वामनावताराचे ३९ वे शतक!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
24 Jan 2008 - 8:35 pm

स्व.डॉन ब्रॅडमन यांच्या घरच्या मैदानावर तडाखेबंद फलंदाजीने ३९ वे शतक झळकावून सचिनने कांगारुंना जाणीव करुन दिली की "चड्डीत रहा" नाहीतर "नाड्या" माझ्या हातात आहेत!!

क्रीडाअभिनंदन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 10:17 pm | विसोबा खेचर

सचिनचे मन:पूर्वक अभिनंदन!

त्याच्यासारख्या गुणी आणि विनम्र खेळाडूचे खरोखरंच अभिमानमिश्रित कौतुक वाटते!

आपला,
(सचिनप्रेमी) तात्या.

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 10:41 pm | पिवळा डांबिस

या खेळाडूकडे उत्तम पदलालित्य असले पाहिजे!
हा सचिन नवीन खेळाडू आहे का?

पूर्वी आमच्या काळी एक संदिप पाटील नवीन खेळाडू होता. त्यानेही ऑस्ट्रेलिअन्सना झोडपून काढलं होतं. तो खेळतो का अजून?

आपला,
(क्रिकेटशी संबंध सुटलेला) पिवळा डांबिस

सुनील's picture

24 Jan 2008 - 10:56 pm | सुनील

कोण तो संदीप पाटील? तो वाडेकर-गावस्कर-सोलकरांच्या टिममध्ये होता का?

आम्हाला आपले बॅटींगमधेले हे तिघे आणि बोलिंगमधले प्रसन्ना, चन्द्रशेखर आणि बेदीच माहिती बॉ!!

(जुना-पुराणा) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

"डांबिस" [ खरे तर ड्यांबिस असायला हवे पण चलता है ] यांनी म्हणल्याप्रमाणे खरच भारताचा सुवर्णकाळ होता तो ..........
पण आपल्या दूर्दैवाने "संदिप पाटील"ने अवेळी स्वेच्छानिवॄत्ती स्विकारली ...........

काय काळ होता तो महाराजा ..........
संदिप पाटीलची गोलंदाजांची कत्तल केल्यागत फलंदाजी, त्याचे चित्याच्या चपळाईचे क्षेत्ररक्षण.........,
चेतन शर्माची दाहक व अचूक फिरकी गोलंदाजी [ फलंदाजांना चकवून बोल्ड काढण्यात त्यांचा हातखंड होता , शिवाय सामन्याच्या महत्वाच्या क्षणाला अतिशय नियंत्रित गोलंदाजी ह्यात त्यांना अख्ख्या जगात तोड नव्हती - आठवा ती शारजाची मॅच व मियाँदादला टाकलेली लास्त ओव्हर ]..........,
मोहिंदर अमरनाथ ची शिस्तबध्ध कप्तानी ...........,
मियाँदादची मैदानावरची सूसंस्कॄत वागणूक ...........,
"शकूर राणा" या पाकिस्तानी पंचची ईमानदार व निष्पक्षपाती पंचगिरी .....
अजून किती सांगू महाराजा ????

खरच नव्या पिढीने खूप काही मिस केले ....

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 11:26 pm | पिवळा डांबिस

आपण मूळचे रत्नागिरीचे का हो?
नाही म्हणजे पत्राची शैली तशीच दिसतेय म्हणून विचारतो!!

मी फक्त खालील विधानेच केली:
आमच्या काळी संदिप पाटिल हा नवा खेळाडू होता....ही वस्तुस्थिती आहे.
त्याने ऑस्ट्रेलिअन्सना झोडपून काढले होते........ही पण वस्तुस्थिती आहे.
मी फक्त इतकेच विचारले की तो अजून खेळतो का?
बाकी सर्व कॉमेंटरी तुम्हीच केली आहे.

"डांबिस" [ खरे तर ड्यांबिस असायला हवे पण चलता है ] यांनी म्हणल्याप्रमाणे खरच भारताचा सुवर्णकाळ होता तो ..........

मी मुळीच म्हटले नाही की आमच्याकाळी "सुवर्णकाळ" होता आणि आता "ऍल्युमिनियम" काळ चालू आहे म्हणून.
उगीच असे शिंगावर घेऊ नये, बाळा!
(प्रेमळ) डांबिसकाका

छोटा डॉन's picture

24 Jan 2008 - 11:45 pm | छोटा डॉन

"मी मुळीच म्हटले नाही की आमच्याकाळी "सुवर्णकाळ" होता आणि आता "ऍल्युमिनियम" काळ चालू आहे म्हणून."

अहो "सुवर्णकाळ"वगैरे माझे शब्द आहेत.... आपण म्हणले की "त्याने ऑस्ट्रेलिअन्सना झोडपून काढले होते", मला मान्य आहे ही वस्तूस्थिती आहे पण सहज आपला "ऊपरोधीक" विनोद केला. बाकीचा मजकूर वाचला तर ही गोष्ट आपल्या ध्यानात येईलच .........
आपण विचारले तो अजून खेळतो का? मला वाटले की आपण पण विनोदाच्या मूडमध्ये आहात म्हणूनच मी एवढी लांबड लावली....
जर आपल्या भावना दूखावल्या असतील तर क्षमा मागतो .......
"उगीच असे शिंगावर घेऊ नये, बाळा!"
माझा असा अजिबात हेतू नव्हता !!! हेतू फक्त विनोद होता व शैली ही ऊपरोधीक होती ........

तेव्हा कॄपया गैरसमज नसावा ................

आपला आज्ञाधारक पूतण्या [ छोटू ]

पिवळा डांबिस's picture

25 Jan 2008 - 12:16 am | पिवळा डांबिस

क्षमा मागायची गरज नाही, छोटूराव!
काका-पुतण्यात क्षमा वगैरे कसली मागता? :))
डांबिसकाका

चतुरंग's picture

25 Jan 2008 - 12:01 am | चतुरंग

संदीप पाटील व सचिन यांची तुलना करु नका, माझ्यामते तो सचिनचा अपमान आहे!!
बाकी सूज्ञास सांगणे न लगे!!

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

25 Jan 2008 - 12:19 am | पिवळा डांबिस

आम्हाला सचिनचा खेळच बघायचे भाग्य मिळालेले नाही, तर आम्ही तुलना काय करणार, कपाळ?
(दुर्भागी) पिवळा डांबिस

केशवराव's picture

24 Jan 2008 - 11:44 pm | केशवराव

सचिन हे एक भारतीय क्रिकेटला पडलेले स्वप्न आहे. त्याच्या टिकाकाराना तो त्याच्या बॅटनेच उत्तर देत असतो. कांगांरुंना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा तो एक शुर शिपाई आहे. किप ईट अप सचिन!

मानस's picture

25 Jan 2008 - 4:16 am | मानस

सचिनच्या संदर्भात इतकेच म्हणावेसे वाटते

“Form is temporary, Class is permenant” He is class apart.

भडकमकर मास्तर's picture

25 Jan 2008 - 11:57 pm | भडकमकर मास्तर

टीव्ही समोरून आम्ही हललो नाही,काल... ब्रेट ली आणि त्याच्यात काय सामना झाला....आणि हॊग वगैरे लिंबूटिंबू लोकांना त्याने असे दूर दूर भिरकावलेय की बोलता सोय नाही.......आम्हाला त्यांनी सेकंड इन्निंग ला ही असेच खेळावे अशी आशा आहे....आमची बोटे फ़ुली करून आम्ही बसलो आहोत.....