नववर्षाच्या शुभेच्छा आणि एका नविन उपक्रमाची सुरुवात.

रामदास's picture
रामदास in कलादालन
26 Mar 2009 - 8:36 pm

उद्या एका नविन वर्षाची सुरुवात होते आहे. शुभेच्छा.मिपावर गेल्या वर्षभरात बरेच नविन प्रयोग वाचायला -बघायला मिळाले.एक कमतरता कायम वाटत होती ती म्हणजे व्यंगचित्रांची.चित्रकार छायाचित्रकार आहेत पण व्यंगचित्रकार नाहीत असे वाटत होते.आजचा प्रयोग आहे तो ही पोकळी भरून काढण्यासाठी.मला आवडलेली बरीचशी व्यंगचित्रे मी संग्रहात ठेवली आहेत. यापैकी काही व्यंगचित्रे आपल्यापुढे ठेवतो आहे.या कलाकृती माझ्या नाहीत.बर्‍याचशा इंग्रजी मासीकातून घेतलेल्या आहेत.मला अपेक्षीत आहे तो प्रयोग असा.
जुने व्यंगचित्र नविन चित्रकारानी परत तयार करावे.जुने गाणे नविन आवाजात रेकॉर्ड करतात तसेच. असे नाही केले तर ही व्यंगचित्रे मराठी वाचकांपर्यंत कधीच पोहोचणार नाहीत.
संपादक या प्रयोगाला परवानगी देतील किंवा नाही हे मला माहीती नाही.प्रायोगीक तत्वावर परवानगी द्यावी अशी विनंती.

दलाल स्ट्रीटची काही वर्ष लिहीताना नेहेमी असं वाटायचं की या मालीकेला शोभेलसं चित्र असावं आणि थोडं शोधल्यावर हे मिळालं.

राजकुमार जैन यांना त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून एक गेट वेल सून असे कार्ड पाठवावेसे मनात होते .थोड्या उशीरानी सापडलं ते हे.....

तू आधी डोळे पूस बघू.वेडी कुठली ...मी येणारच आहे बाहेर सहा महीन्यात...

बघा जमणार आहे का हा प्रयोग.

विनोद

प्रतिक्रिया

प्राजु's picture

26 Mar 2009 - 9:04 pm | प्राजु

भन्नाट!
ज ह ब ह रा हा ट...!
दुसरं एकदम फुल्टू..!
राजे,.... लिहा आता आणखी एक अधुरी प्रेम कहाणी.. ;)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

27 Mar 2009 - 11:42 am | दशानन

स्टॉक रेडी आहे.. फक्त माल पब्लिकसाठी ओपन करायचा आहे... जरा मुहुर्त पाहतो आहे ;)

बाकी,

रामदास काका !

लै भारी बॉ =))

सँडी's picture

26 Mar 2009 - 9:07 pm | सँडी

=)) राजे या रिंगणात! ;)

शितल's picture

26 Mar 2009 - 9:46 pm | शितल

=))

निखिल देशपांडे's picture

26 Mar 2009 - 9:52 pm | निखिल देशपांडे

दुसरे व्यंगचित्र मस्तच आले आहे.

राजे काय उत्तर देत आहेत ते बघु आता....

विजुभाऊ's picture

26 Mar 2009 - 9:56 pm | विजुभाऊ

राजे काय उत्तर देणार.
खरे तर राजेंच्या पायाच्या जागी चाके हवी होती चित्रात

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

विसोबा खेचर's picture

27 Mar 2009 - 1:01 am | विसोबा खेचर

रामदासमामा,

व्यंगचित्रे क्लासच आहेत! :)

संपादक या प्रयोगाला परवानगी देतील किंवा नाही हे मला माहीती नाही.प्रायोगीक तत्वावर परवानगी द्यावी अशी विनंती.

ओक्के सर! :)

आपला,
(संपादक) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Mar 2009 - 1:06 am | बिपिन कार्यकर्ते

एकदम झकास उपक्रम आहे हा. येऊ द्या अजून एकाहून एक मस्त फटाके...

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

27 Mar 2009 - 6:23 am | सहज

प्रयोग क्लासच आहे. अर्थात प्रताधिकार, नियमात धरुन जे जमेल तसे.

बघायला नक्की आवडेल.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2009 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार

ज ह ब र्‍या आहे उपक्रम.
अवांतर :- उंची वाढवा बॉ तुम्ही आता राजे... ;)

परा तेंडुलकर
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य