तु नसताना.... !

चंद्रशेखर महामुनी's picture
चंद्रशेखर महामुनी in जे न देखे रवी...
25 Mar 2009 - 12:04 pm

तु नसताना..... !

हा चंद्र फ़िका वाटतो.. गूढ भासतो..सखे.. तु नसताना....
विमनस्क नभी हिंड्तो... खुळा हासतो.. सखे.. तु नसताना...

हरपला ओठीचा सूर.. धडधडे उर.. मनी काहुर....
डोळ्यात दाटला पूर.. रंग बेनूर... सखे.. तु नसताना.... [१]

हा उदास वाहे वारा.. त्यास आवरा.. कुणी सावरा...
शोधितो गंध बावरा... होई कावरा.. सखे.. तु नसताना... [२]

र्‍ह्दयात कोंडला श्वास.. दीर्घ निश्वास.. स्तब्ध अवकाश...
चालला रवि अस्तास... ओठी बिभास... सखे.. तु नसताना... [३]

निःशब्द निळ्या अंगणी.. बघ मुकी शुक्र चांदणी ....
व्याकुळ चंद्र मीलनी... कशी विरहिणी ... सखे.. तु नसताना... [४]

का जीवास लावि पिसे... सखे तु असे... होई ग हसे...
मनी तुझीच प्रतिमा वसे.. तुच तु दिसे...सखे.. तु नसताना.... [५]

- चंद्रशेखर.

कविता

प्रतिक्रिया

जागु's picture

25 Mar 2009 - 2:11 pm | जागु

छान. आवडली कविता. वहीनी माहेरी गेल्यात का ?

जागुतैंचा "पंच" अन महामुनींचा पंच-५ आवडला... त्यावर विशालचा प्र-पंचही छानच...

उमेश__'s picture

25 Mar 2009 - 2:19 pm | उमेश__

वहीनी माहेरी गेल्यात का ?
<:P <:P <:P <:P <:P

विशाल कुलकर्णी's picture

25 Mar 2009 - 2:40 pm | विशाल कुलकर्णी

मस्त झालीय..

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

विशाल कुलकर्णी's picture

25 Mar 2009 - 2:41 pm | विशाल कुलकर्णी

मस्त झालीय..
माझी प्रतिक्रिया अशीही..

तु नसताना...

तु नसताना मनी दाटती
भाव तुझ्या स्मृतींचे काही
आठवणींचे फुलपाखरु
शुभ्र धुक्यातुन विहरत जाई...

विरहात तुझ्या हा चंद्र रोजचा
तोही भासे प्रिये कळाहिन
खिन्न भासे आकाशगंगा
फिके जाहले सर्व नभांगण...

तु नसता सखे सभोवती
तुझेच केवळ तुझेच भास
या समीराच्या कणाकणातुन
फिरतो आहे तुझाच श्वास...

तु नसताना झोप जागते
वैरीण होवुन मला झुरवते
दिवस चालला कुर्मगतीने
रात्र उसासे टाकीतसे...

उतरेना आता कंठाखाली
घासही सखे तु नसताना
विसरु म्हणता विसरत नाही
आठवण तुझी तु नसताना...

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

चंद्रशेखर महामुनी's picture

25 Mar 2009 - 3:58 pm | चंद्रशेखर महामुनी

मित्रांनो... खुप आभारी आहे.... वहिनी माहेरी गेल्यात.... हे लई आवडले.....
आणी विशाल... तुझि कविता पण छान आहे...

क्रान्ति's picture

25 Mar 2009 - 5:59 pm | क्रान्ति

कविताही सुन्दर आणि विशालचा तिच्यावरील प्रतिसादही तितकाच सुन्दर!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

25 Mar 2009 - 8:47 pm | प्राजु

कविता तर सुरेखच आहे.
पण मला...

हा उदास वाहे वारा.. त्यास आवरा.. कुणी सावरा...
शोधितो गंध बावरा... होई कावरा.. सखे.. तु नसताना... [२]

हे जास्ती आवडलं.
विशाल तुमचीही कविता मस्त आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चंद्रशेखर महामुनी's picture

25 Mar 2009 - 11:19 pm | चंद्रशेखर महामुनी

क्रांती... आणी प्राजु... तुमच्या प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद !

सुधीर कांदळकर's picture

26 Mar 2009 - 6:32 pm | सुधीर कांदळकर

आणि रवि अस्ताला बिभास या कल्पना अद्भुतच.

मस्त.
सुधीर कांदळकर.

चंद्रशेखर महामुनी's picture

26 Mar 2009 - 11:51 pm | चंद्रशेखर महामुनी

धन्यवाद ! सुधिर ! बिभास हा संध्या समयि गायला जाणारा राग आहे.... आणि तो व्याकुळ स्वर दर्शवितो....