क्षण !
कणकण जळे अन, क्षणक्षण झुरे.. झाला जीव सखे वेडा.. तुझ्या पायी ग..
भरुभरु डोळे बघ, वणवण फ़िरे.. आता इथे-तिथे-कुठे.. ठाई ठाई ग....
तुझ्याविना जग सारे, उदास भकास, गेला हरवुन सूर.. अन हरपले गाणे..
जगताना आणि सांग,किती वेळा करायचे,रोजरोज तेचतेच,खोटे ग बहाणे
एका तुझ्या भेटीपायी,वेड्या वेड्या आशेपायी,उरे श्वास उरे जीव,काही ग..
कण कण जळे अन....... [१]
तुझी मीठी गंध-धुंद,उश्ण श्वास धपापला,क्रिश्णमेघी केसांची ग छाया...
हरवलो हरपलो,आणि विसरुन गेलो,सखे दोन जीव,एक काया..
माझ्या देही तुझा गंध,तुझा माझा एक श्वास,दोन कुडी एक प्राण,ठाई ग..
कण कण जळे अन........ [२]
आता उरी आठवणी,ओठी विरहाची गाणी,तुझी माझी अधुरी कहाणी...
उमलण्या आधी प्रीत ,गेली कोमेजुनी,विरे वार्यावर एक विराणी...
आठवांचा थवा,निळ्या आभाळी चांदवा,मज छळावया माथी येई ग...
कण कण जळे अन........[३]
भग्न ह्रदयात माझ्या,तरी बघ जळणार,प्रेमाची ग तुझ्या-माझ्या ,ज्योति...
कुडी मध्ये श्वास अन,डोळयामधे आस असे,तोवरी ग,तुझी-माझी,प्रीति...
एक क्षण पुरे मज,पुरुनिया उरे अग,आयुश्यही त्याच्यावर जाई ग...
कण कण जळे अन........[४]
- चंद्रशेखर
प्रतिक्रिया
22 Mar 2009 - 11:50 pm | मनीषा
सुरेख कविता ....... आवडली !
22 Mar 2009 - 11:56 pm | चंद्रशेखर महामुनी
आभारि आहे ! बाकिच्या कविता वाचल्यात का ?
वाचुन जरुर कळवा !
23 Mar 2009 - 12:34 am | धमाल नावाचा बैल
कविता आमचा प्रांत नाहि. पण तुमचे नाव फार आवडले महामुनी! अगदी एखाद्या गंभीर कवीला शोभेल असे आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
23 Mar 2009 - 12:15 pm | चंद्रशेखर महामुनी
तुम्हाला आमचे नाव फार आवड्ले हे वाचुन छान वाटले ! शुभेछ्छां बद्दल धन्यवाद !
23 Mar 2009 - 2:51 pm | जागु
कविता आवडली, छान आहे.
23 Mar 2009 - 7:01 pm | क्रान्ति
आवडली. नेहमीप्रमाणेच छान कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}