माझी नावडती मैत्रिण

किट्टु's picture
किट्टु in जनातलं, मनातलं
13 Mar 2009 - 8:37 pm

आज पण मला आठवतं, तिची आणि माझी पहिली भेट... तिला पाहुन मी इतकी जोरात ओरडली होती, कि माझ्या दोन्ही रुम-पार्टनरस(रु-पा) पळत आल्या होत्या. तो दिवस तिचा आमच्या रुम मधला पहिला दिवस होता.

आणि तेव्हा पासुन ती आमच्या रुम मधे तळ ठोकुन बसली. जा जा म्हंट्ल तरी बयेच जायच नाव नाही, सर्व करुन झालं होतं अगदी धक्का मारुन, हाकलुन.. पण ती नुसती निर्लज्ज..

हळुहळु तिला माहीत झालं होत की मला ती अजिबात आवडत नाही, मग काय मी जेव्हा एकटी रुम वर असणार तेव्हा त्या बाईसाहेब अगदी थांबल्याच पाहिजे.. ~X( हळुह्ळु मला तिची भिती कमी वाट्त होती पण ती मला कधी रुम मधे आवडलीच नाही. माझ्या रु-पा मात्र तिला माझी "best friend" म्हणु लागल्या होत्या...

अशी ती माझी नावडती मैत्रिण 'पाल' (तीच भिंतीवरची). आम्ही तिचं नाव 'चिंकी' ठेवल होतं.

एकदा आम्हाला होस्टेलच्या पायरीवर एक 'सरडा' दिसला होता तेव्हा माझ्या रु-पा ने त्याला चिंकीचे आजोबा असं म्हंटल होतं...

नंतर कॉलेज संपेपर्यंत चिंकीचा मुक्काम आमच्याच रुम मधेच होता.. आज पण जेव्हा जेव्हा मी चिंकीची जुळी बहिण बघते तेव्हा तेव्हा मला चिंकीची आठवण येते.

चिंकी हा माझा पहीला वहीला लेख तुला समर्पित.

रेखाटनलेख

प्रतिक्रिया

चकली's picture

13 Mar 2009 - 8:44 pm | चकली

"best friend" म्हणु लागल्या होत्या....:D
चकली
http://chakali.blogspot.com

शिवापा's picture

13 Mar 2009 - 9:21 pm | शिवापा

माझ्या जुन्या ऑफिसात एक चिचुन्द्री यायची रात्री. तिचे नाव आम्हि "पिंची ठेवले होते" तिच्यासाठी खायला म्हणुन मी फिश फूड नेमके माझ्या एका मित्राच्या खुर्चीखाली ठेवायचो. बिचारा आगोदर रात्रभर खुर्चित उड्या मारायचा. नंतर म्हणे त्याने "पिंचीचा खून केला होता"
पिंची हा माझा सोळावा प्रतिसाद तुला समर्पित!

मराठमोळा's picture

13 Mar 2009 - 10:15 pm | मराठमोळा

नंतर म्हणे त्याने "पिंचीचा खून केला होता"पिंची हा माझा सोळावा प्रतिसाद तुला समर्पित!

=)) =)) =)) =)) =)) =))

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

क्रान्ति's picture

13 Mar 2009 - 11:04 pm | क्रान्ति

लक्षात ठेवून नावडत्या मैत्रिणीबद्दल लिहिलस! तिला किती छान वाटत असेल बर!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

जृंभणश्वान's picture

13 Mar 2009 - 11:29 pm | जृंभणश्वान

बरे वाटले पालीवर वाचून.
इतके दिवस झाले आता तरी नावडती म्हणू नका हो, पाली चांगल्या असतात, ट्यूबभोवती जमा होणारे किडे खातात. (पण पालींना कोण खाणार असे म्हणू नका :))

शक्तिमान's picture

13 Mar 2009 - 11:54 pm | शक्तिमान

>>पण पालींना कोण खाणार
चिनी, जपानी लोक

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2009 - 11:01 am | परिकथेतील राजकुमार

एका 'क्ष' हॉस्टेल मधिल तरुणांना आम्ही जिवंत पाल मेणबती वर जाळुन त्या धुराची नशा करताना याची देही याची डोळा बघितले आहे.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

किट्टु's picture

14 Mar 2009 - 1:29 pm | किट्टु

विचार करुनच चक्कर आली..... @)

दशानन's picture

14 Mar 2009 - 5:24 pm | दशानन

लै भारी ;)

* जिव मळमळला राव :(

योगी९००'s picture

14 Mar 2009 - 12:56 am | योगी९००

कोठेतरी वाचले की पाल तोंडावर पडली की गोड खायला मिळते..

कोणा़कोणाला गोड खायचे आहे?

खादाडमाऊ

जृंभणश्वान's picture

14 Mar 2009 - 1:01 am | जृंभणश्वान

कोठेतरी वाचले की पाल तोंडावर पडली की गोड खायला मिळते.
असे असेल कदाचित -
पाल तोंडावर(तोंड उघडे असताना) पडली की गोड खायला मिळते

नरेश_'s picture

14 Mar 2009 - 9:24 am | नरेश_

कोठेतरी वाचले की पाल तोंडावर पडली की गोड खायला मिळते..

कोणाला ? आपल्याला, की पालीला ? ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

विसोबा खेचर's picture

14 Mar 2009 - 1:31 am | विसोबा खेचर

पाल..!

आमची अत्यंत आवडती आणि जिव्हाळ्याची मैत्रिण! :)

घरात कुठेही दिसली की लगेच आम्ही तिला पकडायचा प्रयत्न करतो. सहसा हाती लागत नाही परंतु केव्हातरी कुठल्यातरी कोपर्‍यात अडचणीत सापडते आणि आम्ही तिला हलकेच पकडतो. तिचे जवळून निरिक्षण करतो, घटकाभर तिच्याशी गुजगोष्टी करतो अन् देतो सोडून..! :)

आता मुद्द्याचं -

प्रत्येक प्राणिमात्राला परमेश्वराने म्हणा, निसर्गाने म्हणा, स्वत:चा बचाव करण्याचं काही एक साधन दिलेलं आहे. पालीची आपल्यापैकी बर्‍याच जणांना नेहमी किळस वाटते! मनुष्यप्राण्याला तिच्याकडे पाहून तिची किळस वाटणे, नेमका हच मुद्दा तिचं बचावाचं साधन ठरतो हे आपल्यापैकी किती जणांच्या लक्षात येतं?! :)

आपला,
(पालप्रेमी) तात्या.

किट्टु's picture

14 Mar 2009 - 1:39 pm | किट्टु

तात्या,

तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण काय करणार ती खरंच खुप किळसवाणी वाट्ते. आणि वरुन ती पाल कधीही कुठेही घुसणार... :SS

--
(पाल व अळ्यांना घाबरणारी) किट्टु

आनंदयात्री's picture

14 Mar 2009 - 1:44 am | आनंदयात्री

हा हा हा .. मस्तच :)

अवलिया's picture

14 Mar 2009 - 8:32 am | अवलिया

लै भारी

--अवलिया

मुक्ता २०'s picture

14 Mar 2009 - 8:36 am | मुक्ता २०

रूम मधली पाल तरी बरी असते..!! आपल्याला पळायला स्कोप असतो... #:S
पण ती बाथरूम मध्ये आली कि वाट लागते... :S आधिच बाथरूम लहान, कुठे पळापळ करायची?? :SS

शक्तिमान's picture

14 Mar 2009 - 12:19 pm | शक्तिमान

=)) =)) =)) =))

योगी९००'s picture

14 Mar 2009 - 2:43 pm | योगी९००

लहानपणापासून पालीची भिती वाटल्याने मला मगर्,सुसर यांचे Video बघायला सुद्धा भिती वाटते.

मगर्,सुसर बिचारे कसे शांत पडून असतात. जसे काही पुतळेच..वाटते की जवळून जाऊन हुल द्यावी आणि पळावे..

चेन्नाईजवळ कांचीवरमला एक मंदिर आहे. तेथे एक मोठी लो़खंडी पाल आहे (सोन्याचा मुलामा दिलेली) . त्या पालीला हात लावल्याने आपली सगळी पापे (पाप चे अनेक्वचन) नष्ट होतात. पण त्या पालीला सुद्धा हात लावायचे धाडस मला झाले नाही.

आणखी एक गोष्ट ..चेन्नाईजवळ एका सुसर/मगर उद्यानात मी शहाणपणाकरून एका मगरीचा ( १० फुट लांब होत्या या बाईसाहेब) फारच जवळून म्हणजे ३-४ फुटावरून फोटो घेतला. जाळीच्या आत हळूच शिरून फोटो मारला होता. त्यानंतर तेथील सुरक्षाव्यवस्थेने मला चांगलेच तासले होते. मला दोन तास अडकवले होते. त्यांचे म्हणणे असे होते की आम्ही येथे स्पष्ट लिहीले असताना की मगरीच्या जवळ जाऊ नका, तुम्हाला हे नसते उद्योग कोणी सांगितले आहेत?

जर त्यावेळी त्या मगरीने उडी मारली असती तर आज मिसळपाव या महान प्रतिक्रियेला मुकले असते. अमिताभ बच्चन किंवा कोणीही हिरो जेव्हा मगर/सुसर यांच्याबरोबर लढाई करतो तेव्हा डोके आपटून घ्यावे असे वाटते. उगाच काहीतरी दाखवतात. प्रत्यक्ष खरीखुरी मगर जर समोर आली तर या लोकाची चड्डी पिवळी होईल.

जरा कल्पना करा की उद्या पालीऐवजी एक खरी मगर तुमच्या भिंतीवर किंवा बेडवर आहे...काय अवस्था होईल..? म्हणूनच मी मगर/सुसर यांची सॉफ्ट खेळ्णीसुद्दा घरी माझ्या मुलीसाठी आणत नाही.

खादाडमाऊ
(पापी माणूस)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2009 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

जरा कल्पना करा की उद्या पालीऐवजी एक खरी मगर तुमच्या भिंतीवर किंवा बेडवर आहे...काय अवस्था होईल..?
काहि होत नाही हो एक अप्लेनलीबे मागेल अजुन काय करणार बिचारी ? ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य