करार
माझे कधी तुझ्याशी काही करार होते
तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते
श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते
वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
गेले मिटून जितके हळवे विचार होते
वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली
काळोख पान्गताना उघडेच दार होते
हातून सावलीचा निसटून हात गेला,
आयुष्य फाटलेले मी सान्धणार होते
प्रतिक्रिया
2 Mar 2009 - 11:01 pm | प्राजु
सगळेच शेर खास.
श्वास उधार, उघडे दार, सावलीचा हात... उत्तम. :)
अभिनंदन!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Mar 2009 - 9:47 pm | क्रान्ति
:H धन्यवाद प्राजू
क्रान्ति
3 Mar 2009 - 1:32 am | अनामिक
छान, आवडली कविता!
अनामिक
3 Mar 2009 - 9:49 pm | क्रान्ति
:| धन्यवाद!
क्रान्ति
3 Mar 2009 - 11:29 am | मनीषा
वा !! मस्तच ...
वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
गेले मिटून जितके हळवे विचार होते .......सुंदर !
खूप छान कविता ....
3 Mar 2009 - 2:05 pm | मयूरी
तुझी कविता मला फार आवडली..!
त्यातंलं
"श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते
- हे तर मला फार भावलं.
3 Mar 2009 - 9:50 pm | क्रान्ति
:S धन्यवाद मयूरी.
क्रान्ति