आसवांचा जुना आड आता नाही
वेदनांचे तसे लाड आता नाही..
मांडला मी असा स्वप्न बाजार पुन्हा
वास्तवाच्या भुता 'झाड' आता नाही..
वेदनांची खरी जाहली मज सोबत
संकटांना नव्या "हाssssड", आता नाही..
कल्पनांचा मना लाभला आधार नि...
जाणिवांची तशी चाड आता नाही..
झेलले घाव सारे सदा सुमनांचे
अन नव्याने भ्रमर धाड ....., आता नाही
विशाल
प्रतिक्रिया
25 Mar 2009 - 2:29 pm | विशाल कुलकर्णी
गझल नाही म्हणता येणार नाही याला, पण त्या बाजात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, गोड मानुन घ्या.
सुचना आणि सुधारणांचे स्वागत.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
25 Mar 2009 - 5:56 pm | क्रान्ति
अभिव्यक्ती छान आहे. आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}