अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
24 Jan 2008 - 12:17 am

आमची प्रेरणा इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल

अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा
बहुतेक बायकोचा, होरा खरा असावा

येतोय वास मजला अजुनी कसा सुगंधी
हातात बांधलेला, तो मोगरा असावा

लपवून तोंड अपुले का घेतले तुम्ही हो?
की वाटले तुम्हाला, तो सासरा असावा!

नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी
गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा

दारात ती उभी अन्‌, हाती तयार झाडू
रणचंडिके प्रमाणे का चेहरा असावा ?

एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा

ठोकून काढले मज इतके नका विचारू
हीच्या परी कसाई थोडा बरा असावा

वागो खुशाल "केश्या" हा मर्कटा प्रमाणे
डांबून घालण्याला , पण, पिंजरा असावा

विडंबन

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

24 Jan 2008 - 12:21 am | इनोबा म्हणे

केशवा सही रे!
च्यामारी तुझे डोके 'संग्रहालयात' ठेवायला हवे(प्राण्यांच्या नव्हे).

धनंजय's picture

24 Jan 2008 - 12:24 am | धनंजय

मस्त!

प्राजु's picture

24 Jan 2008 - 12:27 am | प्राजु

एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा

एकदम भारीच..
आपल्या विनोदबुद्धिची दाद द्यावी लागेल.

- प्राजु.

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 12:39 am | विसोबा खेचर

नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी
गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा

ओहोहो, खल्लास! केशवा, अरे फार सुरेख आणि गहन अर्थ दडलाय रे या दोन ओळींत! अरे गुत्त्यात भेटणारे सगळे सोयरेच असतात रे! गुत्ता म्हणजे तिच्यायला आयुष्याला फाट्यावर मारणार्‍या जिन्दादिल लोकांचं ते एक छोटेखानी संमेलनच असतं रे!

गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा

वा वा! क्या केहेने. सुंदर रे केशवा...!

एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा

ठोकून काढले मज इतके नका विचारू
हीच्या परी कसाई थोडा बरा असावा

क्या बात है केशवा! केवळ अप्रतिम विडंबन!

आपला,
(बेवडा) तात्या.

सुनील's picture

24 Jan 2008 - 12:42 am | सुनील

अप्रतिम विडंबन !!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भडकमकर मास्तर's picture

24 Jan 2008 - 12:51 am | भडकमकर मास्तर

नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी
गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा

...हे झकास आहे...

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 12:57 am | पिवळा डांबिस

केशवसुमारजी,

<नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी>
व्हिस्की म्हणून प्याला, तुम्ही ठर्रा असावा!

आमची आपली एक शंका!! :)

(शंकेखोर) पिवळा डांबिस

चतुरंग's picture

24 Jan 2008 - 12:58 am | चतुरंग

तुझ्या प्रतिभेला साष्टांग प्रणिपात!!
अतिशय उच्च आणि अर्थपूर्ण विडंबन.

चतुरंग

अनिला's picture

24 Jan 2008 - 1:04 am | अनिला

जबरदस्त!!!
एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा

बहोत खूब

ऋषिकेश's picture

24 Jan 2008 - 1:16 am | ऋषिकेश

मस्तच रे!!!! मजा आली वाचताना

-ऋषिकेश

सहज's picture

24 Jan 2008 - 7:31 am | सहज

मजा आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2008 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केशवसुमार, लै भारी इडंबन लिव्हलं :)

नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी
गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा

आणि

एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा

याला पै च्या पै मार्क दिले आहेत !
बाकीच्या वळी बी तेव्हढ्याच झॅक हायेत बरं का लिव्हीत राव्हा !!!

गुत्यात भेटलेला, तो सोयरा
प्रा.डॉ....................

आजानुकर्ण's picture

24 Jan 2008 - 9:56 am | आजानुकर्ण

एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा

झकास सुमारशेठ. आवडले

(हसरा) आजानुकर्ण

विसुनाना's picture

24 Jan 2008 - 2:31 pm | विसुनाना

के.सु.भाऊ, क्या बात है! जबरा हझल झालीय ही... हहपुवा झाली.

मनिष's picture

24 Jan 2008 - 2:48 pm | मनिष

अफलातुन!!!!

बहुरंगी's picture

24 Jan 2008 - 4:01 pm | बहुरंगी

वा रे वा केशवा,
अगदी झ्याक विडंबन केलस. आवडलं मला ...
आपला,
बहुरंगी मिसळे

सर्वसाक्षी's picture

24 Jan 2008 - 4:13 pm | सर्वसाक्षी

केसुमहाराज, भन्नाट आहे काम!

तात्या, लग्न कर . त्यामुळे:

<ठोकून काढले मज इतके नका विचारू
हीच्या परी कसाई थोडा बरा असावा >

या ओळीतले दर्द अधिक समजेल.

अविनाश ओगले's picture

24 Jan 2008 - 8:44 pm | अविनाश ओगले

लै म्हंजे लैच जबरदस्त विडंबन.
दारात ती उभी अन्‌, हातात लाटणे रे
रणचंडिके प्रमाणे का चेहरा असावा ?

आमच्याकडे एवढाच तपशीलाचा फरक... बा़की तुमचे आणि आमचे अगदी सेम असते...

आपला
(समदु:खी) अविनाश ओगले

केशवसुमार's picture

25 Jan 2008 - 1:56 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार

केशवसुमार

विसोबा खेचर's picture

26 Jan 2008 - 1:28 am | विसोबा खेचर

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार

यातले 'प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार' हे आवडले! :)

अवांतर -

अहो तरी प्रतिसाद न देण्याचे प्रकार 'त्या तिथे पलिकडे' फार आहेत! म्हणजे अलिकडे असे फार जाणवते. आम्ही तिथे होतो तेव्हा जरा बरे दिवस होते. सतत सगळ्यांना चालते बोलते हिंडते फिरते ठेवले होते!

जळ्ळं प्रतिसाद द्यायलादेखील जिन्दादिली लागते! सभ्य-सुसंस्कृत, आणि चेहेर्‍यावरची सभ्यतेची आणि शिष्टाचारची घडी हलू न देणार्‍यांना आणि त्यातच धन्यता मानणार्‍यांकडे अशी जिन्दादिली अभावानेच आढळते! अहो मी म्हणतो, वा वा, छान छान असे प्रतिसाद नका देऊ फार तर! वाटल्यास नावे ठेवा, पण काहीतरी मोकळेपणाने बोलाल की नाही?

असो, त्या मानाने अवघ्या चारशे साडेचारशे लोकवस्ती असलेल्या आपल्या मिपावरील मंडळींची ओव्हरऑल सरासरी प्रतिसाद देण्याची जिन्दादिली नक्कीच कौतुकास्पद आहे असे वाटते! एक बरं आहे, त्या तेथील पलिकडील सभ्य आणि सुसंस्कृतीचे बुरखे पांघरलेली मंडळी मिपावर आलीच नाहीत! जी आली होती ती मन उडून चालती झाली हेही बरे झाले! :)

असो,

आपला,
तात्या.

राजे's picture

25 Jan 2008 - 7:36 pm | राजे (not verified)

गजब !!!!!

क्या बात है... खरोखर नितांत सुंदर .. ह्याला विडंबन असे न म्हणता काही तरी वेगळेच म्हणावे लागेल.... वा... खरोखर सुंदर..

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

धोंडोपंत's picture

25 Jan 2008 - 10:48 pm | धोंडोपंत

केश्या केश्या केश्या................

तुझ्या चरणाकमलांवर आमचे मस्तक.

तुझ्या प्रतिभेला साष्टांग दंडवत.

क्या बात है!!!! बहोत बढिया.

अप्रतिम विडंबन.

आपला,
(आपला) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 5:25 pm | सुधीर कांदळकर

माझा दंडवत. आपल्या प्रतिभेस लक्ष लक्ष सलाम. अजून अशीच विडबने येऊं द्यात.

गुंडोपंत's picture

9 Dec 2010 - 5:23 am | गुंडोपंत

लपवून तोंड अपुले का घेतले तुम्ही हो?
की वाटले तुम्हाला, तो सासरा असावा!

नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी
गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा

दारात ती उभी अन्‌, हाती तयार झाडू
रणचंडिके प्रमाणे का चेहरा असावा ?

एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा

इतके जबरी लिहून जाणारे तुम्ही.... कुठे आहात?
केसू, रंगा आणि इतरही दिग्गज मंडळी - तुमच्या विडंबनांची उणीव हल्ली फार जाणवते हो.

बेसनलाडू's picture

9 Dec 2010 - 5:38 am | बेसनलाडू

केसू, रंगा आणि इतरही दिग्गज मंडळी - तुमच्या विडंबनांची उणीव हल्ली फार जाणवते हो.
आवश्यक प्रतीच्या कच्च्या मालाची उणीव हे तर याचे कारण नसावे?
(शोधक)बेसनलाडू

कवटी's picture

25 Jul 2012 - 6:02 pm | कवटी

बेलाशी आजही सहमत!

आंसमा शख्स's picture

14 Dec 2010 - 10:13 am | आंसमा शख्स

हा हा हे पाहिलेच नव्हते. भारी आहे.

सुत्रधार's picture

14 Dec 2010 - 11:42 am | सुत्रधार

खूप आवडलं.....

वेताळ's picture

14 Dec 2010 - 11:54 am | वेताळ

जियो गुर्जी .. एकदम जबराट

सविता's picture

14 Dec 2010 - 1:11 pm | सविता

अफलातून.........

अविनाशकुलकर्णी's picture

14 Dec 2010 - 2:44 pm | अविनाशकुलकर्णी

अफलातुन्

बॅटमॅन's picture

25 Jul 2012 - 6:10 pm | बॅटमॅन

अफलातून विडंबन!!!!!!!!!!!!

चिगो's picture

25 Jul 2012 - 6:33 pm | चिगो

तूफान, तूफान... त्रिवार तूफान..
व्वाह.. क्या बात है! जियो..

सूड's picture

25 Jul 2012 - 6:38 pm | सूड

झकासच !!

जाई.'s picture

25 Jul 2012 - 8:55 pm | जाई.

मस्तच !

जाई.'s picture

25 Jul 2012 - 8:55 pm | जाई.

मस्तच !