[कधीतरी मंदीबाबतच्या आकडेवाऱ्या, शिक्षण, बाल-मानसशास्त्र असे विषय/प्रतिसाद लिहुन मिपाकरांना बोअर केल्यानंतर जरा वेगळे काही जमते का हे पाहण्यासाठीधी जरा ५ फुटात उडी मारुन पोहायला जमते आहे का ते पाहतोय. वाचकांना हा प्रयत्न आवडला नाही तर समाचार घ्या.]
मन्या, तुझे काय चाललेय, बरेच कानावर येतेय सध्या...वैतागुन पाहू नकोस, आज तुला विचारायचेच असे वाटले. मी नाक खूपसत आहे असे वाटले तर सोडून देतो विषय.
काय ऐकले आहे रे? हेच ना की, तिच्याबरोबर रोज वाद होतायेत
असेच आणि बरेच! म्हणुनच तुला एकदा विचारुन घ्यावे असे वाटले. माझी काही मदत व्हावी असे वाटत असल्यास सांग प्रॉब्लेम काय आहे तो.
अरे, ती मुद्दाम वाद घालत बसतेय. मी काहीही बोललो की, दुर्लक्ष करणे, उडवून लावणे असे केले की, संताप होतो; मग वाद होतातच
ती दुर्लक्ष का करते? सुरुवात कशी झाली?
....... मला सांग, कोणता प्रोजेक्ट बजेटमधे पुर्ण होतो रे, कोणत्या प्रोजेक्टमधे एस्टिमेशन घसरत नाही? तो कस्टमर रोज उलट-सुलट उड्या मारतो, आम्ही त्याच्या तालावर नाच करायचा, रोज सकाळी नवी सुरुवात करायची मग संध्याकाळी रोज उशीरा कोड जाणार. आणि वर परत रात्री अकराला त्याचा फोन येणार; तासभर तो छळणार की, कोड क्वालिटी होपलेस आहे; आमच्या टेस्ट टिमने पोत्याने बग काढलेत. सकाळी ही बया आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला मोकळी. तिला वाटतं की माझ्याकडे जादू आहे. तिला मी हे मुद्दाम करतो आहे असे वाटते. तिला काही सांगायला गेलं की, ऐकून घेत नाही. बॉस आहे तर सोल्युशन दे म्हणावं तर ते तिला झेपत नाही वर माझ्यावर सगळं ढकलून मोकळी. अस्सा वैताग येतो रे. मला सांग का नाही मी वाद घालायचा.
हे बघ, प्रोजेक्ट म्हंटला की, कस्टमर उलट्या-सुलट्या उड्या मारणारच, तु ते फॅक्टर केले नाहीस का?
केले आहे रे, तरी प्रॉब्लेम आहे
मग प्रॉब्लेम काय आहे? कोड क्वालिटीची बोंब कशी होते, उशीर का होतो?
प्रॉब्लेम एक असेल तर ना! इथे १७६० इश्यु, जुने बगही फिक्स करायचे, चेंजेसही रोज डोक्यावर, नेहमीचे कामही चालुच, एक-दोन वेळा पोरांनीही दांड्या मारल्या. रोज मला ५० मिटिंगा. मग रिव्ह्यु बोंबलतो; आलो तर पोरं चहाला गायब असतात. टिममधे ३-४ पोरं नवीन आहेत रे, त्यांना गाईड केल्याशिवाय त्यांची गाडी पुढे सरकत नाही. काय-काय फॅक्टर करायचे रे एस्टिमेशन मधे.
मग प्रॉब्लेम तुझ्या टाईम मॅनेजमेंटचा आहे का?
हो, तसे म्हण हवे तर. स्साला वेळच मिेळत नाही.
मग मी असे म्हणू का, की कोड क्वालिटीचा प्रॉब्लेम तुला हवा तेव्हढा वेळ मिळत नाही म्हणून येतो?
हो
तुला जास्त वेळ कधी हवा असतो टिमला मदत करायला?
दुपारी २ नंतर!
किती वेळ हवा असतो?
सगळाच रे, कोड चेक-इन करेपर्यंत दुसरे कोणतेच काम नसावे तरच ते जमेल.
असे रोज होणे शक्य नाही, तू प्रोजेक्ट लिड आहेस म्हंटल्यावर तुला काहीना काही कामं दुपारी निघणारचं. नक्की कधी तू नसल्यावर घोळ होतो?
साधारण ३-४ नंतर रिव्ह्युला येतो रे रोज कोड; पण मला जास्त लक्ष द्यावं लागते ते नव्या पोरांकडे. त्यांना मदत करावी लागते. समजाउन सांगावे लागते.
मग दुपारी मिटींगा शक्यतो ऍक्सेप्ट करु नकोस.
हे असले सल्ले मला देउ नकोस. तुला माहितीये मला ह्यांनी कशा-कशात गुंतवले आहे- तो सेल्सवाला येतो आणि केस स्ट्डी मागतो, प्रोपोजल रिव्ह्यु कर म्हणतो, तो एचाआरवाला रोज नवा बुट काढतो. अरे काय काय सांगु.
तुला त्यांनी ह्या ऍक्टीव्हीटींमधे कधीपासून गुंतवले आहे?
मागच्या महिन्यापासुन
मग कोड क्वालीटीची तक्रार कधी पासुन सुरु झाली?
साधारण तेव्हाच
तुला खात्री आहे का की, तुला रिव्ह्यु करायला वेळ मिळत नाही म्हणूनच कोड क्वालीटीची तक्रार वाढली आहे?
असेच आहे. मी ज्या-ज्या दिवशी नीट रिव्ह्यु करतो त्या-त्या दिवशी कमी इश्यु असतात.
ज्यादिवशी वेळ मिळत नाही त्यादिवशी किती इश्यु येतात? कोणाच्या कोडमधे कोणत्याप्रकारचे डिफेक्ट असतात? काही ट्रेंड आहे का?
...............
तु टिम बरोबर हे अनालिसिस घेउन बसला आहेस का?
............... अरे बाबा आत्ताच आपण मला वेळ नाही मिळत हे बोललो.
पण तुला ज्यादिवशी चांगला वेळ मिळतो त्यादिवशी तुला दिसणारे सगळे डिफेक्ट तू काढतोस; तुला ते फ़िक्स करुन घ्यायलापण वेळ मिळतो; मग इतर दिवशी तू जरा कॉम्प्र्माईज करतोस का?
....................... ज्यादिवशी चेंजेस जास्त असतात त्यादिवशी जर रिव्ह्यु नाही नीट झाला तर इश्यु जास्त असतात.
नवीन काम तू कोणाला देतोस?
अरे ते सगळे जुने लोक करतात. नव्या पोरांना स्ट्र्क्चर्ड काम असतं. एकदा समजाउन दिले की ते कोडींग चांगले करतात.
मग ज्यादिवशी चेंजेस जास्त असतील तेव्हा इतर ऍक्टीव्हीटींमधे भाग घेउ नकोस. तुझा प्रॉब्लेम तुला "नाही" म्हणता येत नाही ह्याचा आहे का?
................हममम..हो.
मग आधी योग्य त्यावेळी "नाही" म्हणायला शिक. बॉसला कशाला शिव्या घालतोस तुझ्या प्रॉब्लेमेसाठी?
प्रतिक्रिया
26 Mar 2009 - 3:04 am | एक
तरक्की करने के लिये 'ना' बोलना बहोत जरूरी है!"
असं मांडव्याचे विजय दिनानाथ चौहान म्हणून गेले आहेत..
मस्त लेख आहे.
26 Mar 2009 - 3:37 am | धनंजय
नाट्यसंवादातून मॅनेजमेंट शिक्षण.
बर्याच तपशीलवार संवादांना स्व-संपादनाची कात्री लागायला हवी होती असे वाटते. हा एका दीर्घभाषणाच्या बाबतीत माझा प्रयत्न -
शिवाय अशा संवादात एकाचे उत्तर देतच दुसरा सुरुवात करतो (निळी वाक्ये), आणि कथानक पुढे नेतो. तो थांबतो तेव्हा दुसरा तो धागा पकडतो. असे वाचायला बरे वाटते.
खरे तर कोणीच रोजव्यवहारात असे सुसूत्र बोलत नाही. पण मग रोजव्यवहारातल्या प्रत्येक संवादातून मॅनेजमेंटचा धडा तरी कुठे असतो? आपल्या जीवनात एकरेषीय कथासूत्र तर नसतेच. पण वास्तववादी लेखनात कुठेतरी नीट शेवट करायचा असतो.
तरी हा संक्षेप आणि सुसूत्रता बेमालूम लपवावी तर बरे. वाचणार्याला पत्ता लागायला नको, की हे रोजव्यवहारातल्या पाल्हाळापेक्षा खूपच बांधलेले आहे.
असो यात मी वाचकाच्या दृष्टीने लिहिले आहे. लेखकाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी भडकमकर मास्तरांचे तास लावले आहेत ना?
26 Mar 2009 - 8:30 am | अजय भागवत
खरे तर कोणीच रोजव्यवहारात असे सुसूत्र बोलत नाही. पण मग रोजव्यवहारातल्या प्रत्येक संवादातून मॅनेजमेंटचा धडा तरी कुठे असतो? आपल्या जीवनात एकरेषीय कथासूत्र तर नसतेच. पण वास्तववादी लेखनात कुठेतरी नीट शेवट करायचा असतो.
तरी हा संक्षेप आणि सुसूत्रता बेमालूम लपवावी तर बरे. वाचणार्याला पत्ता लागायला नको, की हे रोजव्यवहारातल्या पाल्हाळापेक्षा खूपच बांधलेले आहे.
असो यात मी वाचकाच्या दृष्टीने लिहिले आहे. लेखकाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी भडकमकर मास्तरांचे तास लावले आहेत ना?
ह्या संवादाचा उपयोग मी ज्या कामासाठी करत आहे, त्यासाठी संपादन करतांना तुम्ही दिलेल्या सुचनांचा विचार करेन.
भडकमकर मास्तरांच्या तासांचा उपयोग नक्की होईल. तुमच्या टिकेबद्दल आभार!
26 Mar 2009 - 8:38 pm | अजय भागवत
नाट्यसंवादातून मॅनेजमेंट शिक्षण
हे खरे आहे, त्या संवादात एक टेक्नि़क लपले आहे. सगळे प्रश्न जर नीट पाहिले तर त्याचा सुगावा लागू शकेल.
26 Mar 2009 - 9:24 pm | लिखाळ
नाट्यसंवादातून व्यवस्थापनाचे धडे .. (सौजन्य धनंजय) .. लेखन आवडले.
-- लिखाळ.
26 Mar 2009 - 9:47 pm | निखिल देशपांडे
नाट्यसंवादातून मॅनेजमेंट शिक्षण
असेच म्हणतो........ मस्तच लिहिले आहे