गाण्याची शिकवणी

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
4 Mar 2009 - 12:23 am

मी म्हटलं चुकून,
मलाही शिकवा हो गाणं.
तर म्हणतात कसे
माझ्या मनातलं बोललीस.
कितीतरी दिवसात
बघ जवार काढली नाही
घरच्या तंबोर्‍याची.
* * * *
म्हणे,
आधी थोडी नोमथोम
मग
पलटा ताना मुरकी.
तिय्या घेउन येउ समेवर
नंतर
ठेवणीतली अनवट सरगम.
म्हटलं
हात धरून
गाणं शिकवतात का ?
म्हणे,
तुला म्हणजे समज कशी
बिलकूल नाही राणी.
आधी तानपुर्‍याची
मोकळी करावी लागते गवसणी.

मौजमजा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

4 Mar 2009 - 12:28 am | विसोबा खेचर

म्हणे,
तुला म्हणजे समज कशी
बिलकूल नाही राणी.
आधी तानपुर्‍याची
मोकळी करावी लागते गवसणी.

क्लास..! :)

तात्या.

केशवसुमार's picture

8 Mar 2009 - 10:21 pm | केशवसुमार

म्हणतो..
केशवसुमार

भडकमकर मास्तर's picture

4 Mar 2009 - 12:48 am | भडकमकर मास्तर

गाण्याचे शिक्षक फ़ार रंगेल दिसतात....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Mar 2009 - 12:53 am | बिपिन कार्यकर्ते

कुठला अर्थ घेऊ? :(

बिपिन कार्यकर्ते

संदीप चित्रे's picture

4 Mar 2009 - 1:13 am | संदीप चित्रे

कविता आवडली रामदास
>> तिय्या घेउन येउ समेवर
नंतर
ठेवणीतली अनवट सरगम

>> तुला म्हणजे समज कशी
बिलकूल नाही राणी.
आधी तानपुर्‍याची
मोकळी करावी लागते गवसणी.

या ओळीतर खासच आहेत.

मुक्तसुनीत's picture

4 Mar 2009 - 1:21 am | मुक्तसुनीत

प्रणयाकरता वापरलेले संगीताचे रूपक आवडले. गाण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांना फोर्प्ले , रतिक्रीडेकरता उपयोजिणे रंगतदार. विशेष म्हणजे , स्त्रीच्या भूमिकेतून लिहिलेल्या या प्रकारच्या कविता विशेष नजाकतीच्या .( 'परि सारे हलक्याने ; आड येते रीत !')

प्रश्न : तंबोर्‍याची जवार काढणे म्हणजे काय ?

बेसनलाडू's picture

4 Mar 2009 - 8:04 am | बेसनलाडू

मस्त कविता!
(सहमत)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

4 Mar 2009 - 10:22 am | विसोबा खेचर

प्रश्न : तंबोर्‍याची जवार काढणे म्हणजे काय ?

कृपया आमचा हा लेख वाचा. त्यातील एक लहानसा उतारा -

त्याकरता तानपुर्‍याची घोडी कानसेने, पॉलिश पेपरने एका विशिष्ठ पद्धतीने घासावी लागते. ह्यालाच तानपुर्‍याची 'जवार काढणे' असे म्हणतात. हे अत्यंत कठीण काम आहे. ही जवार अतिशय सुपरफाईन पद्धतीने काढावी लागते. त्यामुळे दोरा तारेतून आत सरकवल्यावर घोडीच्या मध्यभागी एका विशिष्ठ ठिकाणी अडतो आणि बरोब्बर त्याच जागेवर तार छेडली असता घोडीतून गोलाकार, गोळीबंद असा टणकार उत्पन्न होतो. हा दोरा घोडीच्या एका ठराविक जागी असतांनाच तानपुर्‍यातून सुरेल व मोकळा टणकार ऐकू येतो. ह्यालाच "जवारी लागली" असे म्हणतात.

एकंदरीत रामदासभाऊंना गवसण्यांतून तंबोरे मोकळे करण्याची आणि त्यांच्या जवार्‍या काढण्याची बरीच हौस/आवड दिसते आहे! :)

तात्या.

घाटावरचे भट's picture

4 Mar 2009 - 1:32 am | घाटावरचे भट

कडक!!!!

सहज's picture

4 Mar 2009 - 6:48 am | सहज

खास!

अवलिया's picture

4 Mar 2009 - 9:26 am | अवलिया

मस्त :)

--अवलिया

पिवळा डांबिस's picture

4 Mar 2009 - 9:33 am | पिवळा डांबिस

तुला म्हणजे समज कशी
बिलकूल नाही राणी.
आधी तानपुर्‍याची
मोकळी करावी लागते गवसणी.
सुभानल्ला!!
मस्त कल्पना!!

(स्वगतः यांचं वेलेंटाईन परत घरी आलेलं दिसतंय!!!!)
:)

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 12:43 pm | विनायक प्रभू

बरोबर दोन पहारेकरी पण आहेत म्हणुनच अशा भारी कविता करतात हो रामदास

पॅपिलॉन's picture

4 Mar 2009 - 9:40 am | पॅपिलॉन

माझिया प्रियाला प्रीत कळेना,,,,,,

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

मेघना भुस्कुटे's picture

4 Mar 2009 - 1:11 pm | मेघना भुस्कुटे

खतरनाक!

दत्ता काळे's picture

4 Mar 2009 - 1:30 pm | दत्ता काळे

कविता म्हणजे "ठेवणीतली अनवट सरगमच" जणू !

"तंबोर्‍याची जवार काढणे" हे माहित नव्हतं, तात्यांमुळे कळालं - फार छान.

श्रावण मोडक's picture

4 Mar 2009 - 7:04 pm | श्रावण मोडक

सुंदर कविता.

नंदन's picture

4 Mar 2009 - 7:27 pm | नंदन

कविता. रामदासांच्या प्रतिभेने वेगवेगळ्या विषयांना घातलेली 'गवसणी' वाचायला मिळाली :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

4 Mar 2009 - 7:43 pm | चतुरंग

(खुद के साथ बातां : रंगा, वेगवेगळ्या विषयांना 'घातलेली' गवसणी की वेगवेगळ्या विषयांनी 'काढलेली' गवसणी ह्यात मतभेद होऊ शकतात नाही का? ;) )

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

4 Mar 2009 - 7:45 pm | मुक्तसुनीत

"विषय"विकार वैट बर्का ! ;-)

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 7:38 pm | लिखाळ

जोरदार..
सुंदर कविता ....

(इतर प्रतिसाद वाचून नक्की काय आहे याची खात्री करुन घेऊन मग माझा प्रतिसाद दिला.)
-- लिखाळ.

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 7:52 pm | विनायक प्रभू

काय ते कळल का?
लय भारी हाय ते.

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 7:54 pm | लिखाळ

लै भारी आहे ते असेच आधी वाटले होते..पण चार प्रतिसाद पाहून खात्री झाली आणि मग 'जोरदार' असे लिहिले :)
-- लिखाळ.

प्रमोद देव's picture

4 Mar 2009 - 8:00 pm | प्रमोद देव

दोघांचे 'विषय'वेगळे-वेगळे!
एकाने मनाचे श्लोक रचले तर दुसरा तनाचे श्लोक रचतोय. :)

धनंजय's picture

5 Mar 2009 - 4:35 am | धनंजय

लाडिक आणि चावट!

चन्द्रशेखर गोखले's picture

5 Mar 2009 - 10:48 pm | चन्द्रशेखर गोखले

एकदम सहमत