चेहर्‍याभोवती दाढी उमलत आहे !

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
24 Jan 2008 - 7:26 pm

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णींची सुरेख कविता माझ्याभोवतीचे जग बदलत आहे !


.......................................

चेहर्‍याभोवती दाढी उमलत आहे !

.......................................

आत आत खोल काही बदलत आहे !
चेहऱ्याभोवती दाढी उमलत आहे !

नवे नवे होते तेव्हा कडू लागलेले...
भरदिवसा नंतर मग घडू लागलेले...
थोडे उभे दिसू, थोडे पडू लागलेले...
हळू हळू पिणे मजला उकलत आहे....!

'पुन्हा पुन्हा पिणे' केला हाच नारा माझा
झोकांडत ठेवला मी सदा तारा माझा
वाहू दिला मदिरेच्या मी जारा माझा
...मला सारे करायाची सवलत आहे !

घराचे हे दार कोण ठोठावते बरे ?
डोळ्यामधे कोण माझ्या डोकावते बरे ?
दूर वरून कोण हे बोलावते बरे ?
पाऊल ना सरळ पण उचलत आहे...!

आनंदात असताना ही दुःख वाटते का ?
विनाकारणच हुरहूर वाढते का ?
एकाएकी डोळ्यांपुढे धुके दाटते का ?
समजावे....! काहीतरी गफलत आहे...!!

* * *
सुटेल हा कायमचा पेच...जाणतो मी
शेवटला घडणार, हेच जाणतो मी
आता माझा मीच...इतकेच जाणतो मी
...सुरू माझी मरणाशी मसलत आहे !!
* * *
- केशवसुमार

रचनाकाल ः २३-२४ जनेवारी २००८

विडंबन

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

24 Jan 2008 - 7:36 pm | ऋषिकेश

छान विडंबन!! पण नेहमीचा झणका वाटला नाहि थोडं 'संयत' वाटलं.. :प (त्याचं काय आहे नेहेमी मामलेदारची मिसळ खाऊ घातली आहेत तेव्हा ही तेवढी झणझणीत नव्हती)
बाकी यावेळी मक्ता कसा नाहि?

-ऋषिकेश

इनोबा म्हणे's picture

24 Jan 2008 - 7:45 pm | इनोबा म्हणे

केशवा... तर्री नाही आली रे!

(चवीने खाणार...त्याला 'केशव' देणार) -इनोबा

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 10:23 pm | पिवळा डांबिस

ही "लाईट" मिसळ वाटली...

(के. सु. क. प्रे.) पिवळा डांबिस

सुनील's picture

24 Jan 2008 - 8:04 pm | सुनील

विडंबन चांगले पण तुमचा नेहेमीचा मकता (केश्या) दिसला नाही? विसरलात की काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु's picture

24 Jan 2008 - 11:59 pm | प्राजु

हे भलतंच.. 'केश्या' कुठे गेला?

सुटेल हा कायमचा पेच...जाणतो मी
शेवटला घडणार, हेच जाणतो मी
आता माझा मीच...इतकेच जाणतो मी
...सुरू माझी मरणाशी मसलत आहे !!

अखेर कळले तुला केशवा... आता जरा जपून. :))) ह्.घ्या..
(तुमच्या हातून अशीच विडंबने घडत राहोत, मरणाची भाषा नको.)

- प्राजु

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 4:33 pm | सुधीर कांदळकर

भाषा नको. मग मिपा वर विडंबने कोण करणार?