प्रेरणा: विशाल कुलकर्णी यांची "बाकी ते रुसणेच खरे" कविता.
ह. घ्या.
तुझे ते खाणे भरमसाठ
आठविता गं जीव घाबरे
घास मावेना तोंडात
चरण्या दिवस ना पुरे
तु मावेना कवेत आता
बघ आरशात एकदा सखे
बांधा तुझा आता बघवेना
खाण्याचे भान तुला नुरे
वजनाचे भान काही तुला
चालता भुकंपाचे हादरे
पुन्हा डोकावणे स्वयंपाकघरात
बकासुराची बहिण का गं तु गडे
मणभर भात ताटात
वरणाचे वाहते झरे
उपाशासारखे जेवण ओरबाडणे तुझे
बाकी ते फुगणेच खरे
आपला
(विडंबक)मराठमोळा
प्रतिक्रिया
23 Mar 2009 - 7:27 pm | सूहास (not verified)
लई वगा॑ळ हसलो...
चालता भुकंपाचे हादरे
हाहाहा
उपहास..
(द गुड)