळ्याची तनु सावळी
सावळीच सावली
का न मी झाले सावळी ?
राधा खंतावली
सावळ्याच्या मुरलीसवे
सुर ही सावळे
'काय माझे झाले असे हे'
राधेला ना कळे
गंधावली गवळण वेडी
रास सावळा खेळी
सावळ्याची प्रीत मनी अन
सावळा जळी स्थळी
पैलतीरी सावली सावळी
राधिके साद घाली
गेली वेडावुनी गोपिका
बासरी धुंदावली
प्रीत सावळी, भाव सावळा
श्याम तो सावळा
सुखाची चाहुल सावळी
जग राधे सावळा
विशाल.
प्रतिक्रिया
30 Mar 2009 - 8:23 pm | प्राजु
तुमच्या इतर कवितांसारखी वाचल्या वाचल्या.. "व्वा!!" असं म्हणावं अशी वाटलं नाही ही कविता.
ठीक आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Apr 2009 - 10:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रीत सावळी, भाव सावळा
श्याम तो सावळा
सुखाची चाहुल सावळी
जग राधे सावळा
वरील ओळी खूप सूंदर....!