From new
३ दशकांपुर्वी शिजीओ शिंजो ही आसामी जपानच्या औद्योगिक जगतात एक थोर व्यक्ति म्हणून ओळखली गेली. [http://www.shingoprize.org/htm/about-us/dr-shigeo-shingo] त्यांनी जपानच्या औद्योगिक जगताला अनेक प्रकारे मदत केली. त्यांची मदत प्रामुख्याने उत्पादन क्षमता, गुणवत्ता वाढीसाठी जपान मधील अनेक कंपन्यांनी घेतली. तिथे त्यांची ख्याती व स्थान मानले गेल्यानंतर त्यांची कीर्ति अमेरिकेत जाऊन पोहोचली. त्याच संदर्भातील हा एक किस्सा.
ईलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवितांना कारखान्यातील उजेडाचे (प्रकाशरंग आणि त्याची तीव्रता) महत्व खूप असते. कामगारांना पुरेसा प्रकाश हा फक्त छोटे-छोटे ईलेक्ट्रॉनिक भाग जोडायलाच मदत करतो एव्हढेच नसून त्यांचा दिवसभर उत्साह टिकून राहण्यासाठीही योग्य प्रकाशरंग आणि त्याची तीव्रता ह्याचे महत्व असते. अन्यथा, तसे नसल्यास, ह्या उद्योगातील तज्ञांना असे आढळले की कामाच्या गुणवत्तेवर त्याचा निश्चित ऱ्ह्स्व परिणाम होतो. पीसीबी वर एखादा ई. भाग जुळणी करायचा राहून जाणे हे त्याकाळच्या ईलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणाऱ्या कारखान्यातील नेहमीचा प्रकार होता. आता हे बहुतेक काम रोबॉट करतात.
एका प्रसिद्ध अमेरिकन कंपनीला असे आढळले की, त्यांच्या कारखान्यातील गुणवत्ता ही काही केल्या सुधारत नव्हती. वर सांगितल्या प्रमाणे त्यांना क्यु. सी. मधे अनेकदा असे दिसून यायचे की, एखाद दुसरा ई. भाग लावायला कामगार विसरुन(!) गेला आहे. उजेड म्हणावा तर तो त्यांच्या नॉर्मपेक्षा जास्तच होता. मग असे का होते ते त्यांना कळेना. बरे, हा प्रकार सगळ्या कामगारांकडून होत असे. तज्ञ विचार करुन थकले व त्यांनी शिजीओ शिंजो ह्यांना पाचारण करावे असे सुचविले.
शिजीओ शिंजोंनी त्या कारखान्याला भॆट दिल्यानंतर त्यांनी सगळी परिस्थिती पाहून, तज्ञांना सांगितले की, ह्या सगळ्यांचे कारण दिवेच आहेत. प्रकाशाची पुनर्रचना करण्यानेच ही अडचण सुटू शकेल. तज्ञ बुचकाळ्यात पडले. शिजीओ शिंजोंनी त्यांना, प्रयोग म्हणून कामगारांच्या कामाच्या टेबलावर दुधाळ रंगाची काच बसवायला सांगितले व दिवे त्यांच्या टेबलाखाली लावायला सांगितले व वरचे दिवे कमी करण्यास सांगितले.
तसे केल्यामुळे, कामगाराला, पीसीबीवरील एखाद्या भोकात इ. भाग लावायचा राहिला आहे हे झटकन कळायचे. आणि काय, जेव्हा ही कल्पना त्या कारखान्यात सगळीकडे राबवली, तेव्हा ती अडचण पुर्णपणे नाहिशी झाली.
[टरबुजाचा आकार चौकोन: आजच एका स्नेह्याने "थिंक डिफ़रंटली" अशी एक बोधकथा पाठवली त्यात टरबुजाचा आकार चौकोन करुन त्याचा वाहतुकीचा प्रश्न शेतकऱ्यांनी कसा सोडवला ते कळवले. तशाच स्वरुपाची ही दुसरी कथा मी शिजीओ शिंजो ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकात वाचली होती. अनेकांना "टरबुजाचा आकार चौकोन" ही कथा डिस्कवरीवरील त्याची डॉक्युमेंटरी पाहून माहीत असेलच. पण ही कथा वेगळी आहे त्यामुळे मला ती मिपावर लिहाविशी वाटली.]
प्रतिक्रिया
28 Feb 2009 - 1:42 pm | परिकथेतील राजकुमार
छानच परिचय करुन दिला आहात.
मध्ये अशाच २ कथा वाचनात आला होत्या, कोणाला अधीक माहिती असल्यास सांगावी.
कथा १ :-
एका टुथब्रशच्या कारखान्याला ब्रश भरलेल्या खोक्यांमधुन एक मोकळा खोका हि गेला, तो नेमका कोणा ग्राहकानी सुपरमार्केट मधुन विकत घेतला, नंतर त्यानी सुपर्मार्केटवर फसवणुकीची केस केली. ह्या सगळ्यातुन मार्ग काढण्यासाठी कारखानदाराने तज्ञ लोकांना पाचारण केले, त्यांनी वेगवेगळे खर्चीक उपाय सुचवले जे फारच महाग वाटत होते. शेवटी त्यानी आपल्या कारखान्यातील कामगारांचा सल्ला घेतला. एका कामगारानी त्याला शेवटच्या ट्प्प्यात ब्रशचे भरलेले छोटे बॉक्स ज्या फळीवरुन खाली घसरतात तिथे एक मोठा पंखा बसवायचा उपाय सुचवला आणी चुटकीत प्रश्न सुटला.
कथा २ :-
सगळ्यांना माहिती असलेलीच कथा आहे ही. (हि खरच कथा आहे, सत्यघटना का विनोद ते माहित नाही)
अमेरीकेने म्हणे अंतरा़ळवीरांच्या पहिल्या स्वारीच्या वेळी गुरुत्वाकर्षण , तेथील वातावरण ह्यांचा खास अभ्यास करुन, अंतराळविरांना अंतराळात नोंदी करण्यासाठी वापरता येतील अशी खास पेन करोडो डॉलर्स खर्च करुन बनवली. रशीयाचे अंतराळवीर मात्र पहिल्या उड्डाणाच्या वेळी बरोबर शिसपेन्सील घेउन गेले =))
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
28 Feb 2009 - 1:58 pm | अजय भागवत
कथा १ छानच आहे. डोके वापरले आहे त्या बेट्याने.
कथा २: बद्दल खूप वाद-प्रवाद आहेत. तसे काहीही घडले नव्हते असे नासा सांगते. गुगल केल्यास अशी माहीती मिळते. पण एक बोधकथा म्हणून नक्कीच तिला मुल्य आहे.
28 Feb 2009 - 5:35 pm | वेताळ
ज्यावेळी नासातील लोकाच्या लक्षात आले की गुरुत्वाकर्षणामुळे साधे पेन अंतराळात वापरता येणे शक्य नाही त्यावर त्यानी अंतराळात लिहण्यायोग्य पेन बनवण्यास सुरुवात केली. पंरतु त्यात यश आले नाही. सदर कामासाठी त्यानी बाहेरिल लोकाची मदत घेतली असता एका विद्यार्थ्याने शिसेपेन्सिल वापरायचा सल्ला दिला व तो अमलात आणला गेला.
वेताळ
28 Feb 2009 - 8:33 pm | सुनील
असे काही नाही हो. कृपया हे वाचा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Feb 2009 - 2:22 pm | मदनबाण
अशीच एक कथा मी टुथपेस्ट बनवणार्या कंपनी बद्धल ऐकली आहे....त्या कंपनीची सेल्स वाढवण्यासंबंधी मिटींग असते..सगळे मॅनेजर सांगतात..की सेल तर भरपुर आहे..तोही मागच्या वेळेपेक्षा...अजुन सेल कसा वाढवणार यावर बरीच चर्चा होते शेवटी एक पढ्या सांगतो..की अजुन सेल वाढवता येईल्...बाकीचे म्हणतात कसे ..त्यावर तो सांगतो की टुथपेस्ट चे गोल तोंड असते त्याचा व्यास थोडासा वाढवा...त्यामुळे पेस्ट जास्त बाहेर येईल व त्यामुळे सेल वाढेल..
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
28 Feb 2009 - 5:19 pm | विंजिनेर
सोनी इलेट्रॉनिकस् ह्या जगप्रसिध्द जपानी कंपनीचा संस्थापक अकियो मोरिता ह्याने वॉकमनसारख्या तडाखेबंद खप झालेल्या उपकरणाच्या विक्रीची अशीच शक्कल लढविली होती (ही गोष्ट वॉकमन जेव्हा जपानी आणि अमेरिकन जनसामान्यांना माहित नव्हता त्या अगदी सुरुवातीच्या दिवसांमधील आहे).
त्याला वॉकमन अगदी खिश्यात बसेल इतका हलका आणि छोटा आहे ह्या गोष्टीची जाहिरात करायची होती. त्यासाठी सोनीच्या मार्केटींग विभागाने टोकियोतल्या गिंझा/शिबुया किंवा न्युयॉर्क मधल्या टाइम्स स्केवर ह्या सारख्या तरुणवर्गाची वर्दळ असलेल्या विभागात मुले मुली वॉकमन खिशात घालून, गाणी ऐकत हिंडवायचे ठरविले. पण बाजारात मिळणार्या कुठल्या शर्टाच्या खिशात वॉकमन मावेना. शेवटी मोरिताने शर्ट विकत घेउन त्याला वॉकमनच्या मापाचे खिसे शिवायला सांगितले!!
ह्याच अतिशय बुद्धिवान अभियंत्याला युद्धकाळात रडार बनवायचे कंत्राट मिळाले होते. आता रडारला एका विशिष्ट लांबीच्या तरंगाला कॅलिब्रेट केलेलेच सुटेभाग लागतात. हे कॅलिब्रेशन महागड्या यंत्राने शक्य असते. परंतू युद्ध काळात रोजचा तांदूळ मिळण्याची मारामार तिथे महागडे यंत्र कुठुन आणायचे? पैशाचा प्रश्न वेगळाच.
मग त्या साठी मोरिताने सरळ पियानो आणि व्हॉयोलिन वादनात कुशल असणारे वादक कंपनीत आणले. ह्या वादंकांचा "सांगितीक कान" तयार असतो (तंबोरा जुळवणे!!) मग त्या विशिष्ट तरंग लांबीची ट्युनिंग फोर्क आणि वादकांचा अनुभव ह्याच्या जोरावर रडार यंत्रणा चपखल (आणि स्वस्तात !!) कॅलिब्रेट केली!
सौजन्य: मेड इन जपान - सोनी अँड मी.
28 Feb 2009 - 8:09 pm | अमेरिकन त्रिशंकू
याच्या नावाचा उच्चार "शिगेओ शिंगो" असा आहे.
28 Feb 2009 - 8:39 pm | अजय भागवत
धन्यवाद. मलाही निश्चित माहिती नव्हती. मी त्यांचे ईग्लिश पुस्तक वाचले असल्यामुळे त्या नावाचा उच्चार कसा असेल हे कळले नाही.
2 Mar 2009 - 8:40 am | केदार_जपान
अशिच एक कथा माझ्या वाचनात आलेली होती..
'थिन्क आउट ऑफ बॉक्स' असे काहितरी त्याला म्हणता येइल....तर ही कथा जपान चिच आहे..पण आता मला त्या कंपनिचे डीटेल्स एवढे आठवत नाहित..एकाने मला हे ई-मेल पाठवले होते..
तर एक लिफ्ट बनवणारी नावाजलेली कंपनी होती....त्यानी लिफ्ट च्या वेगामधे सुधारणा केली आणी नविन प्रोड्क्ट मार्केट मधे आणले..
पण ग्राहकांची अशी तक्रार होती कि कंपनी नी जे कबूल केले आहे त्यापेक्षा लिफ्ट खूप हळू चालते आहे..आणी तो स्पीड काही लिफ्ट देत नाही...
कंपनी ने सर्व टेस्टिन्ग वगैरे केले..रिपोर्ट्स काढले...पण त्यांच्या मते तरी लिफ्ट मधे काही खराबी नव्हती...तरी पण ग्राहक राजा ला खूष करणे आवश्यक होते...मग त्यातला एक नवखा एन्जिनीअर होता...त्याने कल्पना लढवली कि, लिफ्ट मधे आरसे बसवा..जेणेकरुन. लोक आरष्यामधे बघण्यात गुंग रहातिल, आणि लिफ्ट च्या वेगाकडे जास्त लक्ष जाणार नाही....
आणि ही कल्पना फारच यशस्वी झाली...आणी ग्राहकांच्या तक्रारी पण कमी झाल्या..
----------------
केदार जोशी
2 Mar 2009 - 1:55 pm | अमृतांजन
मी ऐकलेल्या ह्याच गोष्टीत त्यांनी ते आरसे लिफ्ट्च्या बाहेर व्हरांड्यात लावले ज्यामुळे लिफ्ट्ची वाट पहाणारी मंडळी कंटाळनार नाहीत. तरीसुद्धा त्या गोष्टीचे महत्व तेच राहते. आयडीया चांगलीच आहे आणि छोट्या वाटणार्क्ष्या गोष्टी कसे मोठे बदल घडवून आणु शकते हेच त्यातून प्रतित होते
2 Mar 2009 - 11:34 am | वर्षा
मीसुद्धा एक जपानी कथा ऐकली आहे. ती 'ऐकीव' असल्याने काही डिटेल्स कमी/जास्त असू शकतात. आपल्यापैकी बर्याच जणांना कदाचित ठाऊकही असेल ही गोष्ट.
चपला/बूट बनवणार्या कुठल्याश्या एका जपानी फॅक्टरीतील कामगारवर्ग त्यांच्या काही मागण्यांसाठी संपावर जायचा निर्णय घेतात. पण जपानी असल्याने यंत्र बंद करुन स्वस्थ बसून राहणे बहुतेक कोणालाच रुचलं नाही. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपण काम करत रहायचं, यंत्र काही बंद ठेवायची नाहीत..ती चालूच ठेवायची आणि माल तयार करायचा पण कंपनीला मात्र त्याचा काहीही फायदा होऊ द्यायचा नाही. हे सर्व कसं शक्य होणार असं काहींना वाटलं. पण तसं शक्य झालं.
संपाच्या काळात त्यांनी फक्त एकाच पायाचे बूट बनवले.
2 Mar 2009 - 12:53 pm | केदार_जपान
आपण ऐकलेली गोष्ट मला माझ्या जापानी मित्राने सांगितली आहे...त्यामुळे खरी असेलही...
पण मला पण कंपनी मात्र आठवत नाही :(
----------------
केदार जोशी