सुभाषित

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जे न देखे रवी...
28 Jan 2008 - 8:47 pm

नमस्कार,

आज एक सुंदर सुभाषित वाचनात आले. ते मिपाकरांच्या आस्वादासाठी येथे देत आहोत. अनेक विद्वांनाना ते माहित असेल. पण ज्यांना माहित नाही, त्यांना कळावे आणि मिपा विविध गोष्टींनी समृद्ध व्यासपीठ व्हावे, यासाठी हा खटाटोप.

येथे लेखन करणार्‍या अनेकांना हे सुभाषित उपयोगी पडेल असे वाटते.

वृत्त वसंततिलका

अर्थो गिरामपिहितः विहितश्च कश्चित्
सौभाग्यमेति मरहट्टवधूकुचाभः |
नान्ध्रीपयोधर इवातितरां प्रकाशो
नो गुर्जरीस्तन इवातितरां निगूढः||

अर्थ -

शब्द योजतांना ते अतिशय गूढ अनाकलनीय नसावेत त्याचप्रमाणे अगदी उघड्यानागड्या अर्थाचेही नसावेत. हे दोन्ही घातक आहे. त्यामुळे ही दोन टोके न गाठता समतोलपणा राखणारे शब्द लेखन करतांना योजावेत.

तसे असले म्हणजे, ते शब्द महाराष्ट्रीय स्त्री च्या स्तनांसारखे सौंदर्यपोषक होतात. आंध्रस्री प्रमाणे अगदी उघडे नसावेत आणि गुर्जर स्री सारखे फार झाकलेले नसावेत.

आपला,
(संस्कृतप्रेमी) धोंडोपंत

सुभाषिते

प्रतिक्रिया

मि.पा.वरील लेखकूंसाठी तर अगदी चपखलच!
एकूणच आयुष्यात समतोल साधत पुढे जाणं फारच अवघड पण अत्यंत आवश्यकही आहे.
त्यामुळे प्रयत्न चालूच ठेवणे आवश्यक.

अशीच अजून सुभाषिते वाचायला मिळोत.

चतुरंग

धनंजय's picture

28 Jan 2008 - 9:12 pm | धनंजय

स्त्रीवेषाच्या उपमा गमतीदार असतात. आणि कधीकधी चपखल असतात आणि अगदी पटतात.

(आंध्रमधले लोक ओरिसातल्यांना अति-उघड्या, महाराष्ट्रातल्यांना अति-झाकलेल्या मानत असतील; गुजरातेतील लोक महाराष्ट्रातल्यांना अति-उघड्या, अरबस्तानातल्यांना अति-झाकलेल्या मानत असतील - पण तो फरक करून ते लोकही हे सुभाषित "आपले" मानून घेऊ शकतील.)

अवांतर :
आकडेशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) हे सत्याकडे पोचण्याचा उत्तम मार्ग आहे, पण स्वतःहून ते चरम उद्देश्य नाही याबाबत आमच्या प्रोफेसरने हे वाक्य सांगितले :

स्टॅटिस्टिक्सचे आकडे 'बिकिनी'सारखे असतात - जे उघड करतात ते लक्षवेधक असते, पण जे झाकून ठेवतात त्यातच गोम असते.
व्हॉट दे रिव्हील इज इंटरेस्टिंग, व्हॉट दे कनसील इज व्हायटल!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2008 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंत,

शब्द योजतांना ते अतिशय गूढ अनाकलनीय नसावेत त्याचप्रमाणे अगदी उघड्यानागड्या अर्थाचेही नसावेत. हे दोन्ही घातक आहे. त्यामुळे ही दोन टोके न गाठता समतोलपणा राखणारे शब्द लेखन करतांना योजावेत.

आवडले !!!

तसे असले म्हणजे, ते शब्द महाराष्ट्रीय स्त्री च्या स्तनांसारखे सौंदर्यपोषक होतात. आंध्रस्री प्रमाणे अगदी उघडे नसावेत आणि गुर्जर स्री सारखे फार झाकलेले नसावेत.

या बाबतीत सुभाषितकाराने वापरलेल्या उपमांचा उद्देश सहीच आहे. पण, स्टॅटिस्टिक्सचे आकडे 'बिकिनी'सारखे असतात - जे उघड करतात ते लक्षवेधक असते, पण जे झाकून ठेवतात त्यातच गोम असते.
व्हॉट दे रिव्हील इज इंटरेस्टिंग, व्हॉट दे कनसील इज व्हायटल!

याच्याशीही सहमत आहे . :)))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केशवराव's picture

28 Jan 2008 - 10:29 pm | केशवराव

व्वा धोंडोपंत,
तुमच्या या सुभाषिताने [ ? ] मि.पा. चे व्यासपिठ अगदी सम्रुद्ध झाले. [ आता तिन्ही राज्यांच्या स्त्रीयांकडून येणार्‍या प्रतीसादांना सामोरे जा.]

धोंडोपंत's picture

29 Jan 2008 - 12:36 pm | धोंडोपंत

केशवराव

"समृद्ध" शब्द असा लिहितात.

आपला,
(सूचक)धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव's picture

29 Jan 2008 - 4:05 pm | केशवराव

धोंडोपंत,
शब्द कसा लिहीतात ते माहीत होते , पण ' ग म भ न ' वर लिहायला जमत नव्हते. तुम्ही सांगितल्यावर अनेक प्रयत्न करून जमले एकदाचे.
सुचना केल्याबद्दल आभारी.
केशवराव.

विसोबा खेचर's picture

28 Jan 2008 - 11:50 pm | विसोबा खेचर

तसे असले म्हणजे, ते शब्द महाराष्ट्रीय स्त्री च्या स्तनांसारखे सौंदर्यपोषक होतात. आंध्रस्री प्रमाणे अगदी उघडे नसावेत आणि गुर्जर स्री सारखे फार झाकलेले नसावेत.

खल्लास रे धोंड्या! सुभाषित छानच आहे...

आपला,
(सुभाषितप्रेमी) तात्या.

पिवळा डांबिस's picture

29 Jan 2008 - 12:19 am | पिवळा डांबिस

काहीतरीच काय!
..
हे धोंडोपंत अगदी रंगेलच होत चाललेत दिवसेंदिवस!!
..
जनाची नाही तर मनाची तरी?
..
वहिनीला जाऊन सांगायलाच पाहिजे!

आ*** (आता यांना 'आपली' तरी कसं म्हणायचं!)
पिवळी शेवंता

धोंडोपंत's picture

29 Jan 2008 - 12:33 pm | धोंडोपंत

आ*** (आता यांना 'आपली' तरी कसं म्हणायचं!)
पिवळी शेवंता

खरं आहे. तुम्ही आम्हांला आपली वगैरे म्हणू नका.

please spare me.

धन्यवाद.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवसुमार's picture

29 Jan 2008 - 4:24 pm | केशवसुमार

सुभाषित...
धोंडोपंत...
संस्कृत सगळ डोक्यावरून गेले..
पण आपण सांगितलेला अर्थ वाचून सुभाषित खूपच मार्मिक आहे असे म्हणावेसे वाटते..
(संस्कृत निरक्षर) केशवसुमार

नेने's picture

29 Jan 2008 - 10:36 pm | नेने

'ज्याप्रमाणे कुलवधू आपले अवयव झाकून घेते त्याप्रमाणे ज्ञानी माणूस आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन मांडीत नाही' अशा अर्थीच्या ज्ञानेश्वरीतील एका सुंदर ओवीची आठवण झाली. " नातरि कुळवधू लपवी अवेवातें "