मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आशा भोसलेंच्या हस्ते झाले आहे. वादात अडकलेल्या साहित्य संमेलनाला त्या उपस्थित राहिल्या हेच खूप. त्यांनी भाषणही बरं केलं. त्यात साहित्यापेक्षा त्यांनी गायलेल्या गाण्यांशी संबंधित काव्याचा जास्त उल्लेख होता. मानापमानाचे नाट्यप्रयोग इथेही रंगले. माजी संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर तर अपमान झाल्याने निघूनच गेले. रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकरांनी आनंद यादवांचे भाषण वाचून दाखवावे असा आग्रह धरला होता म्हणे. मुख्य कार्यक्रमात तर फुटाणेंनी कौतिकरावांचे भाषण थांबवून त्यांना यादवांच्या भाषणांच्या प्रती वाटायचे आश्वासन घेतले. एकुणात वाद काही या संमेलनाची पाठ सोडत नाहीयेत. (तसे कुठल्या संमेलनात वाद झाले नाहीत म्हणा.) इकडे आमच्या हिंदी प्रांतात, मराठी साहित्याचे दरवर्षी संमेलन होते आणि त्यात साहित्यिक, रसिक एकत्र येतात. साहित्याची काहीबाही चर्चा करतात. मुख्य म्हणजे लोक वाचतात याचेच खूप 'कौतिक' आहे.
इथेही संमेलनविषयक काही माहिती मिळाली.
http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/sahityasammelan09/
प्रतिक्रिया
20 Mar 2009 - 7:21 pm | लिखाळ
झाले का उद्घाटन.. वा वा !
-- लिखाळ.
20 Mar 2009 - 7:27 pm | सूहास (not verified)
उद्घाटन!!टन टना टन!!
त्यापेक्षा चा॑गले साहित्यीक(मी सोडुन) मिपावर असतात आणी "मानापमानाचे प्रयोग"करून एकत्र रहातात.
जरा धडा घ्या म्हणाव(हे चा॑गल्या भाषेत आहे साध्या भाषेत जरा खा म्हणाव)
सुहास..
(द गुड)
20 Mar 2009 - 8:00 pm | चिरोटा
गन्गेत घोड न्हाल म्हणायच.!
रुसवे,फुगवे बघितले तर सम्मेलनात राजकारणच जास्त दिसतय.
भलतीच complications दिसता आहेत्.कोण कोणाशी 'पन्गा' घेतोय(आणि का घेतोय) हेच कळत नाही आहे.सरळ मार्ग म्हणजे पुढच्यावेळी नाणेफेक करा मग निवडा अध्यक्ष आणि शहर.असो.
बेन्गळुरुमध्ये मराठी पुस्तके कुठे मिळतिल्?फुटाणे/नायगावकर्/कौतिकराव सान्गतिल काय?
----
भेन्डि(बेन्गळुरु)
20 Mar 2009 - 11:18 pm | सुहास
बेन्गळुरुमध्ये मराठी पुस्तके कुठे मिळतिल्?
गान्धीनगरच्या महाराश्ट्र मंडळाच्या इमारती त चवकशी करणे..
सुहास
20 Mar 2009 - 8:13 pm | वाहीदा
कमाल आहे असे मोठ मोठाले लेखक असून ही ईतके फड्तूस ईगो ते का बाळगतात कळ्त नाही. :-(
बहिणाबाईंसारख्या कवियत्री जर आज असत्या तर कळाले असते साहीत्याची कमान ही nonsense राजकारणांच्या किती पल्याड आहे ते ! त्यांना तर अश्या राजकारणाचा लवलेश ही नव्हता !
पण आशाताईंनी भाषणात त्यांना काही कोपरखळ्या ही दिल्या आहेत .. पण त्यांच्या भाषणात द.मा. मिरासदारांचा उल्लेख नव्हता याचे वाईट वाट्ले ! कवी ग्रेस च्या ओळी आशाताईंनी खुप च सुंदर म्हंट्ल्या !
~ वाहीदा
20 Mar 2009 - 11:40 pm | भडकमकर मास्तर
हातकणंगलेकरांचा नेमका कोणता अपमान झाला ते कळलेले नाही, ( स्टार माझावर ते मोघम बोलून गायबले)
मला कोणी सांगेल काय/?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Mar 2009 - 7:07 pm | सनविवि
ग्रंथदिंडीचे उद्घाटन हातकणंगलेकर येण्याआधीच महामंडळाच्या पदाधिकार्यांनी केले. हा हातकणंगलेकरांना स्वतःचा अपमान वाटल्यामुळे ते संमेलनात फिरकले नाहीत.
21 Mar 2009 - 9:23 pm | उनाड
आशा भोसलेन्च्या सुन्दर भाष्णानन्तर अत्यन्त रटाळ आणी आक्षेपार्ह जातियवादी भाषण करून कौतिकरावान्नी चव घालविली. कौतिकरावानी फुकट अमेरिका वारी घडवून आणल्याने महामन्डळाचे सारे सदस्य मिन्धे आहेत. त्यान्चा आचरटपणाचा जाब विचारायचे धाडस नाही.
22 Mar 2009 - 10:39 am | सनविवि
कौतिकरावांच्या (वा! काय नाव आहे! ;)) भाषणाचा गोषवारा किंवा एखादा दुवा दिलात तर बरे होईल.
23 Mar 2009 - 8:43 am | मराठी_माणूस
कौतिकरावानी फुकट अमेरिका वारी घडवून आणल्याने महामन्डळाचे सारे सदस्य मिन्धे आहेत
ह्या क्षुल्ल्क गोष्टीनी ते मिंधे होत असतील तर ह्या वरुनच त्यांचा दर्जा समजतो
22 Mar 2009 - 7:57 am | प्राजु
कल्पना जरा नवी वाटली. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Mar 2009 - 4:19 pm | विसोबा खेचर
एकुणातच मराठी साहित्य संमेलन हा एक हास्यास्पद प्रकार असतो असे आमचे मत आहे!
तात्या.
22 Mar 2009 - 5:26 pm | यशोधरा
आशा भोसले यांचे भाषण आंतरजालावर कोठे वाचण्यासाठी वा ऐकण्यासाठी उपलब्ध आहे का?
23 Mar 2009 - 1:12 pm | भोचक
इथे सगळा वृत्तांत वाचायला मिळेल.
http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/sahityasammelan09/
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/