सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
2 Mar 2009 - 9:39 pm | प्रकाश घाटपांडे
आपन जस त्यांच्या बद्दल बोल्तो तस ते बी आपल्याबद्दल बोलत असनार
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
2 Mar 2009 - 11:29 pm | विसोबा खेचर
माणूस इथूनतिथून सारखाच. आपण जसं इतर भाषिकांबद्दल बरंवाईट बोलतो तसं इतर भाषिकही आपल्याबद्दल बोलत असतात..
अर्थात, प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगळा.
भैय्या, सिंधी, पंजाबी, तुळू बोलणारे शेट्टी, मारवाडी, गुजराथी, मुसुलमान, इत्यादी अनेक मंडळी माझी खूप जवळची आहेत, सुहृद आहेत. शिवाय यातली अनेक मंडळी माझी अशीलही आहेत.. या सर्वांबद्दलच माझा अनुभव चांगला आहे..
शेवटी आपण चांगलं की जग चांगलं! असं आमचा बाप म्हणायचा तेच खरं! असो, वारला बिचारा..!
आपला,
(भारताचे भषिक वैविध्य आणि त्यानुषंगाने येणार्या चालीरिती, सणवार, खाणंपिणं या सर्वांवर एक भारतीय म्हणून मनापासून प्रेम करणारा) तात्या.
2 Mar 2009 - 11:38 pm | देवदत्त
हे मराठी लोकांना का हो विचारताय? त्यांनाच विचारा की.
3 Mar 2009 - 10:11 am | पाषाणभेद
हेच म्हणतो. आपण दुसर्या प्रांताबद्दल जास्त विचार करतो. महाराष्ट्र त्याच्या खिजगणतीतही नसतो. हे आताचे नाही, अगदी गांधी, नेहरू, यांनी तेच केले.
-( सणकी )पाषाणभेद
3 Mar 2009 - 12:53 pm | मराठी_माणूस
आपण आपले महत्व वाढवायल हवे.
मधे स्वस्तात झुणका भाकर केंद्रे काढली होती, त्याच बरोबर स्वस्तात दाल रोटी आणि सांबार भात, इड्ली दोसा हे का नाही दीले. ह्या वरुन बाहेरचे लोक मराठी पदार्थांच्या दर्जा बद्दल गैर समज करुन घेतात.
3 Mar 2009 - 1:02 pm | परिकथेतील राजकुमार
इतर भाषीक मराठी लोकांना मुर्ख म्हणतात आणी आम्ही त्यांना महामुर्ख म्हणतो आणी अशा वांझोट्या चर्चा करणार्यांना शतमुर्ख म्हणतो ;) ह. घ्या.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
3 Mar 2009 - 1:04 pm | दशानन
>भैय्या, सिंधी, पंजाबी, तुळू बोलणारे शेट्टी, मारवाडी, गुजराथी, मुसुलमान, इत्यादी अनेक मंडळी माझी खूप जवळची आहेत, सुहृद आहेत.
सहमत.
माझे ही खुप मित्र आहेत.. ते सर्व सगळे चांगले आहेत व महाराष्ट्राबद्दल.. मराठी माणसाबद्दल नेहमी चांगलेच बोलतात...
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
3 Mar 2009 - 3:24 pm | सखाराम_गटणे™
माझे सगळ्यात चांगले मित्र आणि मैत्रीणी अ-मराठी आहेत.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
3 Mar 2009 - 4:30 pm | परिकथेतील राजकुमार
>>माझे सगळ्यात चांगले मित्र आणि मैत्रीणी अ-मराठी आहेत.
== त्यांचे तुमच्या विषयी हेच मत आहे का ?
स्वगत :- तुला मेल्या काय करायच्या आहेत रे चौकशा ? रिकामा न्हावी ...
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
3 Mar 2009 - 4:18 pm | मराठी_माणूस
http://www.geocities.com/jpnvians/files/spandanandotherliterature/liketh...
3 Mar 2009 - 5:10 pm | शैलेन्द्र
मागेहि एकदा येवुन गेलय, बोगस आहे...