वर्तमानपत्रे आणि त्यान्चा दर्जा

चिरोटा's picture
चिरोटा in काथ्याकूट
19 Mar 2009 - 3:11 pm
गाभा: 

पुर्वि(म्हणजे १९९५ पर्यन्त वगैरे) बहुतान्शी व्रुत्तपत्रे (मराठी/इन्ग्रजी/इतर) चान्गल्या दर्जाची असायची.व्रुत्तपत्रान्ची वैचारिक बान्धिलकी जरी कुठलिही असली पत्रकारान्चे लेखन नि:स्प्रुह व भावना न भडकावणारे असे.मराठीत गोविन्द तळवल़कर्/माधव गडकरी वगैरे सम्पादकान्चे सम्पादकिय विद्वत्तापुर्ण असे.सम्पादकिय भुमिकेविषयी वाद होवु शकतील पण पूर्ण अभ्यासाअन्तीच त्यान्चे लेख असत. टाइम्स चे गिरिलाल जैन्,डेरिल डिमोन्टे चे लेख पण असेच.(चेन्नईहुन सगळीकडे प्रसिध्ध होणारा 'द हिन्दु' अजुनपण आपला दर्जा टिकवुन आहे.)
गेल्या काही वर्षात ही परम्परा खन्डीत झालेली दिसते.वर्तमान्पत्र खपवणे हाच एकमेव उद्देश झाल्यावर सामाजिक जाणिव् वगैरे गोष्टी बाजुला पडल्या आणि भडक्,उत्तान,भडकावु बातम्याना महत्व आले.उदाहरण द्यायचे झाले तर्-पुर्वि कुठेही दन्गल वा धार्मिक तेढ उद्भवली की व्रुत्तपत्रे ती बातमी सहसा पहिल्या पानावर देत नसत्.आणी त्यात सरळ उल्लेख टाळत- "समाजातल्या एका धार्मिक गटाने दुसर्या धार्मिक गटावर हल्ला केला वगैरे' .आज व्रुत्तपत्रे अशा बातम्यासाठी चटावलेली दिसतात.
या अधःपतनाची कारणे काय असावीत? लोकान्ची बदललेली आवड/मुल्ये?विद्वान आणि व्यासन्गी पत्रकारान्चा अभाव?
(अवान्तर- 'हे सगळिकडे चालायचेच' असे मला वाटायचे.मात्र युरोप्मध्ये गेल्यावर माझे मत बदलले.बरीच व्रुत्तपत्रे तिकडे आपला दर्जा टिकवुन आहेत.)
------
भेन्डि

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2009 - 3:18 pm | परिकथेतील राजकुमार

खरे आहे हो. आम्ही पण आता तिकडे युरोपमध्येच जाणारे राहायला.

कर्मदळीद्री भारत मेला.

युरोपकुमार
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

कवटी's picture

19 Mar 2009 - 3:56 pm | कवटी

सहमत
आम्हीही युरोपात रहायला जाणारोत.
अवांतरः साला दर्जेदार पेपर वाचल्याशिवाय सकाळी प्रेशरच येत नाही.
कवटी

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2009 - 4:05 pm | परिकथेतील राजकुमार

अवांतरः साला दर्जेदार पेपर वाचल्याशिवाय सकाळी प्रेशरच येत नाही.

तुम्ही तो डिंपल कपाडीया वाला पेपर वाचुन का बघत नाही ?
संदर्भ :- क्रांतीवीर

स्वगत :- झपाटतय ते कवटी आता तुला.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

भाड्खावु बातम्याना महत्व आले

=)) =)) =)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2009 - 3:35 pm | परिकथेतील राजकुमार

त्यांना भवतेक भडकाउ म्हणजेच भावना भडकवणार्‍या असा शब्द वापरायचा असावा :)

परा टिकेतकर
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

चिरोटा's picture

19 Mar 2009 - 3:40 pm | चिरोटा

सुधारले आहे.धन्यवाद. ~X(

ढ's picture

19 Mar 2009 - 3:45 pm |

पण मला येणार्‍या तमाम शिव्या द्याव्यात अशी मस्तक फिरवी(= डोक्याला शॉट?)

बातमी वाचली आज.

अशा लोकांना तालिबानी शिक्षा असाव्यात असं वाटलं.

ठकू's picture

19 Mar 2009 - 3:31 pm | ठकू

कमर्शिअलाईज्ड झालंय सर्वच! 8|

सँडी's picture

19 Mar 2009 - 3:37 pm | सँडी

>>अधःपतन
वर्तमानपत्रेच नव्हे, तर इतर माध्यमे देखील!
उगीचच पराचा कावळा करायची सवय लागलीयं यांना!

व्यावसायिकरण आणि स्पर्धा ही महत्वाची कारणं वाटतातं!

योगी९००'s picture

19 Mar 2009 - 4:33 pm | योगी९००

पराचा कावळा म्हणजे परिकथेतील राजकुमार (प.रा.) यांचा तर कावळा करायचा नाहीना तुमचा विचार...?

खादाडमाऊ

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2009 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार

गेला बाजार काकाकुआ किंवा राजहंस तरी करा हो.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

विंजिनेर's picture

19 Mar 2009 - 5:38 pm | विंजिनेर

जंगमा किंवा कुसुकू चालेल का केला तर? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2009 - 7:55 pm | परिकथेतील राजकुमार

>>जंगमा किंवा कुसुकू चालेल का केला तर?
== बरोबर एक डोक्यानी अंमळ अधु असलेले आजोबा पण सप्रेम भेट द्या. मग रोज सकाळी आमच्या घरातुन हाक जाईलच ..'ए पाववाला...'

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

वेताळ's picture

19 Mar 2009 - 7:42 pm | वेताळ

वर तुम्हाला मराठी नीट टंकता येत नाही असे दिसते. बहुधा तुमचे वाचन देखिल त्या प्रकारचे असावे. त्यामुळे तुम्हाला मराठी व देशी वर्तमानपत्रे दर्जाहिन वाटत असावीत.चला आता युरोपला मंदीच्या काळात जायला एक कारण मिळाले.
वेताळ

मराठी नीट टंकता येत असलेले लेखक निट विचार करून लिहतात असेही नाही. ज्या मुद्यांवर निट अभ्यास नाही तरीही असे महान लोक्स मराठी नीट टंकता येते म्हणून वाट्टेल ते लिहतात :-( अन स्वतःला महान लेखक समजतात :-(
असो
भेंडी बाजार साहेब हल्ली प्रसार माध्यमांचे डोके ठिकाणावर आहे काय असा एक लेख आपल्या मिपावर ही येऊन गेला तो मला आठवत नाही कोणाचा होता पण बहुतेक तात्यांचा असावा .. पण हल्ली प्रसार माध्यमांप्रमाणे वर्तमानपत्रेही दर्जाहिन होत चालली आहेत हे मान्य !
http://www.dnaindia.com/report.asp?newsid=1240453 ही माहीती तर अतीशय धक्कादायक आहे :-(

नितिन थत्ते's picture

19 Mar 2009 - 7:54 pm | नितिन थत्ते

युरोपमध्ये गेलात ते सांगितले नाहीत. तिकडे आमच्या गावाला आमचे काका राहतात. त्यांच्यासाठी इकडून खराटा वगैरे पाठवायचे होते. तुमच्यासोबत देता आले असते. तिकडे पुर्वि (१९९५ पर्यंत वगैरे) मिळायचे त्यांचा दर्जा उच्च होता. गेल्या काही वर्षात ही परम्परा खन्डीत झालेली दिसते.खराटे खपवणे हाच एकमेव उद्देश झाल्यावर दर्जाची जाणिव् वगैरे गोष्टी बाजुला पडल्या. (ह. घ्या) :D

खराटा
(रंग माझा वेगळा)

चिरोटा's picture

19 Mar 2009 - 8:08 pm | चिरोटा

पुढच्या महिन्यात पान्ढर्कवड्याला येणारच आहे. त्यावेळी द्या की. आपले काका गेल्या आठवड्यातच भेटले होते.वरण भात्,अळुची भाजीचा बेत पुढच्या आठ्वड्यात बेत आहे काकान्बरोबर.

नितिन थत्ते's picture

19 Mar 2009 - 8:12 pm | नितिन थत्ते

=))

खराटा
(रंग माझा वेगळा)

खुप महत्वाच्या आणि आवश्यक विषयाला तोंड फोडल्याबद्दल धन्यवाद.सर्व वर्तमानपत्रांचं आता सरळ सरळ राजकीय मुखपत्रांत रुपांतर झालेले दिसतय.सकाळ राष्ट्र्वादीचा,लोकसत्ता कॉन्ग्रेसचा,इ.इ...पुणे प्याटर्न अस्तित्वात आल्याच्या दुसर्या दिवशी अविनाश भोसलेचं प्रकरण बाहेर आलं.अजितदादांनी आर.आर.ना तांबुलसेवनाबद्दल झाडल्यावर एका बारडान्सरचं प्रकरण बाहेर आलं.खरी बातमी मिळते कुठे आजकाल.

चिरोटा's picture

20 Mar 2009 - 10:19 am | चिरोटा

सर्व वर्तमानपत्रांचं आता सरळ सरळ राजकीय मुखपत्रांत रुपांतर झालेले दिसतय

बरोबर्.नावाजलेली इन्ग्रजी व्रुत्तपत्रे पण अपवाद नाहित्.अचानक कुठलातरि इतिहास उकरुन काढायचा आणि सन्धी साधायची हे उद्योग अनेक इन्ग्रजी पत्रकार सध्या करत आहेत.
येत्या काही दिवसात ह्या गोष्टिना आणखी ऊत येईल्.महाराष्ट्रात मराठी/अमराठी,हिन्दु-मुस्लिम वगैरे वाद मुद्दाम उकरुन काढायचे प्रयत्न केले जातील.

राजा's picture

20 Mar 2009 - 5:00 pm | राजा

सर्व वर्तमानपत्रांचं आता सरळ सरळ राजकीय मुखपत्रांत रुपांतर झालेले दिसतय

ख्रर आहे आपआपल्या पक्षाचि लाल करायचि बाकि काय.

आपला
निखिल वाभाडे
IBN फेकमत

विनायक पाचलग's picture

20 Mar 2009 - 11:31 pm | विनायक पाचलग

बरोबर हाय
अपवाद-कोल्हापुर
या पेपरात लय भारी काय नसतय पण जे असतय ते स्पश्ट
उगाच ताकाला जावुन भांडे लापवयचे नाही
सध्या कोल्हापुरात चालु असणार्‍या रस्ते विकास प्रकल्पावरुन हे पुन्हा सिद्ध झाले आहे
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES

विनायक पाचलग