जागतिक महिला दिन..अन् बिच्चारे पुरुष ! :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
7 Mar 2009 - 9:35 pm
गाभा: 

               जागतिक महिला दिन आला की, स्त्रियांच्या प्रश्नांची,समस्यांची, त्यांच्या प्रगतीची मांडामांड सुरु होते.मग काही तक्ते,संशोधन, निष्कर्षे आणि त्या स्थितीतून स्त्री बाहेर यावी यासाठीच्या नियोजनांची चर्चा होते. ती चांगलीच गोष्ट. स्त्रीची अधिक प्रगती व्हावी याबद्दल शंकाच नाही पण तिचा पहिला प्रश्न असतो की पुरुषांच्या जोखडातून स्त्री मुक्त झाली पाहिजे. तिला पुरुषांइतकेच स्वतंत्र स्थान मिळाले पाहिजे. लग्न हा मूर्खपणाचा कळस आहे, पुरुषांनी स्त्रियांवर कायमची मालकी हक्क गाजवण्याचा तो एक कट आहे. स्त्रीला मुले होतात आणि पुरुषांना होत नाही इतकाच काय तो फरक ! (भविष्यात पुरुषांनाही होतील असे ऐकले ,वाचले आहे. ) खरं तर स्त्रियांना समाजात एक मानाचं, गौरवाचं स्थान मिळावं यासाठी अनेक पुरुष विचारवंतानी  प्रयत्न केले आहेत. स्त्री चळवळी किंवा त्यांच्यासाठी काम करणा-यांच्या बाबतीत काही अभ्यासकांचे म्हणणे आहे की, पुरुषांवर  एकांगी टीका करण्याच्या प्रयत्नात पुरुषांकडून मिळालेल्या फायद्याकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात. स्त्री म्हणजे, गोगोड बोलणारी, सुंदर, मृदू, चतुर, उच्च विचार, अशा स्वभावाची ( अंदाजे हं ) पण स्त्रियांच्या चळवळी ही सर्व वैशिष्ट्ये नष्ट करायच्या मागे लागल्या आहेत. स्त्रीयांच्या मासिकांमधून पुरुषांवर जरब बसावी अशी उदाहरणे वाचून अनेकदा स्त्रिया आक्रमक होण्याची शक्यता असते, त्यामुळे पती-पत्नीचे संबध दुरावतात, जे संबंध परस्पराविषयी जिव्हाळा, प्रेम, यावर उभारायचे त्यात या स्त्रीवादी विचारांनी नातेसंबधात रुक्षपणा  आणि निव्वळ त्यात व्यवहार आणीत आहेत.                   आपल्या हक्कासाठी सतत भांडणारे पती-पत्नी आपल्या मुलांच्या समोर कोणता आदर्श ठेवतील. पुरुष हे वाईटच अशी समजूत असणा-या स्त्रियांना माहीतच असेल की आपल्या कुटुंबावर प्रेम करणारे व बायकामुलांच्यासाठी अहोरात्र श्रम करणारे पुरुष असतात हेही सत्यच असते. नव-याला सोडून, मुलांना नातेवाईकांवर सोपवून, दुस-या पुरुषांबरोबर लग्न करुन किंवा न करता स्वबळावर नोकरी करुन किंवा तशाच राहणा-या स्त्रियांचे अशा प्रसंगी कौतुक केले जाते. स्त्री कुठे स्थिर होऊ शकते असा मार्ग तिने निवडावा. पण स्त्रीचे वैभव म्हणजे संसाररथाचे चाक होणा-या समर्पणात असावे असे वाटते. पुरुष बदमाश आहेत, गुन्हेगार आहेत, स्त्रीच्या प्रगतीतील अडथळा आहे अशी भावना अशा दिनाच्या निमित्ताने वाढीस लागते असे वाटते. खरं म्हणजे स्त्रीने पुरुषांना अशी लेबले लावल्याने स्त्री सुखी होईल का ? काही पुरुष, स्त्रियांचे मानसिक, शारीरिक शोषण सामाजिक जीवन जगतांना करतात ...वगैरे..पण अशा प्रश्नांचीही काही उत्तरे असतात. म्हणून समस्त पुरुष तस्साच आहे, हे जरासे न पटणारे आहे. कुटुंबव्यवस्था टिकवण्याची मोठी जवाबदारी स्त्रीची असते तिथे तिने पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवला पाहिजे. तिथूनच दोघांच्या  अधिक सुखाचे मार्ग खुले होतात असे वाटते. घटस्फोट घेणा-या बायका म्हणजे धाडसी, आक्रमक स्त्रिया म्हणजे धाडसी, पुरुषांना वठणीवर आणतात त्या ख-या टेरर स्रिया, वगैरे अशी चुकीची मूल्य स्थापीत होत आहेत. स्त्री-पुरुष यांचे प्रेम, ओढ, हे नैसर्गिक आहे.यातून स्त्रीयांना वेगळे करण्याचे कारस्थान...वेगवेगळ्या  संस्था / संघटना करतात असेही वाटते.  शोषित, पिडीत,   आणि खूप काही सोसणा-या  स्त्रियांचे   जिव्हाळ्याचे प्रश्न खूप आहेत, त्याचबरोबर एकीकडे पत्नीपिडितांचीही संख्या वाढत आहे. तेव्हा  चुकीच्या मूल्यांमुळे आपण पुरुषांवर अन्याय तर करत नाही ना ? असाही विचार आजच्या दिवसानिमित्त झाला पाहिजे ?

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2009 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोकरी करणारी स्त्रीच्या निमित्ताने तेथील लेख / प्रतिसाद वाचून प्रतिसाद टाकायचा होता...मग त्याला जरा वेगळ्या स्वरुपात टाकावे असा विचार डोकावला..म्हणून हा प्रपंच...

मिपावरील महिलांना / तरुणींना मात्र महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! :)

सहज's picture

8 Mar 2009 - 6:07 am | सहज

विडंबन आहे का सर? बर बरं :-)

स्त्रीमुक्तीच्या (काही अवास्तव कल्पना) जोरदार व प्रसंगी धोकादायक /आक्रमक वेगाला हा स्पीड्ब्रेकर लेख, किंचीत वेगळा विचार ना?

मृदुला's picture

7 Mar 2009 - 11:39 pm | मृदुला

नातेसंबंधांत गोगोड, जिव्हाळ्याचे काय ते सगळे स्त्रीकडूनच यावे असा हट्ट नसावा. (हेच समानतेचे वागणे.)

पत्नीपीडित नाहीत असे मी म्हणणार नाही, पण त्यांची संख्या पती/पुरुष पीडित स्त्रियांच्या मानाने नगण्य ठरेल.

पतीकडून मार खाणारी स्त्री बिचारी ठरते, कारण ती दुबळी असणे गृहित आहे. पत्नीकडून मार खाणारा नवरा हास्यास्पद ठरतो कारण तो आक्रमक असणे गृहित आहे. ही प्राचीन गृहितके नष्ट व्हावीत; दोन्ही पीडितांकडे सहानुभूतीने बघावे. (ही पुन्हा समानता.)

--

लोकसत्तेत दर शनिवारी विज्ञानमयी नावाचे यशस्वी स्त्री शास्त्रज्ञांची माहिती देणारे सदर येते. त्यातील बहुतेक शास्त्रज्ञ अविवाहित आहेत. असे का होत असावे?

लिखाळ's picture

8 Mar 2009 - 12:09 am | लिखाळ

पतीकडून मार खाणारी स्त्री बिचारी ठरते, कारण ती दुबळी असणे गृहित आहे. पत्नीकडून मार खाणारा नवरा हास्यास्पद ठरतो कारण तो आक्रमक असणे गृहित आहे. ही प्राचीन गृहितके नष्ट व्हावीत; दोन्ही पीडितांकडे सहानुभूतीने बघावे. (ही पुन्हा समानता.)

वा छान.. समर्पक !

लोकसत्तेत दर शनिवारी विज्ञानमयी नावाचे यशस्वी स्त्री शास्त्रज्ञांची माहिती देणारे सदर येते. त्यातील बहुतेक शास्त्रज्ञ अविवाहित आहेत. असे का होत असावे?

मंगळ असलेली स्त्री का नको याचे उत्तर आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर एकच असावे !
मंगळदोष ही अंधश्रद्धा आहे असे काही आधुनिक ज्योतिषी सांगतात. अहो मंगळ हे धडाडी, कार्यक्षमता, यंत्रकुशलता यांचे प्रतिक. पूर्वीच्या काळात स्त्रीचे स्थान घरात होते. चूल आणि मूल. एकत्र कुटुंब पद्धती होती. अशी धडाडीची स्त्री सून म्हणून आल्यावर कुटुंबकलह वाढेल म्हणून पूर्वाचार्यानी तो दोष मानला. (यंदा कर्तव्य आहे? भाग ५ मधून साभार.) :)

-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2009 - 1:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>नातेसंबंधांत गोगोड, जिव्हाळ्याचे काय ते सगळे स्त्रीकडूनच यावे असा हट्ट नसावा.
सहमत आहे !
>>पतीकडून मार खाणारी स्त्री बिचारी ठरते, कारण ती दुबळी असणे गृहित आहे. पत्नीकडून मार खाणारा नवरा हास्यास्पद ठरतो कारण तो आक्रमक असणे गृहित आहे. ही प्राचीन गृहितके नष्ट व्हावीत; दोन्ही पीडितांकडे सहानुभूतीने बघावे.

याच्याशीही सहमत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल नावाचा बैल's picture

7 Mar 2009 - 11:41 pm | धमाल नावाचा बैल

हा हा हा. च्यायला प्रा.डॉ. तुमी पण का? :)

बैलोबा

विसोबा खेचर's picture

8 Mar 2009 - 12:32 am | विसोबा खेचर

सर,

आपली उद्विग्नता अगदी स्पष्ट कळते आहे. माझी आपल्याला सहानुभूती आहे! :)

तरी वारंवार सांगत होतो की लग्न करू नका, त्यात फसू नका, त्या भानगडीत पडू नका..!

पण तेव्हा ऐकलं नाहीत...! :)

असो...

आपला,
(सुखी अविवाहीत!) तात्या.

अवलिया's picture

8 Mar 2009 - 9:16 am | अवलिया

तात्यांशी संपुर्ण सहमत :)

(सुखी अविवाहित) अवलिया

टारझन's picture

8 Mar 2009 - 11:50 am | टारझन

णाना, हातावरच्या रेषा शाबूत आहेत का हो ? ;)

(ण्यूट्रल अविवाहित) टार्‍या

दशानन's picture

9 Mar 2009 - 8:54 am | दशानन

अतिसहमत.

* आपलंच स्वगत : आधी जेवायला कोण घालणार ह्या चिंतेत लग्न केले, आता तीला खायला घालायचे आहे म्हणून चिंतेत.... पुरुषांची जातच मेली चिंते साठी व चिता साठी ;)


ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2009 - 12:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे चाल्लंय काय ! तात्या...

ही काही आमची उद्विग्नता नाही. सुदैवाने आम्ही पडलो गाव-गाड्याचे लोक. आम्हाला ही तुमची वैचारिक आणि अमुक-अमुक समानता झेपत नाही. आमच्याकडे अजूनही समानता वगैरे..दैनिकामधून वाचायला बरं वाटतात. आपण आम्हाला बॅकवर्ड म्हणा...पण आमच्याच बद्दल सांगायचं तर आमच्याकडे पारंपरिक स्त्री दिसेल आणि आम्ही मालक ;)

सांगतो एक किस्सा ! आमच्याकडे एक अर्थशास्त्राचे माझे एक स्टाफ मेंबर मित्र आहेत.( तुमच्या अर्थशास्त्राच्या मित्राबद्दल नाही बोलत मी. हल्ली ते संस्थळावरुन परांगंदे झालेत म्हणे..कुठेतरी डायरीची पानं वाचतात, घरात पडलेल्या पुस्तकावर समीक्षण लिहितात त्यांची नव्हे ही ष्टोरी ) तर ते एक वधुवर सुचक मंडळ चालवतात. लोकांशी संपर्क आहे..अनेकांना सूखी संसाराचे सल्ले देतात. आणि पत्नीच्या कटकटीमुळे आठ दिवस न सांगता फरार झाले. पुन्हा आलेत तो भाग वेगळा.

प्रसंग दुसरा. आमच्याच एका दोस्ताचा किस्सा. एका कुटुंबात तीन भाऊ आहेत. तिघांचेही लग्न झालेत. तीन स्त्रिया असल्यामुळे भांड्यांचे आवाज नेहमीचेच. माणसं वैतागून गेलेत. हळूहळू क्रमांक दोनच्या भावाच्या बायकोला अधून-मधुन फीटचे झटके यायला लागलेत. दातखिळी बसायला लागली. दवाखाने झाले, पैसे खर्च होऊ लागले. उपाय संपले. एक दिवस आमच्या दोस्ताचे आणि आमचे दोन-दोन घोट झालेत आणि निष्कर्षावर आलो की, ते वेगळे झालेत की आजार दूर होईल. झालेच तसे..ते वेगळे निघाले आणि फीटचा आजार आता राहिला नाही.

तात्या, शोधले तर खूप प्रसंग सांगता येतील. म्हणून हा प्रपंच :)

-दिलीप बिरुटे

प्रमोद देव's picture

8 Mar 2009 - 10:20 am | प्रमोद देव

ही संसार रथाची दोन चाकं आहेत. त्यातलं एक चाक जरी रखडलं तरी संसाराचा गाडा व्यवस्थितपणे चालणार नाही.....असे कुणा विद्वान माणसाने म्हणून ठेवलंय,ते अगदी बरोबर आहे.
स्त्री मुक्ती म्हणजे काय?
मला असे वाटते की प्रपंचामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेल्या स्त्रीला स्वतःचीही काही मते,आवडी असतात हे मान्य करणे,त्याची दखल घेणे. कामाच्या निमित्ताने पुरूष ८-१०तास तरी घराबाहेर असतो. खरे तर त्याकाळात स्त्री आपल्या आवडी निवडींना योग्य ती दिशा देऊ शकते पण तिच्या नैसर्गिक स्वभावामुळे ती स्वतःबद्दल विचार न करता फक्त आपला नवरा,मुलंबाळं आणि आपला संसार ह्याबद्दलच विचार करत असते. नवरा घरी असताना त्याचे हुकुम,आज्ञा पाळण्यातच ती इतिकर्तव्यता मानत असते.प्रसंगी बोलणी खाते,मारही खाते. एखाद्या वेळी जीवही गमावते. म्हणजे थोडक्यात काय तर ती सदैव 'बंदी' असते. नवराही अशा स्त्रीला(बायकोला) काही मन असतं,तिच्याही काही आवडी असू शकतात ह्याचा कधीच विचार करत नसतो.
स्त्री आणि दलित ही माणसेच नव्हेत तेव्हां त्यांचा विचार कशाला करायचा असाच एकूण ग्रह समाजमनात असावा असे वाटते.

हल्ली तर स्त्रिया घरचं सगळं आवरून-सावरून नोकर्‍याही करतात तरीही त्यांना निर्णयस्वातंत्र्य नसतं. काहीही करायचे असेल तरी नवर्‍याचा सल्ला घ्यावाच लागतो. निदान आधी त्याच्या कानावर घालावे लगते.
ह्या सर्वांचा परिपाक म्हणून काही बंडखोर(हो,पुरुषांच्या ह्या अघोषित अरेरावीला विरोध करणे म्हणजे बंडच होय)स्त्रियांनी स्त्री मुक्ती चळवळ सुरु केलेय आणि तिला निदान उच्च वर्गीय महिलांकडूनतरी सक्रीय पाठिंबा मिळतोय. पण मला स्वतःला ही चळवळ काही प्रमाणात अतिरेकी वाटतेय. स्त्री मुक्ती म्हणजे पुरुषांपासून मुक्ती असा त्यांचा नारा म्हणजे शुद्ध फसवणूक आहे असे वाटते. स्त्री आणि पुरूष हे निसर्गातील उत्पत्तीचे द्योतक आहे आणि दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत हे एकमेव सत्त्य आहे.
म्हणून स्त्री आणि पुरूष दोघेही एकमेकांना पुरक व्हावेत....अशी चळवळ खरे तर व्हायला व्हावी. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे किंवा एकाने दुसर्‍यावर केलेला आणि दुसर्‍याने तो सहन करण्याचा अन्याय नव्हे. एकमेकांना समजून घेऊन,एकमेकांची प्रगती कशी साधता येईल हे बघितले पाहिजे.
आजवर पुरूषाने स्त्रीवर अन्याय केला मग आता स्त्रीने ती कसर भरून काढायला हवी...म्हणून तीने पुरूषावर अन्याय करायला हवा...असा काहीसा स्त्रीमुक्तीवाद्यांचा दावा दिसतोय. त्यामुळे नवीनच प्रश्न उभे राहात आहेत. काही देशात नवर्‍यांनी आपल्या संघटना उभारायला सुरुवात केलेय. म्हणजे एकूण काय तर आपण निसर्गाच्या विरोधात जातो आहोत.
स्त्री ही देखिल आपल्यासारखीच संवेदनशील व्यक्ती आहे,तिच्यातही आपल्यासारखेच गुण-दोष आहेत; आई,बहीण,मुलगी वगैरे विविध नात्याने ती आपल्याशी निगडित आहे.
पुरूष हा बाप,भाऊ,नवरा वगैरे नात्यांनी आपल्याशी निगडित आहे ; तेव्हा आपण दोघांनी एकमेकांना समजून घेऊन संसार करावा असे पुरुषांनाआणि स्त्रियांना वाटायला हवंय . तरच काही चांगले घडेल. बाकी हे स्त्री मुक्ती-पुरुष मुक्ती वगैरे मला तरी सगळी ढोंगं वाटतात. निव्वळ स्वैराचार करण्यासाठीचे हे बहाणे आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2009 - 1:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मला स्वतःला ही चळवळ काही प्रमाणात अतिरेकी वाटतेय. स्त्री मुक्ती म्हणजे पुरुषांपासून मुक्ती असा त्यांचा नारा म्हणजे शुद्ध फसवणूक आहे असे वाटते. स्त्री आणि पुरूष हे निसर्गातील उत्पत्तीचे द्योतक आहे आणि दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत हे एकमेव सत्त्य आहे.

सहमत आहे ! स्त्रियांच्या अतिरेकी वागण्यामुळे पुरुषच नव्हे तर कुटुंब व्यवस्था उद्धवस्त होत आहे, असे वाटायला लागले आहे.

चित्रा's picture

9 Mar 2009 - 8:23 am | चित्रा

स्त्रियांच्या अतिरेकी वागण्यामुळे कुटुंबसंस्था विस्कळित!

हा एखाद्या वर्तमानपत्राचा सनसनाटी मथळा वाटतो आहे. नक्की स्त्रियांचे अतिरेकी वागणे म्हणजे कसे ठरवायचे?
नक्की कोणते वागणे हे अतिरेकी वागण्यात मोडेल?

वर काही प्रसंग वर्णन केले आहेत -
१. एकत्र कुटुंबात राहणे नको असणे, त्यासाठी बतावण्या करणे. बतावण्या करण्याचा वेडेपणा सोडला तर एकत्र कुटुंबात राहण्याची तयारी नसणे ही बाब समाजाची घडी विस्कटवत असते का? अशा पद्धतीने साठसत्तरच्या दशकांपासून वेगळे राहत असलेल्या सगळ्या स्त्रीपुरुषांना आधी दोषी धरले पाहिजे. मी स्वत: आयुष्यभर एकत्र कुटुंबात १२+ माणसांच्या वाढले आहे, त्याचे फायदेतोटे जवळून पाहिले आहेत. बाहेरच्याही एकेकट्या घरातील स्त्रियांना असलेले स्वातंत्र्य पाहिले आहे, तसेच त्यामुळे आलेल्या जबाबदार्‍याही पाहिल्या आहेत. नक्की सामान्य स्त्री वेगळे राहण्याचे म्हणते तेव्हा ती नक्की काय चूक बोलत असते?
२. नवरा पत्नीच्या त्राग्याने पळून जाणे. भारतातील किती सामान्य कुटुंबांत असे घडले आहे/नेहमी घडते? संख्या काढली तर ज्या घरांतकामाच्या बायकांचे नवरे त्यांना मारतात त्यापेक्षा कमीच संख्या भरेल हे नक्की. म्हणजे काही सुशिक्षित संसारांमध्ये जे काही दिसते आहे त्यावरून असे निष्कर्ष काढणे बरोबर नाही.

याचा अर्थ बायका संतमहात्मे असतात आणि पुरूष तेवढे दुष्ट असा नाही. किंवा स्त्रियांच्या स्थितीला फक्त पुरूषच ते जबाबदार असाही नाही, पण सुशिक्षित स्त्रियांच्याही संधी, किंवा त्यांच्या जबाबदार्‍या या पुरूषांच्या जबाबदार्‍यांच्या व्यस्त प्रमाणात असतात असे दिसते. बाकी गरीब स्त्रियांचे तर सोडूनच द्या.

स्वातंत्र्याचा अर्थ जबाबदार्‍यांपासून लांब पळणे असा नाही, तर घरातील/बाहेरील जबाबदार्‍यांचे प्रमाण हे विचाराने ठरवता येणे. केवळ स्त्री आहे म्हणून तिने अमूक एक त्याग केलाच पाहिजे अशी समाजाची (किंवा खरे तर घरच्यांची अपेक्षा) नसणे. पुरूषांपासून मुक्ती अशी व्याख्या सर्व स्त्रीमुक्ती वाद्यांची असते असे नाही असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2009 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>स्त्रियांच्या अतिरेकी वागण्यामुळे कुटुंबसंस्था विस्कळित!

हम्म, विधान लिहिण्याच्या भरात जरा जास्तच झाले वाटतं. पण स्त्रियांच्या अतिरेकी वागण्यामुळे कुटुंब जरा विस्कळीत होते,जरासा सौम्य झटका सहन करावा लागतो. स्त्रियांचे अतिरेकी वागणे म्हणजे काय ? एकत्र कुटुंब व्यवस्थेत तिला तिच्या मनासारखं म्हणजे तितके स्वातंत्र्य नसतं, तेव्हा तीची म्हणे घुसमट होते, तीची ती अस्वस्थता व्यक्त होतांना इतरांची त्रेधातिरपीट होते. समाजमान्य चौकटीच्या बाहेर आधुनिक विचारांची लागन होऊन स्त्रीने अवास्तव अपेक्षा किंवा तसे वागू नये असे जेव्हा वाटत असते तेव्हा तीचे ते व्यक्त होणे...अशा अनेक लहानसहान प्रसंगातून...तिचे अतिरेकी वागणे असे आम्हाला म्हणायचे आहे. (मग तिने तसे का करु नये असा प्रश्न नका विचारु बॊ ! ) >>सामान्य स्त्री वेगळे राहण्याचे म्हणते तेव्हा ती नक्की काय चूक बोलत असते?
का बरं ! तिने एकत्र कुटुंबात राहू नये का ? तिच्या वेगळ्या होण्याने केवळ ती स्वतंत्र होत नाही तर ती अनेकांच्या भाव-भावना, नाती-गोती विस्कटून टाकत नाही का ? तिच्या एकटीच्या सूखासाठी अख्ख्या कुटुंबाला वेठीस धरावे हे काही आम्हाला पटत नाही .

एकेकाळी काही मासिके (उदा. स्त्री) सातत्याने स्त्रियांविषयी लेखन करीत. मिळून सार्‍याजणीत अजूनही असे लेखन छापून येत असते - ते वाचणारे स्त्री-पुरुष मला माहिती आहेत. स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणार्‍या बायका जास्त करून समाजवादी चळवळींमधल्याच असल्याने समाजवादी विचारांचा तसेच बाहेरच्या (पाश्चात्य) देशातील चळवळी/सेमिनार यातील अनुभव आणि पगडा त्यांच्या लेखनात दिसतो. पण माझ्यापुरते सांगायचे तर मला ते वाचायचा शेवटी वीट आला - शिवाय प्रत्येक दु:खाचे कारण कोणता ना कोणता पुरुष. शेवटी तर त्यांतील कथांतल्या बर्‍या-वाईट पुरुषांचीही दया यायला लागली.

काल आपल्या चर्चेचीतील वाक्यांची आम्हाला आठवण झाली. आमच्या मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात काल कामानिमित्त एका महाविद्यालयात गेलो होतो. तिथे प्राचार्य सौ... ....... यांची भेट झाली. त्या शिकत असतांना एसएफआय च्या चळवळीत काम करायच्या, आजही दोन हजार महिलांचे संघटन आहे. आणि त्यांच्या प्रश्नांच्या संबधी त्या जागृकपणे त्यांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतात. त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या..आणि आम्ही विषयाला हात घातला. तेव्हा त्या म्हणाल्या पाश्चिमात्य किंवा आधुनिक शहरातील स्त्री स्वातंत्र्याची कल्पना आपल्या मराठवाड्यात तितकी रुजली नाही. पाश्चिमात्य किंवा आधूनिक म्हणवल्या जाणा-या स्त्रीयांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना जरा अधिक टोकाच्या आहेत. अजूनही एखादी स्त्री जेव्हा पुरुषाकडुन जाळल्या जाते तेव्हा ती पोलिसांना पंचनाम्याच्या वेळेस सांगते की, मी ष्टोहच्या भडक्याने, रॊकेलचा दिवा अंगावर पडल्याने पेटले असे म्हणते....असं ती का म्हणते तर...माझ्यानंतर माझ्या मुलांच काय असा प्रश्न तेव्हाही तिला भेड्सावत असतो.
असो, सांगायचा मुद्दा असा की, अवास्तव स्त्री स्वातंत्र्याच्या, कल्पना तिच्यापर्यंत अजूनही पोहचल्या नाहीत असे वाटते..असो,
त्या अधिक चर्चेबद्दल नंतर कधी तरी.

स्त्रियांच्या कटकटीला वैतागून असे जाळून घेणारे, किंवा पळून जाणा-यांची संख्या कमी असते, ते सर्व भावनिक तीव्रतेवर अवलंबून असते असे वाटते. पुरुष त्या मानाने अशा ब-याच भावना सहन करणारा वाटतो

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

12 Mar 2009 - 5:58 am | चित्रा

तेव्हा तीची म्हणे घुसमट होते, तीची ती अस्वस्थता व्यक्त होतांना इतरांची त्रेधातिरपीट होते.

इतरांची त्रेधातिरपीट होते हे मान्य आहे, तरी "म्हणे" कानाला खटकले.
इतरांची त्रेधा उडू नये म्हणून होऊ नये म्हणून स्त्रीने आपली अस्वस्थता कायम दाबून ठेवणे हा पर्याय तिच्या दृष्टीने (मानसिक/शारिरीक) ठीक नाही. स्त्रीच्या अपेक्षा अवास्तव कधी म्हणाव्यात? जर एखाद्या स्त्रीला घरी आठ-पंधरा माणसांचा स्वैपाक, घरचे पाहुणे, मुलांचे अभ्यास, नवर्‍याची फिरतीची नोकरी, त्यातच सासूसासर्‍यांचा सांभाळ, आईवडिलांचा पत्कर हे सर्व करायला लागले, आणि ती आजूबाजूला इतर स्त्रियांना मिळणारा वेळ, त्यांचे स्वातंत्र्य पाहू लागली, तर तिची या तुलनेमुळे घुसमट होणार नाही तर काय होईल?

तसे जर झाले नाही, तर एक प्रकारचे संतपण तिला प्राप्त झाले आहे असे समजू शकतो. पण असे सहसा होत नाही, ती साधी इच्छाआकांक्षायुक्त माणूसच राहते. आता इथे स्त्री सुशिक्षित आहे, का अशिक्षित, किंवा कमी शिक्षित हा भाग आपण सोडून देऊ. ती किती शिक्षित आहे यामुळे तिची होणारी घुसमट ही कमीजास्त असू शकेल कदाचित.

> तिने एकत्र कुटुंबात राहू नये का ? तिच्या वेगळ्या होण्याने केवळ ती स्वतंत्र होत नाही तर ती अनेकांच्या भाव-भावना, नाती-गोती विस्कटून टाकत नाही का ?

असे कोणीच म्हटले नाही.

एकत्र कुटुंबांचे फायदे (विशेषतः मुलांना) खूपच आहेत. पण त्याचबरोबर विभक्त कुटुंबांतील स्त्रियांना मिळणारे आनंद/स्वतःचा वेळ हवा तसा वापरता येण्याचे स्वातंत्र्य हेही खूप आहे. स्त्रियांचे छंद वगैरे सोडा, अगदी साधे उदाहरण देते - एकत्र कुटुंबांत राहून आपल्या मित्रमैत्रिणींना हवे तेव्हा घरी बोलावण्याचे स्वातंत्र्य किती स्त्रीपुरूषांना मिळते? माझ्या माहितीतील उदाहरणांत फार कमी. अशी अनेक वेगळी वेगळी उदाहरणे सापडतील.

वेगळे राहताना बरेचदा भावना विस्कटतात यातही काही खोटे नाही, पण जरा नीट पाहिल्यास वेगळे राहिल्याने भावना विस्कटल्याच पाहिजेत असे नाही असे दिसेल. घरातल्यांना गरज असल्यास /आनंदाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगी लांब राहिलेला भाऊ किंवा वहिनी मदतीला जातच नाही असेही नाही. अर्थात यातून वेगळे राहणे हेच काय ते योग्य, त्याने सर्व प्रश्न सुटतात असे मी समजत नाही. वेगळे राहायचे असल्यास शक्य तितके घरातल्या सर्वांना विश्वासात घ्यावे, हे नक्की.

बाकी माझी जी वाक्ये आपण दिली आहेत, ती मला आजही योग्य वाटतात. पुरूष हे स्त्रियांच्या दु:खाचे मूळ कारण मी समजत नाही. तसेच स्त्रियांनी आणि पुरूषांनीही कायम एकाच चौकटीत राहून व्यवहार केला पाहिजे हे पटत नाही.

नितिन थत्ते's picture

9 Mar 2009 - 4:57 pm | नितिन थत्ते

बर्‍याचदा स्त्री मुक्तीवाद्यांचे काय म्हणणे आहे हे नीट समजून न घेताच काही विधाने केली जातात.
माझी पत्नी काही काळ स्त्री मुक्ती संघटनेच्या जवळून संपर्कात होती. त्यावेळी स्त्री मुक्ती म्हणजे समानतेचा आग्रह हे समजून आले. समानता म्हणजे सिगरेट ओढणे किंवा दारू पिणे नव्हे तर स्त्री ही देखील माणूस आहे असे मानून व्यवहार असावा याचा आग्रह.
आज 'राखी सावंत' सारख्या स्त्रिया मुक्त आहेत असे मीडियामध्ये समजले जात असले तरी स्त्रीमुक्तीच्या क्षेत्रात काम करणारे तिला मुक्त मानत नाहीत तर स्त्रीचे 'उपभोग्य व प्रदर्शनीय वस्तू' म्हणून असलेल्या स्टिरिओटायपिंगला खतपाणी घालणार्‍या स्त्रिया म्हणून तिच्याकडे स्त्रिमुक्तीवाद्यांकडून पाहिले जाते.

टीपः वर एखाद्या विशिष्ट स्त्रीचे नाव लिहिले असले तरी ते फक्त प्रातिनिधिक आहे. दुसरे म्हणजे तिने काय करावे हा तिचा प्रश्न आहे त्यामुळे ते स्वातंत्र्य तिला हवेच. फक्त मुक्त स्त्रीचे रोल मॉडेल म्हणून ती स्वीकारार्ह असणार नाही.

कुटुंब उध्वस्त होऊ नये म्हणून पुरुषांनी आपल्या आवडीनिवडी, छंद आणि करिअरचा बळी दिल्याची उदाहरणे किती असतील?
या गोष्टींसाठी आग्रह धरणार्‍या स्त्रियांमुळे कुटुम्बव्यवस्था ढासळत आहे असे म्हणणे हे अयोग्यच. आपली कुटुंबव्यवस्था अशा एकतर्फी त्यागावर उभी असेल तर ती ढासळलेलीच बरी.

पुरुषांना पुरुषप्रधानतेच्या जेखडातून मुक्त करण्याची गरज ओळखून मुंबईत 'मावा (मेन अगेन्स्ट व्हॉयलन्स & ऍब्यूज)' अशी एक संघटना कार्य करीत आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मृदुला's picture

10 Mar 2009 - 4:40 am | मृदुला

खराटा आणि चित्रा यांच्याशी सहमत.

स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांशी भांडण नव्हे, तर केवळ समानतेची रास्त मागणी.

सायली पानसे's picture

10 Mar 2009 - 11:36 am | सायली पानसे

चित्रा आणि खराटा यांच्याशी सहमत.
आणि मृदुला म्हणते त्याप्रमाणे स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांशी भांडण नव्हे, तर केवळ समानतेची रास्त मागणी. इथे समानता फक्त हक्कांची नाही तर जवाबदारीत सुध्दा... जर का स्त्री बरोबरीने जवाबदारी उचलते तर तिने समान हक्क मागितले तर गैर नाही. जे हक्क एका कमवात्या पुरुषाला आहेत तेच एका कमावत्या स्त्रीला द्यायला किती पुरुष मनापासुन तयार होतात?
संसारात गरज म्हणून जेंव्हा स्त्री नोकरी करुन नवर्‍याला हातभार लावते अर्थात घरच्या जवाबदार्‍या संभाळुन ..तेंव्हा किति पुरुष तिच्या कामात तिला मदत करतात?
त्यात आज एक चांगली गोष्ट आहे कि निदान आजच्या पिढीतले पुरुष आपल्या पत्निला तिच्या घरातल्या जवाबदर्‍या संभाळण्यात सुध्दा मदत करतात आणि तिला मान देतात. घर दोघांनि मिळुन बनवायच असत आणि दोघांच्या प्रयत्नाने टिकवायचे असते.. जेव्हा घर सावरण्यासाठी एकच जण प्रयत्न करतो किंवा करते तेंव्हा ते तुटण्याचे जास्त चान्सेस असतात... कोणा एकाच्या माथी ते खापर फोडणे योग्य नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2009 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>कुटुंब उध्वस्त होऊ नये म्हणून पुरुषांनी आपल्या आवडीनिवडी, छंद आणि करिअरचा बळी दिल्याची उदाहरणे किती असतील?
कुटुंब व्यवस्था उध्वस्त होऊ नये म्हणून पुरुष आपल्या आवडी निवडी, छंद आणि आपल्या करियरचा बळी देतात का ? याचे उत्तर माझ्यापूर्ते असे की, त्यांचा त्याग न करताही ते कुटुंबव्यवस्थेला जपण्याचा प्रयत्न करतात, करत असावेत असे वाटते. कुटुंबाला पुरेशी जागा नाही, मूलभूत गरजा भागत नाही अशा वेळी कौटुंबिक अस्वास्थ वाढत जाते व त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्याला पुरुषही नाही आणि स्त्रीही जवाबदार असत नाही, तो दुसरा प्रश्न...

-दिलीप बिरुटे

विकास's picture

9 Mar 2009 - 12:00 am | विकास

मला वाटते सर या लेखात नाण्याची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल नंतर वेळ मिळाल्यास...

पण एक मजेशीर निरीक्षण आत्ताच केले:

म.टा. मधे तीन बातम्या "झणझणीत वेब मसाला " च्या खाली ओळीत होत्या. त्यांची शिर्षके अशी: त्यांचे फोटो तर काय विचारू नका.

  • महिला दिन विशेष
  • पीटरसन पत्नीचे सेक्स सिक्रेट
  • रणबीरचा पहिला सेक्स

तेच टाईम्स मधे फक्त त्यांनी जागतीक महीला दिन वगैरे म्हणले नाही...

इ-सकाळ मधे "तोच खरा महिला दिन..." या लेखाच्या बाजूस असलेल्या (क्लिक ऍड) जाहीराती: (मी चिकटवू शकत होतो, पण डिलीट केले, उचीत न वाटल्याने. पण २२ ते ४० वयोगटातील ६ बायका (युरोपीअन दिसणार्‍या, विविध देशातील) त्यांचे फोटो, ओठांची चित्रे वगैरे...

इतरत्रपण असेल पण आत्ता इतकेच बघू शकलो.

असो. जागतिक महीला दिनानिमित्त शुभेच्छा! :-)

प्राजु's picture

9 Mar 2009 - 2:21 am | प्राजु

मुक्ती ही नेमकी कशापासून ? विचार करण्याची क्षमता असून सुद्धा विचार स्वातंत्र्य नसणे , निर्णय स्वातंत्र्य नसणे... यातून मुक्ती हवी असेल तर ती योग्य आहे.
आणि ही मुक्ती बर्‍याच वेळेला ती स्त्री कोणत्या थरातील आहे यावरही असते.
चार घरची धुणीभांडी करणारी स्त्री, किंवा शेतावर मजूर म्हणून काम करणारी स्त्री.. आणि एखाद्या मोठ्या कंपनीत व्यवस्थापिका म्हणून काम करणारी स्त्री...बघायला गेलं तर दोन्ही स्त्रीया पैसा मिळवतच असतात. नोकरी करत असतात. पण शेतावर काम करणार्‍या स्त्री दृष्टीने स्त्री मुक्तीची व्याख्या वेगळी असू शकेल. तिने मिळवेलेल्या पैशाचा उअपयोग कुठे कसा करायचा.. याचा निर्णय घेणं म्हणजे तिच्या दृष्टीने स्त्री मुक्ती असू शकते.
आणि घरातल्या लिव्हिंगरूम मध्ये कोणत्या भिंतीवर कोणतं पेंटिंग लावायचं (तिच्या मनाप्रमाणे) याचं स्वातंत्र्य असणं हे त्या व्यवस्थापिका स्त्रीच्या दृष्टीने स्त्रीमुक्तीची व्याख्या असू शकते कारण पैसा तर तीच्या हाती आहेच. म्हणजेच काय तर, स्त्री मुक्तीची व्याख्या ही समाजानुसार , राहणीमानानुसार आणि आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बदलते हेच खरं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2009 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वत:चे समाजातील स्थान शोधणे,स्त्री- पुरुष समानतेवर आधारलेले विश्वाची निर्मिती करणे, पुरुष प्रधान समाजातील काही लूपहोल्स शोधायचे आणि त्याविरुद्ध लेखन करायचे अशा विचारांना फेमिनिष्ट लेखन म्हटल्या जाते, त्याचे उदाहरण म्हणजे, मृदूला, चित्रा, आणि तुमचा प्रतिसाद :)

चर्चेचा उद्देशच मुळी..पुरुषांपासून मूक्ती नसावी या करिताच टाकलेला होता. स्त्री आणि पुरुषाच्या चौकटी समाजाने तयार केलेल्या आहेत. पुरुष म्हणजे शौर्य,साहस, महत्वकांक्षा इत्यादी आणि स्त्री म्हणजे चुल-मुल.. इत्यादी इत्यादी अशी, पारंपारिक चौकटी मोडून काढायच्या म्हणजे स्त्री मुक्ती असावी... तेव्हा स्त्रीवादाचा विरोध अशा चौकटीला असतो. आणि नेमके स्त्रिया ब-याचदा हे विसरुन जातात आणि त्यांचा लढा, पुरुषांच्या विरोधात सुरु होतो. स्त्री अशा चौकटीत अडकवुन घेत नाही....आणि कोणत्या तरी माध्यमाने याला पुरुष जवाबदार आहे, असे ठरवून बिचा-या पुरुषांना वेठीस धरल्या जाते असे वाटते.

बाकी प्रतिसादाशी फार थोडा सहमत कारण ती चर्चा स्त्रीवादाकडे सरकेल..म्हणून थांबतो.

-दिलीप बिरुटे

http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html

७ मार्च च्या साप्ताहिक सकाळ मधला महिला दिना निमित्त चा हा लेख ..
महिलांनी आवर्जून वाचावा असा..

स्वाती राजेश's picture

12 Mar 2009 - 1:12 am | स्वाती राजेश

लेख आवडला...
लिंक बद्दल धन्यवाद!

मृदुला's picture

12 Mar 2009 - 4:00 am | मृदुला

तेव्हा स्त्रीवादाचा विरोध अशा चौकटीला असतो. आणि नेमके स्त्रिया ब-याचदा हे विसरुन जातात आणि त्यांचा लढा, पुरुषांच्या विरोधात सुरु होतो.

लढा चौकटीच्या विरुद्धच असतो; पण बर्‍याचदा चौकटीला मजबूत करणारे, काटेरी करणारे हात पुरुषाचे असतात; त्यामुळे लढा पुरुषाविरुद्ध आहे असे भासू शकते.

बाकी 'पश्चिमेत' साडेपाच वर्षे राहून असे नक्की सांगते की इथल्या मुलीबाळी कोणत्याही दृष्टीने सातार्‍याच्या/ बंगलोरच्या मुलीबाळीपेक्षा 'मुक्त' नाहीत.