तुझ्यातल्या कवीला डोळे हवे ट्पोरेच
हात सुकोमलच हवेत
केस काळेभोर सुगन्धी कुरळेच हवे;
फुलाबिलानी सजलेले.
वस्त्र नेटकीच हवीत अंगासरशी
तुझ्या कवितेत सामील व्हायला
अन तू उगाळ्लेल्या माझ्या भावना, अन
मी ही हवी विवस्त्र.
तु़झ्या घराचे घर करायला,
हसतमुख घराचे दार उघडायला,
जेवणाचे सुगन्ध दरवळावयाला,
रडत्या मुलाला शान्तवायला
जबाबदारीची ओझी वाहायला.
समारम्भात मिरवायला,
मी तर हवी दक्ष, सावध,
तुझाच घ्यायला पक्ष.
तुझ्यातल्या कवीला माझ्या सारखी कोणीही चालते
पैसे मोजून गप्प बसणारी,
न मोजता मिळाली तर भीतीनी मूग गिळ्णारी.
तुझ्या विश्रान्तीला माझी शान्तता हवी
माझ्या विश्रान्तीला, फक्त तुझ थोड ह्र दय हव
थोडी कदर हवी,ईमान हव,
फार नाही थोडी समजूत हवी
प्रतिक्रिया
24 Jan 2008 - 1:12 am | प्राजु
मला नाही समजली कविता.
- प्राजु
24 Jan 2008 - 1:17 am | अनिला
कवी लोकाना स्त्री कशी हवी/कविच्या बायकोचे निवेदन
27 Jan 2008 - 4:12 pm | सुधीर कांदळकर
सत्यच आणत आहे. शक्य झाले तर 'ती' मिळवती हवी. सगळा पगार सासूच्या हातात देणारी देखील हवी. अगदी 'आखुडशिंगी बहुदुधी' गायीसारखी.
28 Jan 2008 - 8:15 am | प्रमोद देव
सुधीररावांशी सहमत आहे.
कवितेतल्या भावना पोचल्या.
28 Jan 2008 - 6:20 am | संजय अभ्यंकर
अनिलाजी,
फार छान कविता केलित.
कविता वाचताना मी समोर बसुन ही ऐकतो आहे असा भास होत होता.
आपल्या डोळ्यातील अश्रुही जाणवावेत, इतके सुंदर लेखन केलेत.
आभार!
संजय अभ्यंकर
28 Jan 2008 - 12:10 pm | केशवराव
अनीला,
कवीता फारच छान. हि कवीच्या पत्नीचीच व्यथा न रहाता सर्वच स्त्रीयांची व्यथा [ थोड्या फार फरकाने....] म्हणता येईल.
कविते साठी ..... कौतूक !
[पत्नीची व्यथा जाणणारा ]केशवराव