खुळावले नयन, झाले धुंद
सख्या हळुवार तुझी चाहूल
संपले अवचित सारे भास
मनाला पडली कसली भूल
स्तब्ध जाहला, अवखळ वारा
वाजता तुझे नि:शब्द पाऊल
पाचोळाही अन नाद देतसे
बघ उगा तुझ्या येण्याची हूल
विसरले श्वास, तुझाच ध्यास
तु असा कसा रे उंबर फूल
पांघरलेली गात्रांवर ओली
खुळावल्या दंवबिंदुंची झूल
विशाल
प्रतिक्रिया
23 Mar 2009 - 7:06 pm | क्रान्ति
सुरेख नाजूक कविता!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
23 Mar 2009 - 8:30 pm | प्राजु
अतिशय हळूवार..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/