"मैञीण"

विवेकवि's picture
विवेकवि in जे न देखे रवी...
30 Jan 2008 - 1:25 pm

एक तरी मैञीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागुन आवाज देणारी
आपल्या साठी हसणारी
वेळ आलीयतर अशॄही पुसणारी
स्वताःच्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळप्रसंगी आपल्या वेड्या
मिञाची
समजूत काढणारी
वाकड पाऊल पडताणा माञ मुस्काडात मारणारी
यशाच्या शिखरांवर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्य़ाच्या घोळकात
आपणांस सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीनं
आपण नसतांना व्याकूळ होणारी
खरच!अशी एक तरी जीवा भावाची
"मैञीण" हवी जी आपणास मिञ म्हणणारी ........

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jan 2008 - 1:59 pm | प्रकाश घाटपांडे

सदर कविता कुणाचि आहे याचा उल्लेख नाही. अन्यथा प्रेषक हाच कवी आहे असा समज होतो.
प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jan 2008 - 2:12 pm | प्रकाश घाटपांडे

http://www.orkut.com/Album.aspx?uid=16167859228268190453&aid=1
या ठीकाणी मला अतुल मुळे यांच्या फोटोत. ऑर्कूटवर भटकताना मिळालेली कविता असा उल्लेख आहे.
कविता मात्र आवडली.
प्रकाश घाटपांडे

सुनील's picture

30 Jan 2008 - 8:13 pm | सुनील

कविता ठीक आहे.

अवांतर - तुम्हाला "मैत्रीण" असे लिहायचे होते का? कारण "मैञिण" ह्या शब्दाचा उच्चार मला तोंड वेंगाडूनदेखील जमला नाही!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

31 Jan 2008 - 12:12 am | ऋषिकेश

"मैञिण" ह्या शब्दाचा उच्चार मला तोंड वेंगाडूनदेखील जमला नाही

:)) ह. ह. पु. वा!!! भलतेच कठिण उच्चार करायला लावता बॉ ;)

स्वाती राजेश's picture

30 Jan 2008 - 8:26 pm | स्वाती राजेश

अवांतर - तुम्हाला "मैत्रीण" असे लिहायचे होते का? कारण "मैञिण" ह्या शब्दाचा उच्चार मला तोंड वेंगाडूनदेखील जमला नाही!!
:)))))))))))))))))

कविते पेक्षा हा झालेला विनोद एंजॉय केला.

प्राजु's picture

30 Jan 2008 - 11:58 pm | प्राजु

स्वाती,
पोट धरून हसले मी. काय गं..

maitriN असं लिहा म्हणजे मैत्रिण असे येईल.

- प्राजु.

चतुरंग's picture

31 Jan 2008 - 12:17 am | चतुरंग

हसून हसून वेडा!

मागे एकदा एका रिक्षावर "ब्बलू" असं लिहिलेलं आठवलं (त्याला बहुदा "बबलू" असं लिहायचं असेल), पण ते वाचून मी सायकलीवरुन पडायच्या घाईला आलो होतो!

चतुरंग

प्राजु's picture

31 Jan 2008 - 12:20 am | प्राजु

मागे एकदा एका रिक्षावर "ब्बलू" असं लिहिलेलं आठवलं (त्याला बहुदा "बबलू" असं लिहायचं असेल), पण ते वाचून मी सायकलीवरुन पडायच्या घाईला आलो होतो!

हाहाहा.... अहो किती हसू आज मी?
आवांतर : तुम्ही पडला नाहीत ना?

- प्राजु

असंच बर्‍याच दुकांनांवर झेरॉक्स च्या ऐवजी जेरोस, झेरॉक, झेरोक्स इ. लिहिलेलं दिसतं तेव्हा हसु येतं.. त्यातही एकदा "झेरोक्ष" वाचल्यावरतर खूप हसल्याचं आठवतंय

प्रकाश घाटपांडे's picture

31 Jan 2008 - 8:25 pm | प्रकाश घाटपांडे

अजुन एक क्षेरोक्ष असे मी वाचले होते. इथ आपल्या अपरोक्ष काहीतरी काळबेरे चालत अस मला वाटायच.( ध चा मा तर होत नसेल ना!) मूळ प्रतीत कवी वेगळा क्षेरोक्ष प्रतीत वेगळा असा चमत्कार तर होत नसेल ना?
प्रकाश घाटपांडे

हातगाड्यावर वाचलं आहे -
"राधेश्याम आईसक्रिस्ट - अंजिर, काजु, मावा, पीस्ता, आंबा आईसक्रिस्ट - जो माल तैयार है वही मिलेगा."

एके ठिकाणी तर मी "आईसस्क्रीम" असं बघितलं आणि अनवधानाने मोठ्यांदा "स्क्रीम" केलं!

चतुरंग

सुनील's picture

31 Jan 2008 - 9:10 pm | सुनील

आय आय टी पवईच्या रस्त्यावर बरीच मार्बलची दुकाने आहेत. त्यापैकी एकाचे नाव वाचल्याचे आठवते - जैन्युइन मार्बल !
Genuine चे देवनागरी स्वरूप मनोरंजक होते खरे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वरदा's picture

1 Feb 2008 - 12:18 am | वरदा

राहीली बाजूलाच ..आणि सही मजा आली हे सगळे जोक्स वाचुन....

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Feb 2008 - 4:17 am | llपुण्याचे पेशवेll

ते दुकान एखाद्या रसिक जैन (रसिक नाव नसून विषेशण समजावे) माणसाचे असावे. आणि या इंग्रजी शब्दावर त्याने मराठी श्लेष (किंवा जो कुठला अलंकार असतो तो)साधला असावा. ज्यात त्याने स्वत:चे जैनत्व आणि Genuineत्व एकत्र एकाच शब्दात गुंफले असावेत.
टीपः विषय सोडून लिहील्याबद्दल क्षमा असावी
पुण्याचे पेशवे